Salman Rushdie Attack : सलमान रश्दींवर सपासप वार, पोलीस म्हणतात, गेल्या 150 वर्षात असा हल्ला झाला नाही; कोण आहे हल्लेखोर हादी मतार?

Salman Rushdie Attack : रश्दी यांच्या स्थितीवर हादी मतारवर काय आरोप ठेवायचे हे ठरवले जाणार आहे. मात्र, पोलिसांनी मतीर याला अटक केली आहे. सलमान रश्दी हे भाषण देण्यासाठी मंचावर पोहोचले होते. तेवढ्यात हादी मतार हा स्टेजवर आला आणि त्याने रश्दींना धक्काबुक्की केली.

Salman Rushdie Attack : सलमान रश्दींवर सपासप वार, पोलीस म्हणतात, गेल्या 150 वर्षात असा हल्ला झाला नाही; कोण आहे हल्लेखोर हादी मतार?
सलमान रश्दींवर सपासप वार, पोलीस म्हणतात, गेल्या 150 वर्षात असा हल्ला झाला नाही
Image Credit source: tv9 marathi
भीमराव गवळी

|

Aug 13, 2022 | 1:32 PM

न्यूयॉर्क: बुकर पुरस्कार विजेते प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी (Salman Rushdie Attack) यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये चाकू हल्ला झाला आहे. पश्चिम न्यूयॉर्कमधील चौटाउक्वा येथे एका कार्यक्रमात लेक्चर देण्यासाठी उभे राहिले असता एक व्यक्ती मंचावर आला आणि त्याने रश्दींना धक्काबुक्की केली. त्यानंतर या तरुणाने रश्दींवर सात ते आठवेळा चाकूने सपासप वार केले. त्यामुळे सलमान रश्दी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यामुळे एकच धावपळ उडाली. या जीवघेणी हल्ल्यात रश्दी यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर संपूर्ण जग हादरून गेले आहे. एका 24 वर्षीय तरुणाने रश्दी यांच्यावर हल्ला केला असल्याची माहिती समोर आली आहे. हादी मतार (Hadi Matar) असं या तरुणाचं नाव आहे. तो न्यूजर्सीचा राहणार आहे. मात्र, न्यूयॉर्क पोलिसांनी (New York Police) त्याच्यावर हल्ल्याचा आरोप अजून ठेवलेला नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रश्दी यांच्या स्थितीवर हादी मतारवर काय आरोप ठेवायचे हे ठरवले जाणार आहे. मात्र, पोलिसांनी मतीर याला अटक केली आहे. सलमान रश्दी हे भाषण देण्यासाठी मंचावर पोहोचले होते. तेवढ्यात हादी मतार हा स्टेजवर आला आणि त्याने रश्दींना धक्काबुक्की केली. लगेच चाकू काढून त्याने रश्दींच्या गळ्यावर आणि पोटावर वार केले. हादी मतार हा मॅनहट्टनमध्ये हडसन नदीच्या पुढे फेयरव्ह्यू येथे राहतो. मतार याच्याकडे रश्दीच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचा पास होता. मात्र, त्याच्या हल्ल्याचा हेतू अजून पोलिसांच्या तपासात समोर आला नाही. त्याने एकट्यानेच हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे.

एफबीआयकडून चौकशी

या हल्ल्यानंतर रश्दी मंचावरच कोसळले. त्यांच्या दोन्ही हाताला रक्त लागले होते. गेल्या दीडशे वर्षात अशी घटना घडली नाही, असं पोलिसांनी सांगितलं. अशा प्रसंगी सर्वांनी सलमान रश्दी यांच्या कुटुंबासोबत राहिलं पाहिजे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. या प्रकरणात एफबीआयकडून चौकशीसाठी मदत केली जात आहे. ही प्राथमिक चौकशी आहे, असं न्यूयॉर्क पोलिसांनी सांगितलं. पोलिसांना घटनास्थळी एक बॅग आणि काही इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे सापडली आहेत.

हे सुद्धा वाचा

मतार इराण समर्थक

हादी मतार हा इराणचा समर्थक आहे. इरान सरकारने रश्दी यांना मारण्याचं आवाहन केलं होतं. मतारच्या फेसबुक अकाऊंटवर इराणचे नेते अयातुल्ला खुमैनीचा फोटो आहे. खुमैनीने 1989मध्ये रश्दीविरोदात फतवा काढला होता. मतारने इराण आणि त्यांच्या रिव्होल्यूशनरी गार्डच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या होत्या. शिया कट्टरतावाद्यांच्या समर्थनार्थही सोशल मीडियावर पोस्ट केल्या होत्या.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें