Israel Attack In Qatar : योग्य लोकेशनवर एकदम परफेक्ट स्ट्राइक, तरी कतरमध्ये मोसादचा हल्ला का फसला?
Israel Attack In Qatar : आपलं मिशन अचूकतेने प्रत्यक्षात आणणं ही मोसादची खासियत आहे. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना आहे. मंगळवारी इस्रायलने कतरमध्ये हल्ला केला. पण या हल्ल्यानंतर हमासने इस्रायलचा हल्ला फसल्याचा दावा केला आहे.

मोसादची गणना जगातील घातक गुप्तचर संघटनांमध्ये होते. आपलं मिशन अचूकतेने प्रत्यक्षात आणणं ही मोसादची खासियत आहे. मोसाद ही इस्रायलची गुप्तचर संघटना आहे. मंगळवारी इस्रायलने कतरमध्ये हल्ला केला. पण या हल्ल्यानंतर हमासने इस्रायलचा हल्ला फसल्याचा दावा केला आहे. आमचे नेते सुरक्षित असल्याच हमासने म्हटलय. इस्रायलच्या हल्ल्यात हमास नेता खलील अल-हय्याचा मुलगा आणि 6 अन्य सहकारी, सुरक्षारक्षक मारले गेले.
इस्रायलने हमासच्या पॉलिटिकल ब्यूरोंच्या नेत्यांना लक्ष्य करत 10 ठिकाणी बॉम्बफेक केली. पण, तरीही त्यांना यश मिळालं नाही. हे असं कसं झालं? हे समजून घेण्यासाठी हमासने सुरक्षेच्या दृष्टीने जी पावलं उचलली, ती समजून घेणं गरजेच आहे. इस्रायल मोबाइल फोनच्या लोकेशनवर अवलंबून होती,हमासचे नेते वाचले त्यामागे हे सुद्धा एक कारण असू शकतं, असं सूत्रांनी सांगितलं.
हमासचे नेते कसे वाचले?
मोसाद हमास नेत्यांच्या लोकेशनसाठी त्यांच्या फोनवर अवलंबून होती, असं म्हटलं जातय. परंपरा अशी आहे की, प्रत्येक बैठकीसाठी पोलिस ब्युरोचे नेते मोबाइल फोन स्वत:सोबत ठेवत नाहीत. ते मोबाइल गाडीमध्ये ठेवतात किंवा सुरक्षा रक्षकांकडे देतात. त्यामुळेच या हल्ल्यात सहकारी आणि सुरक्षा रक्षक मारले गेले. बैठक नेहमी एकाच जागी होत नाही. नेहमी बैठकीच ठिकाण ते सतत बदलत असतात असं सूत्रांनी सांगितलं.
एकूण चार हवाई हल्ले
कतरमध्ये ज्या इमारतींना इस्रायलने लक्ष्य केलं, तिथे हमास नेते, त्यांचे सुरक्षा रक्षक यांची ऑफिसेस आणि घरं दोन्ही होती. यात खलील अल-हया यांचा बंगला सुद्धा आहे. त्यात त्यांचं खासगी कार्यालय होतं. हल्ल्यात या कार्यालयाच नुकसान झालं. एकूण चार हवाई हल्ले झाले.
हल्ला फसण्यामागे इस्रायलचा निष्कर्ष काय?
हल्ल्याच्यावेळी हमास नेते बंगल्याच्या आत होते, त्यामुळे यश मिळालं नाही, असं इस्रायली अधिकाऱ्यांचा तर्क आहे. त्याचं फार नुकसान झालं नाही. किरकोळ दुखापती झाल्या.इस्रायली मीडियानुसार सुरक्षी एजन्सी याची सुद्धा चौकशी करतायत की, हल्ल्यासाठी वापरलेले एअर वेपन फार छोटे नव्हते ना? एकूण दहा बॉम्ब टाकण्यात आले. त्यात इमारतीच्या एक भागाच मोठ नुकसान झालं.पण ती इमारत पूर्णपणे नष्ट झाली नाही. याचा अर्थ असा आहे की, विनाकारण कतरच्या नागरिकांची जिवीतहानी होऊ नये, यासाठी छोट्या शस्त्रांचा वापर करण्यात आला.
