Russia Donetsk : डोनेट्स्कमध्ये असा काय खजिना, ज्यासाठी पुतिन एका क्षणात थांबवतील युद्ध, भारतालाही होईल फायदा
Donetsk History : अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि रशियन राष्ट्राध्यक्ष यांच्या चर्चेतून एक इंटरेस्टिंग गोष्ट समोर आली आहे. पुतिन म्हणाले की, आम्हाला डोनेट्स्क शहर मिळालं, तर युद्ध थांबवू. त्यावरुन हे शहर पुतिन यांच्यासाठी किती खास आहे ते स्पष्ट होतं. डोनेट्स्कमध्ये असं काय खास आहे, ज्यासाठी पुतिन हे युद्ध थांबवायला तयार आहेत, जाणून घ्या.

डोनेट्स्क आणि व्यापक डोनबास क्षेत्र मागच्या एक दशकापासून रशिया-युक्रेन वादाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मागच्याच आठवड्यात रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अलास्कामध्ये चर्चा झाली. यावेळी पुतिन यांनी डोनेट्स्कच्या बदल्यात युद्ध थांबवण्याचं आश्वासन दिलं आहे. वास्तवात हे इतकं सोप नाहीय. कारण मूळचा युक्रेनचा भाग असलेला डोनेट्स्कचा भाग मागच्या 10-11 वर्षांपासून रशियाच्या ताब्यात आहे. रशिया समर्थित फुटीरतवादी गटांनी डोनेट्स्क पीपुल्स रिपब्लिक नावाने वेगळा देश जाहीर केलाय.
रशियासाठी सैन्य दृष्टीकोनातून, राजकीय भूमिकेतून आणि वैचारिक प्राथमिकतेमध्ये डोनेट्स्क खूप महत्वाचा आहे. युक्रेनाला काहीही करुन डोनेट्स्क प्रदेश सोडायचा नाहीय. पण रशियाला हा भाग आपल्या ताब्यात हवा आहे. युक्रेन विरुद्ध युद्ध सुरु होण्याच हेच एक प्रमुख कारण आहे. युक्रेनचे राष्ट्रपती जेलेंन्सकी अनेकदा स्पष्टपण बोललेत की, ‘एक इंचही जमीन सोडणार नाही. जमिनीची अदला-बदली अजिबात मान्य नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांना भेटल्यानंतर जेलेंन्सकी काय भूमिका घेतात? याची उत्सुक्ता आहे. रशियाला काहीही करुन डोनेट्स्क प्रांत का हवाय? पुतिन यांची ही अट मान्य केल्यास युक्रेन-रशिया युद्ध थांबेल का? जाणून घेऊया.
डोनेट्स्क काय नैसर्गिक साधन संपत्ती आहे?
औद्योगिक कोळसा आणि धातू उद्योग उभा राहत असताना 19 व्या शतकात डोनेट्स्क शहराची स्थापना झाली. सोवियत रशियाच्या विघटनापूर्वी ब्रिटिश उद्योजक जॉन ह्यूज यांनी इथे स्टील प्लान्ट आणि खाणींचा पाया रचला. हळूहळू हा भाग अवजड उद्योगांच केंद्र बनत गेला.
सोवियत संघाच्या काळात डोनेट्स्क आणि आसपासच्या डोनबास क्षेत्राला औद्योगिक कणा म्हटलं जायचं. इथल्या कोळसा खाणी, कोकिंग कोल, स्टील संयंत्र, मशीन निर्माण आणि रेल्वे नेटवर्कने सोवियत रशियाची अर्थव्यवस्था आणि पुनर्निर्माणात महत्वाची भूमिका बजावली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात रणनितीक दृष्टीने हे क्षेत्र खूप महत्वाच होतं. जर्मन आणि सोवियत रशियामध्ये निर्णायक युद्ध याच ठिकाणी लढलं गेलय.
इथल्या लोकांनी युक्रेनला का स्वीकारलं नाही?
वर्ष 1991 मध्ये सोवियत युनियनच विघटन झालं. युक्रेन स्वतंत्र झाला. त्यावेळी डोनेट्स्क युक्रेनकडे गेलं. स्वतंत्र युक्रेनमध्ये डोनेट्स्क औद्योगिक उत्पादन, खाणकाम आणि निर्यातीच मोठ केंद्र राहिलं आहे. जागतिक बाजार, जुनी टेक्नोलॉजी आणि व्यवस्थापनाची आव्हान अशा कारणांमुळे नुकसानीमुळे अनेक खाणी बंद झाल्या. मात्र, असं असतानाही डोनाबास युक्रेनसाठी महसूल, अवजड उद्योग, धातू आणि ऊर्जा पुरवठ्यामध्ये निर्णायक ठरलं. या भागात रशियन भाषा बोलणाऱ्यांची संख्या आधीपासून जास्त आहे. म्हणून इथे राहणारे लोक मनापासून नव्या देशाचा स्वीकार करु शकले नाहीत. भाषा आणि आपली ओळख हे मुद्दे हळूहळू प्रभावी राजकीय मुद्दा बनत गेले. त्यातून फुटीरतवादाची चळवळ उभी राहिली.
सर्वात आधी क्रिमियावर ताबा
वर्ष 2014 मध्ये रशियाने युक्रेनचा महत्वपूर्ण हिस्सा क्रिमियावर ताबा मिळवला. त्यानंतर पूर्व युक्रेनमध्ये संघर्ष सुरु झाला. डोनेट्स्क आणि लुहान्स्कमधील रशियन समर्थित गटांनी पीपुल्स रिपब्लिक्सची घोषणा केली. युक्रेन सरकार आणि फुटीरतवादी गटांमध्ये लढाई सुरु झाली. रशियावर बाहेरुन समर्थन दिल्याचा आरोप झाला. वर्ष 2022 मध्ये रशियाच्या व्यापक आक्रमणानंतर युद्धाने एका नव्या टप्प्यात प्रवेश केला. रशियाने डोनेट्स्क, लुहान्स्क, जापोरिइ्जिया आणि खेरसॉन या भागांवर ताबा मिळवला. जनमताचा हवाला देत रशियाने या भागांचा आपल्या देशात समावेश केला. युक्रेन आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा याला विरोध आहे.
हा प्रदेश पुतिन यांच्यासाठी खजिनाच
रशिया आणि पुतिन यांच्यासाठी डोनेट्स्क खास आहे. अनेक अंगानी याचं महत्त्व आहे. डोनेट्स्क प्रांत रशियाची सीमा आणि रोस्तोव ऑन डॉन सारख्या रसक केंद्राच्या जवळ आहे. या भागावरील नियंत्रणामुळे रशियाचा क्रिमियापर्यंत रसद, इंधन आणि सैन्य सामानाच्या पुरवठ्याचा मार्ग सुरक्षित होतो. याच भागात मारियूपोल सारखी बंदर आहेत. तिथून रशियाला आपल्या सीमा बळकट करता येतात. युक्रेनी नौदलाच्या हालचाली मर्यादीत होतात. रशियाला समुद्री मार्गाने चालणारा व्यापार आणि सैन्य तैनातीचा फायदा मिळतो. अनेक अर्थांनी हा प्रदेश पुतिन यांच्यासाठी खजिनाच आहे.
युद्ध रणनिती आणि आर्थिक भरभराट
डोनबासमधील कच्चा माल विशेषकरुन कोकिंग कोल धातू महत्वाचा आहे. युद्धाने उत्पादन क्षमतेला मोठ्या प्रमाणात प्रभावित केलय. पण रशियाच्या दृष्टीने भविष्यात स्टील, मशीन निर्माण आणि ऊर्जा पुरवठा री-इंडस्ट्रियलायजेशन स्ट्रॅटेजीमध्ये महत्वाच योगदान देऊ शकतात. मारियूपोल येथील स्टील प्लान्ट आजोवस्ताल आणि इलिच प्रतीकात्मक आणि व्यावहारिक दोन्ही दृष्टीने महत्वपूर्ण आहे. रशियाला भविष्यात उद्योग क्षेत्रात याचा भरपूर फायदा आहे. म्हणून युद्ध रणनिती आणि आर्थिक भरभराट या दृष्टीने डोनबास रशियाला हवा आहे.

युक्रेनला हा भाग का हवा?
डोनेट्स्कवरील पकड रशियासाठी बफर झोनच काम करेल. सीमा क्षेत्र आणि क्रिमियाची सुरक्षा अधिक भक्कम होईल. युक्रेनसाठी रणनितीक दृष्टीने हे क्षेत्र महत्वाच आहे. कारण स्लावियान्स्क, क्रामातोर्स्क द्रुज्किवकाचा त्रिकोण, रेल्वे आणि लॉजिस्टिक्सच्या दृष्टीने खास आहे. याच कारणामुळे इथे लढाई बहुस्तरीय, मंदगतीने आणि अत्यधिक खर्चाची ठरत आहे. डोनेट्स्क मिळाल्यावर युद्ध थांबेल याची गॅरेंटी काय?
डोनेट्स्कवर रशियाचा कब्जा झाल्यास युद्ध थांबेल हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकच ते कठीण आहे. कारण युद्ध थांबवण्याचा निर्णय हा केवळ भू भाग ताब्यात घेण्यापर्यंत मर्यादीत नाहीय. यात देशांतर्गत राजकारण, सैन्य रणनितीचा आढावा, आंतरराष्ट्रीय दबाव, आर्थिक निर्बंधांची तीव्रता आणि भविष्याची सुरक्षितता असे अनेक मुद्दे यामध्ये आहेत. डोनाबासच स्वातंत्र्य आणि क्रिमियापर्यंत भूभाग मिळवल्याच रशिया जाहीर करु शकतो. पण इतरही अनेक मुद्दे आहेत. पुतिन हे रशियन जनतेला युद्ध जिंकल्याचा एक संदेश देऊ शकतात. पण रशियाची मागणी फक्त डोनेट्स्क मर्यादीत राहिल याची खात्री नाही. सुरक्षेची गॅरेंटी, यूक्रेनची भविष्यातील सैन्य स्थिती, नाटोसोबत संबंध असे अनेक मुद्दे आहेत. युक्रेनला नाटोची मदत मिळू नये, अशी सुद्धा रशियाची तीव्र इच्छा आहे. म्हणून डोनेट्स्क मिळाल्यावर युद्ध थांबणार याची गॅरेंटी कोणी घेऊ शकत नाही. युक्रेनही सहजासहजी सोडणार नाही.
रशियाला फायदा काय?
रशियाला डोनेट्स्कवर ताबा मिळाल्यानंतर तात्काळ सैन्य रणनितीक लाभ मिळेल. पूर्व आणि दक्षिण भागाला जोडणारी रेल्वे आणि रस्ते मार्गामुळे रसद पुरवठा सुरळीत होईल. आजोव समुद्राच्या किनाऱ्यावर नियंत्रणामुळे नौदलाचा धोका कमी होईल. जमीन मिळाल्यामुळे मिसाइल तैनातीचा पर्याय मिळेल. आर्थिक दृष्टीने दीर्घकालिन पुनर्निर्माण कॉन्ट्रॅक्ट, खाणकाम आणि औद्योगिकी करणाला चालना मिळेल.

फायद्याच्या मर्यादा काय?
युद्धाने डोनेट्स्कची अर्थव्यवस्था, आधारभूत संरचना आणि लोकसंख्येच भरपूर नुकसान केलय. खाणी बंद होणं, औद्योगिक संपत्तीच नुकसान, कुशल श्रमिकांच पलायन यामुळे पुनर्निर्माणाला अनेक वर्ष लागू शकतात. निर्बंध आणि भू राजनीतिक अनिश्चिततेमुळे गुंतवणूक आणि टेक्नोलॉजीच्या आधुनिकीकरणात अडथळे येतील. आंतरराष्ट्रीय मान्यतेशिवाय दीर्घकालिक आर्थिक लाभ मर्यादीत होतील.
युक्रेनचा दृष्टीकोनही महत्वाचा
युक्रेनसाठी डोनेट्स्क फक्त आर्थिक आणि औद्योगिक संपदा नाही. रणनीतिक दृष्टीने सुद्धा महत्वाचा भाग आहे. स्लावियान्स्क, क्रामातोर्स्क सारखी शहरं कमांड अँड कंट्रोल, रसद आणि मनोबलासाठी महत्वाची आहेत. युक्रेनी समाजात विस्थापित नागरिकांची घर वापसी एक संवेदनशील मुद्दा आहे.
