Passport Ranking : जपानचा पासपोर्ट ठरला जगभरात अव्वल, जाणून घ्या भारतीय पासपोर्टचा नंबर कितवा?

जगभरातील सर्व देशांच्या पासपोर्ट्सचे रँकिंग जाहीर झाले असून जपानचा पासपोर्ट अव्वल ठरला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, जपानचा पासपोर्ट पॉवरफुल ठरला असून त्या देशातील नागरिक 193 देश फिरु शकतात.

Passport Ranking : जपानचा पासपोर्ट ठरला जगभरात अव्वल, जाणून घ्या भारतीय पासपोर्टचा नंबर कितवा?
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 3:24 PM

Powerful Passport Ranking 2022: जगातील सर्व देशांच्या पासपोर्ट्सचे रँकिंग जाहीर झाले सर्वात पॉवरफुल आणि सर्वात खालच्या क्रमांकावर पासपोर्ट कोणत्या देशाचा हेही स्पष्ट झाले आहे. जपानचा (Japan) पासपोर्ट पुन्हा एकदा अव्वल ठरला आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्सने (Henley Passport Index) ही यादी जाहीर केली असून जपाननंतर, दुसऱ्या क्रमांकावर सिंगापूर आणि दक्षिण कोरिआ तर तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी व स्पेन यांचा पासपोर्ट आहे. या यादीत भारतीय (Indian Passport) पासपोर्ट 87 व्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानचा पासपोर्ट या यादीत शेवटच्या क्रमांकावर आहे. या रँकिंगनुसार , जपानचा पासपोर्ट प्रथम क्रमांकावर असून जपानी पासपोर्टधारक 193 देशांत व्हिसामुक्त अथवा व्हिसा ऑन अरायव्हल सुविधेसह प्रवास करू शकतात. तर दुसऱ्या क्रमांकावरील सिंगापूर आणि दक्षिण कोरिआचा पासपोर्ट असलेले नागरिक 192 देशांमध्ये जाऊ शकतात.

हेनली पासपोर्ट इंडेक्स म्हणज नक्की काय ?

‘हेनली ॲंड पार्टनर्स ‘ ही लंडनमधील इमिग्रेशन कन्सल्टन्सी दरवर्षी जगभरातील देशांचे पासपोर्ट रँकिंग जाहीर करते. कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात स्ट्राँग आहे आणि कोणत्या देशाचा पासपोर्ट कमकुवत हे यादीवरून कळू शकते. आता पॉवरफुल पासपोर्ट म्हणजे नक्की काय ? तर ज्या देशाचा पासपोर्ट सर्वात पॉवरफुल किंवा अव्वल ठरतो, तो पासपोर्ट बाळगणारे नागरिक जगातील जास्तीत जास्त देशांत जाण्यास आणि तिथे फिरण्यास पात्र ठरतात. उदाहरणार्थ – या यादीत जपानचा पासपोर्ट सर्वात अव्वल, म्हणजेच पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे जपानी पासपोर्ट आहे ते जगातील 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंगापूर आणि दक्षिण कोरिआचा पासपोर्ट बाळगणारे नागरिक 192 देशांत फिरू शकतात.

कसे ठरते पासपोर्ट रँकिंग ?

‘हेनली ॲंड पार्टनर्स ‘, ही जगातील 199 देशांची नावे त्यांच्या यादीत समाविष्ट करते. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनद्वारे (IATA)देण्यात येणाऱ्या डेटाद्वारे विविध देशांच्या पासपोर्टचे रँकिंग निश्चित करण्यात येते. ज्या देशातील नागरिकांना व्हिसाची आवश्यकता नसते, त्या देशाच्या पासपोर्टला पहिला क्रमांक दिला जातो. यामध्ये व्हिसा ऑन अरायव्हल आणि परदेश यात्रेशी संबंधित अनेक घटकांचा समावेस असतो, ज्या आधारे तुमच्या देशाचे पासपोर्ट रँकिंग ठरवले जाते.

हे सुद्धा वाचा

यादीत भारताचा पासपोर्ट 87 व्या स्थानावर

हेनली पासपोर्ट इंडेक्सच्या यादीत भारतीय पासपोर्ट 87 व्या स्थानावर आहे. ज्यांच्याकडे भारतीय पासपोर्ट असेल ते विना व्हिसा 60 देशांमध्ये प्रवास करू शकतात. तर या यादीत पाकिस्तान 109 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा पासपोर्ट ज्यांच्याकडे असेल ते 32 देशांत व्हिसाशिवाय फिरु शकतात. या यादीत सर्वात शेवटचे स्थान अफगाणिस्तानला मिळाले आहे. अफगाणिस्तान पासपोर्ट असलेले नागरिक 27 देशांमध्ये प्रवास करू शकतात.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.