केस अर्पण करण्यापासून ते दही भाताच्या प्रसादापर्यंत… तिरुपती बालाजी मंदिराबद्दलची ही रहस्य माहितीयेत?
भारतातील सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराची अनेक रहस्ये आहेत. भगवान व्यंकटेश्वर स्वामींना समर्पित हे मंदिर केवळ श्रद्धेचे केंद्र नाही, तर चमत्कारांनी भरलेले आहे. मूर्तीच्या केसांपासून ते दही भाताच्या प्रसादापर्यंत अशी अनेक रहस्ये आहेत ज्यांच्याबद्दल जाणून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. ती कोणते रहस्य आहेत ते जाणून घेऊयात.

देशभरात अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्याबद्दल अनेक गूढ रहस्य आहेत. त्या रहस्यांबद्दल बरेच रिसर्च केले गेले आहेत. काही मंदिरांची खासियतच त्यांची रहस्ये असतात. त्यातीलच एक मंदिर म्हणजे तिरुमला येथील तिरुपती बालाजी मंदिर. या मंदिरात जगभरातून भाविक येत असतात. हे मंदिर केवळ भक्तांच्या श्रद्धेचे केंद्र नाही तर अनेक रहस्यांनी भरलेले आहे. हे मंदिर खूपच खास मानलं जातं. या मंदिराशी संबंधीत अशी अनेक रहस्ये आहेत ज्याबद्दल कदाचितच माहित असेल. चला जाणून घेऊयात ती रहस्ये कोणती आहेत ती?
दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश राज्यात स्थित, तिरुपती बालाजी मंदिर भगवान विष्णूंचे अवतार श्री वेंकटेश्वर स्वामी यांना समर्पित आहे. मान्यतेनुसार, कलियुगात हे भगवान विष्णूंचे वैयक्तिक निवासस्थान मानले जाते आणि म्हणूनच, या मंदिरात वेंकटेश्वरांसमोर बोलून दाखवलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते.
तिरुपती बालाजी मंदिराबद्दलची ही 6 रहस्य…
दही आणि भात
तिरुपती बालाजीला प्रसाद म्हणून लाडू अर्पण केले जातात, परंतु लाडूंव्यतिरिक्त, त्यांना दही आणि भात अर्पण करण्याची परंपरा देखील आहे. दही आणि भात हा देवाचा पहिला नैवेद्य मानला जातो
केस दान करण्याची परंपरा
तिरुपती बालाजी मंदिरात केस दान करण्याची परंपरा देखील आहे. ही परंपरा सगळ्यांनाच माहित आहे. आख्यायिकेनुसार, भगवान विष्णूंनी कुबेर महाराजांकडून कर्ज घेतले होते आणि कलियुगाच्या समाप्तीपर्यंत ते परत करण्याचे वचन दिले होते. हे कर्ज फेडण्यासाठी, भक्त त्यांचे नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांचे केस दान करतात. केसांचे दान हे कर्जाचा हप्ता म्हणून त्याकडे पाहिले जाते. अशी यामागची कहाणी आहे.
View this post on Instagram
समुद्राच्या लाटांचा आवाज
तिरुपती बालाजी मंदिरातील वेंकटेश्वरांची मूर्ती भव्य आणि अद्वितीय आहे. असे मानले जाते की समुद्राच्या लाटांचा आवाज नेहमीच मूर्तीच्या मागून येतो. ज्या भक्तांनी लक्षपूर्वक ऐकले आहे त्यांनी तो आवाज ऐकला आहे. ही मूर्ती देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचेही अवतार मानली जाते, म्हणूनच बालाजी यांना पुरुष आणि महिला दोन्ही वस्त्रे परिधान करण्यात येतात.
मूर्तीच्या डोक्यावर असणारे केस खरे
तिरुपती बालाजी मंदिरातील मूर्तीच्या डोक्यावर असणारे केस खरे असल्याचेही म्हटले जाते. जे कधीही विस्कटत नाहीत किंवा खराब होत नाहीत तसेच कधीही त्या केसांमध्ये गुंता होत नाही. ते वर्षभर काळे आणि चमकदार राहतात. केसांव्यतिरिक्त, श्री वेंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीला उन्हाळ्यात घामही येतो. असेही म्हटले जाते.
तूप किंवा तेल नसूनही सतत तेवत राहणारा दिवा
तसेच मंदिरात एक दिवा नेहमीच जळत असतो. तो कधीही तूप किंवा तेलाने भरलेला नसतो, तरीही तो सतत तेवत राहतो. हा दिवा कधीही विझत नाही. प्रत्येकासाठी तो गूढतेचा स्रोत मानला जातो.
