एअर होस्टेसना विमानातील या गोष्ट अजिबात आवडत नाही? असतो त्याबद्दल प्रचंड राग; तुम्हाला धक्का बसेल
विमान प्रवासात आपण पाहिलं असेल की, एअर होस्टेस प्रवाशांची खूप काळजी घेतात.पण कधीकधी प्रवाशांच्या काही गोष्टी एअर होस्टेससाठी डोकेदुखी ठरतात. या गोष्टींचा एअर होस्टेसना प्रचंड राग आहे. त्यांना या गोष्टी अजिबात सहन होत नाहीत. अशा कोणत्या गोष्टी आहेत जाणून घेऊयात.

विमान प्रवासादरम्यानच्या अनेक गोष्टी चर्चेत येतच असतात. सोशल मीडियावर विमान प्रवासाबद्दल अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. तसेच विमान प्रवासच्याबाबतचे नियमांबद्दलही अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती केली जाते. तसेच विमान प्रवास कसा असतो. किंवा एअर होस्टेस विमानात कशापद्धतीने काम करत असतात. याबदद्लही बऱ्याच जणांना जाणून घेण्याची उत्सुकता असते.
कधीकधी प्रवाशांच्या काही गोष्टींमुळे एअर होस्टेसना त्रास होतो
दरम्यान एअर होस्टेस प्रवाशांची खूप काळजी घेत असतात. तथापि, कधीकधी प्रवाशांच्या काही गोष्टींमुळे त्यांना त्रासही होतो.कारण काहीवेळेला विमानात प्रवासी विचित्र गोष्टी करतात. एका वृत्तानुसार, एअर होस्टेसनी अशा काही गोष्टी उघड केल्या आहेत ज्या त्यांना सर्वात जास्त त्रास देतात.त्यांना या गोष्टींचा प्रचंड राग येत असतो. एअर होस्टेसनी प्रवाशांना प्रवास करताना हे वर्तन टाळण्याचे आवाहन केलं आहे.
प्रवासी शौचालयाचा दरवाजा बंद करत नाहीत
एअर होस्टेसनी अशा अनेकदा तक्रारी केल्या आहेत, की कधीकधी प्रवासी विमानात शौचालयाचा दरवाजा व्यवस्थित बंद करत नाहीत. त्यामुळे दुर्गंधही पसरतो. याबद्दल इतर प्रवासी तक्रार करतात.त्यामुळे एअर हॉस्टेसना त्रास सहन करावा लागतो.
प्रवाशांचे शौचालयात बराच वेळ राहणे
एवढेच नाही तर अनेकदा बरेच प्रवासी विनाकारण शौचालयात बराच वेळ घालवतात, ज्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होते.
अनेक प्रवासी विनाकारण स्टाफ एरियाच्या इथे उभे राहतात
अनेक प्रवासी विनाकारण स्टाफ एरियाच्या इथे वारंवार येत असतात, त्यामुळे तो एरिआ ब्लॉक होतो आणि स्टाफला किंवा एअर होस्टेसना येजा करण्यासाठी अडचण येते. यामुळे केवळ एअर होस्टेसला त्रास होत नाही तर आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो.
विमानात पाण्याचा गैरवापर
बरेच लोक विमानांमध्ये जास्त पाणी वापरतात आणि शौचालये अनावश्यक कचऱ्याने भरतात.
प्रवाशांची मनमानी
अनेकदा प्रवासी हे एअर होस्टेससोबत गैरवर्तन करतात. किंवा शुल्लक गोष्टींवरून वाद घालतात. मात्र एअर होस्टेसना प्रवाशांची नम्रपणेच बोलावं लागतं किंवा त्यांना समजवावं लागतं. त्यावेळी एअर होस्टेसना मनस्ताप सहन करावा लागतो.
वारंवार समज द्यावी लागते
प्रवाशांनी त्यांच्या गरजेनुसारच शौचालयाचा वापर करावा असा सल्ला एअर होस्टेस देतात. पण तरी देखील काही प्रवासी त्यांच्यासोयीनुसारच वागतात. त्यामुळे एअर होस्टेसना विनाकारण अशा शुल्लक गोष्टींसाठी त्या प्रवाशांच्या मागे लागावं लागतं, त्यांना वारंवार समज द्यावी लागते.
तर, विमान प्रवासादरम्यान प्रवाशांकडून घडणाऱ्या अशा काही गोष्टी असतात ज्या नक्कीच एअर होस्टेससाठी डोकेदुखी ठरतात. आणि त्यांचा विनाकारण वेळही वाया जातो.अशा गोष्टींचा एअर होस्टेसना प्रचंड राग आहे.
