दुबईतून सोनं आणण्यापूर्वी ही बातमी वाचा, नाही तर लागेल इतका मोठा दंड; जाणून घ्या नियम
भारतापेक्षा दुबईत सोनं फार स्वस्त आहे. त्यामुळे अनेक दुबईत जाऊन सोनं खरेदी करतात. पण तेथून सोनं भारतात आणण्यासाठी काही नियम आहेत. नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. अभिनेत्री रान्या राव हीला देखील असाच फटका बसला. तुरुंगवासाची शिक्षा तर झालीच वरून 102 कोटी रुपयांचा दंड भरावा लागला.

दुबईतून स्वस्तात सोनं आणण्याचा विचार करत असाल तर ही बातमी पहिल्यांदा वाचा. त्यानंतर धाडसी निर्णय घ्या. अन्यथा मोठा फटका बसू शकतो. भारताच्या दुबईत सोनं 8 ते 9 टक्के स्वस्त मिळतं. दुबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 85 ते 88 हजार रुपये प्रती 10 ग्राम आहे. भारताच्या तुलनेत 89 टक्के सोनं स्वस्त आहे. त्यामुळे दुबईत फिरण्यासाठी गेल्यानंतर तेथून सोनं खरेदी करण्याचा विचार मनात येतो. तेथून सोनं खरेदी करणं तसं तर सोपं आहे, पण त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. कारण नियमाबाहेर सोनं खरेदी करून भारतात आणण्याचा प्रयत्न कराल तर फटका बसू शकतो. कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला हा फटका बसला आहे. सोनं तस्करी प्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. तसेच तिच्याकडून 15 किलो सोनं जप्त केलं आहे. आता त्यावर 102 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्यामुळे सोनं किती आणता येतं हा प्रश्न प्रश्न आहे.
विदेशातून भारतात सोनं आणण्याचे नियम काय?
दुबईतून सोनं भारतात आणण्याचा विचार करत असाल तर भारत सरकारचे काही नियम आहेत. नियमानुसार सोनं आणलं तर त्यावर कोणत्याही कर भरावा लागत नाही. पण ठरलेल्या नियमाच्या जास्त सोनं आणलं तर तुम्हाला कस्टम टॅक्स भरावा लागेल. सरकारच्या नियमानुसार, भारतीय पुरुष 50 हजारापर्यंत दागिने विना टॅक्स आणू शकतो. महिलांसाठी हा नियम 1 लाखापर्यंत आहे. तर 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाला इतकी सूट दिली जाते. ही सूट फक्त आणि फक्त सोन्याच्या दागिन्यांवर आहे. सोन्याचं बिस्किट किंवा नाण्यावर नाही. इतकंच काय तर तुमच्याकडे सोनं खरेदीचं पक्कं बिल असणं आवश्यक आहे. नाही तर सोनं जप्त होऊ शकतं.
ठरलेल्या नियमापेक्षा जास्तीचं सोनं आणलं असेल तर तुम्हाला कस्टम ड्युटी भरावी लागेल. सोन्याच्या वजनावर हा टॅक्स ठरवला जातो. जर तुम्ही सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ परदेशात वास्तव्यास असाल तर तुम्ही एक किलो सोनं आणू शकता. पण यासाठी तुम्हाला कर भरावा लागेल. 20 ते 50 ग्रॅम सोन्यासाठी 3 टक्के, 50 ते 100 ग्रॅम सोन्यासाठी 6 टक्के, तर 100 ग्रॅमपेक्षा जास्त सोन्यासाठी 10 टक्के कर भरावा लागेल. महिला आणि मुलांसाठी ही मर्यादा दुप्पट आहे. पण खरेदीचं बिल असणं आणि कस्टम अधिकाऱ्याला माहिती देणं भाग आहे. नाही तर तस्करीच्या आरोपाखाली तुम्हाला मोठा दंड आणि तुरुंगवास भोगावा लागू शकतो.
