कोड नाही कॅमेरा! टीव्हीवर दिसणारे क्रमांक असतात कार्यक्रमाचे ‘सिक्युरिटी गार्ड’, जाणून घ्या अधिक…

जेव्हा आपण टीव्ही पाहता, तेव्हा आपण त्यावरच लक्ष केंद्रित करता. मग, ते आपली आवडती टीव्ही मालिका असो किंवा क्रिकेट सामना असो किंवा विनोदी कार्यक्रम असो किंवा चित्रपट. बरेच लोक हा टीव्ही इतक्या भारावून पाहतात की, त्यांना त्यावेळी टीव्ही स्क्रीनकडे बघण्याशिवाय दुसरे काहीही करायचे नसते.

कोड नाही कॅमेरा! टीव्हीवर दिसणारे क्रमांक असतात कार्यक्रमाचे ‘सिक्युरिटी गार्ड’, जाणून घ्या अधिक...
टीव्ही कोड
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 9:44 AM

मुंबई : जेव्हा आपण टीव्ही पाहता, तेव्हा आपण त्यावरच लक्ष केंद्रित करता. मग, ते आपली आवडती टीव्ही मालिका असो किंवा क्रिकेट सामना असो किंवा विनोदी कार्यक्रम असो किंवा चित्रपट. बरेच लोक हा टीव्ही इतक्या भारावून पाहतात की, त्यांना त्यावेळी टीव्ही स्क्रीनकडे बघण्याशिवाय दुसरे काहीही करायचे नसते. कदाचित आपल्याबरोबरही असेच होत असेल. परंतु, जेव्हा आपण गर्क होऊन टीव्ही पाहता, तेव्हा आपल्याला कधीकधी टीव्हीच्या स्क्रीनवर एक प्लेट दिसते, ज्यावर काही कोड नंबर लिहिलेले असतात (Know the reason of that number strip showing between the programs).

आपल्याला कदाचित हे लक्षात आले नसेल, परंतु असे बरेच लोक आहेत ज्यांना याचा खूप त्रास होतो. बर्‍याचदा असे होते की, क्रिकेट सामन्यादरम्यान ते अक्षरशः क्रिकेटरच्या तोंडावरही येतात. कधीकधी तो स्क्रीनच्या खालच्या बाजूस येतात, तर कधीकधी ते टीव्हीच्या वरच्या भागावर असतात. तुम्हीसुद्धा याकडे पाहिल्यानंतर कदाचित नेहमीच दुर्लक्ष केले असेल, पण ते नेमकं काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तसेच, हे पुन्हा पुन्हा टीव्ही स्क्रीनवर का येते?

या कोडमुळे नेमके काय होते?

हा एक विशिष्ट प्रकारचा कोड आहे, ज्यास ट्रॅकिंग कोड देखील म्हटले जाऊ शकते. वास्तविक, हा कोड फक्त ट्रॅकिंगसाठी उपयुक्त आहे. हे आपल्या टीव्ही ऑपरेटरद्वारे नाही, तर टीव्ही चॅनेलद्वारे उत्पन्न केले आहे. आपल्या टीव्हीवर देखील दाखवले जाते. याचा अर्थ असा नाही की, आपण दिल्लीमध्ये एखादा कार्यक्रम पहात असाल आणि आपल्याला स्क्रीनवर कोड दिसला असेल आणि तोच कोड मुंबईत बसलेल्या व्यक्तीला दिसेल. चॅनेल प्रदेशानुसार चॅनेल अल्गोरिदमद्वारे ही रँडम संख्या पट्टी उत्पन्न करते.

हा कोड प्रत्येक परिसराच्या आधारे तयार केला जातो आणि थोड्या थोड्या वेळाने एकदा टीव्हीवर प्रसारित होतो. आता हा कोड काय आहे आणि तो कसा उत्पन्न होतो, हे आपल्याला समजले असेलच. चॅनेल हा कोड का उत्पन्न करते, हा कोड उत्पन्न करून चॅनेलला काय फायदा आहे, जाणून घेऊया…

काय करतो हा कोड?

कोणत्याही कार्यक्रमाच्या मध्यभागी ही संख्या रँडम प्रतिबिंबित होत राहते आणि त्यामागील हेतू हा आहे की, ही सामग्री रेकॉर्ड केली जाऊ नये. या कोडच्या माध्यमातून हा प्रयत्न केला गेला आहे की, हा व्हिडीओ कोणीही वापरू किंवा कॉपी करू शकणार नाही. उदाहरणार्थ, जर एखाद्याने टीव्हीवर प्रसारित केलेला प्रोग्राम किंवा कोणतीही कॉपीराइट केलेली सामग्री रेकॉर्ड केली असेल, तर स्क्रीनवर प्रतिबिंबित होणारी संख्या त्यातही येते.

आता जेव्हा हा व्हिडीओ इतर कोठेही प्रसारित केला जातो, तेव्हा टीव्ही मालिका आणि कार्यक्रम कोणत्या क्षेत्रातून कॉपी केले गेले आहे, हे शोधणे सोपे होते. केवळ या नंबर स्ट्रिपद्वारेच मीडिया कंपन्या ज्या ठिकाणी टीव्ही शो कॉपी झाला आहे, याचा शोध लावू शकतात आणि त्या ठिकाणचा सहजपणे मागोवा घेऊ शकतात. यानंतर, पायरेटेड सामग्री रोखण्याचे प्रयत्न केले जातात.

(Know the reason of that number strip showing between the programs)

हेही वाचा :

कसा नोंदवला जातो FIR? काय आहेत आपले हक्क? जाणून घ्या संपूर्ण माहिती…

प्रवासादरम्यान दिसणारे हिरव्या-पिवळ्या-पांढऱ्या रंगाचे मैलाचे दगड नेमकं काय सांगतात? जाणून घ्या या रंगांचा अर्थ!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.