AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM मोदी दौऱ्यावर असणाऱ्या उझबेकिस्तान, किर्गिस्तानमध्ये भारताच्या 500 रुपयांची किंमत किती?

Indian 500 Rupees Value : PM नरेंद्र मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दोन्ही देशांमध्ये भारतीय 500 रुपयांची किंमत किती आहे ते जाणून घेऊयात.

PM मोदी दौऱ्यावर असणाऱ्या उझबेकिस्तान, किर्गिस्तानमध्ये भारताच्या 500 रुपयांची किंमत किती?
India Curnecy price in uzb krgImage Credit source: AI
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 29, 2026 | 5:30 PM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानच्या चार दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. या दौऱ्याची सुरुवात उझबेकिस्तानपासून होणार आहे. 29 आणि 30 ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या निमंत्रणावरून उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे भेट देणार आहेत. त्यानंतर ते किर्गिस्तानला रवाना होतील. या दोन्ही देशांमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक राहतात, तसेच अनेक भारतीय पर्यटकही या देशांना भेट देत असतात. आज आपण या दोन्ही देशांमध्ये भारतीय 500 रुपयांची किंमत किती असते ते जाणून घेऊयात.

ताश्कंद येथील भारतीय दूतावासाच्या माहितीनुसार, उझबेकिस्तानमध्ये सुमारे 20 हजार भारतीय नागरिक राहतात. यामध्ये जवळपास 16 हजार भारतीय विद्यार्थी ताश्कंद, समरकंद आणि बुखारा यांसारख्या शहरांमधील विविध सरकारी विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. 2024 मध्ये सुमारे 72 हजार भारतीय पर्यटकांनी उझबेकिस्तानला भेट दिली होती. तर किर्गिस्तानमध्ये सुमारे 15 हजार भारतीय नागरिक राहतात आणि शिक्षण घेत आहेत. त्यामुळे उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानमध्ये भारतीय 500 रुपयांची किंमत किती होते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे,

उझबेकिस्तानमध्ये भारतीय चलनाची किंमत किती?

सोम हे उझबेकिस्तानचे अधिकृत चलन आहे. सोमचा चलन कोड UZS आहे. देशाच्या चलन व्यवस्थेचे नियंत्रण सेंट्रल बँक ऑफ रिपब्लिक ऑफ उझबेकिस्तानकडून केले जाते. ‘सोम’ हा शब्द तुर्किक भाषांमधून आला असून त्याचा अर्थ शुद्ध असा होतो. ऐतिहासिकदृष्ट्या हा शब्द शुद्ध सोन्याच्या नाण्यांशी संबंधित आहे. उझबेकिस्तानमध्ये भारतीय 100 रुपये सुमारे 12371 उझबेकिस्तानी सोम इतके होतात. त्यानुसार भारतीय 500 रुपयांची किंमत सुमारे 61857 उझबेकिस्तानी सोम इतकी होते. त्यामुळे उझबेकिस्तानमध्ये भारतीय चलनाचे रूपांतर केल्यास त्याची स्थानिक चलनातील रक्कम मोठी दिसते.

किर्गिस्तानमध्ये भारतीय चलनाची किंमत किती?

किर्गिझ सोम हे किर्गिस्तानचे अधिकृत चलन आहे. भारताचे 100 रुपये किर्गिस्तानमध्ये सुमारे 94 किर्गिझ सोम इतके होतात. त्यानुसार भारतीय 500रुपयांची किंमत सुमारे 457 किर्गिझ सोम इतकी होते. उझबेकिस्तानप्रमाणे किर्गिस्तानच्या चलनाच्या नावातील ‘सोम’ हा शब्दही तुर्किक भाषांमधून आला आहे. 10 मे 1993 रोजी किर्गिझ सोम चलनात आणण्यात आले आणि त्याने सोव्हिएत रूबलची जागा घेतली. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर स्वतःचे नवीन चलन जारी करणाऱ्या देशांमध्ये किर्गिस्तानचा समावेश होतो.

Follow Us
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; व्हिडिओ व्हायरल
Viral Video : बँकेत कर्मचारी केक कापण्यात व्यस्त, शेतकरी मात्र...; बुलडाण्यातील व्हिडिओ व्हायरल