Same Day : दिवस-रात्र आज समसमान, वसंत ऋतू आणि समान दिवसाचं गणित काय?

Same Day : दिवस-रात्र आज समसमान, वसंत ऋतू आणि समान दिवसाचं गणित काय?
Day Night Same
Image Credit source: social

तुम्हाला माहिती आहे का, दरवर्षी काही ठरावीक दिवशी बोललं जातं, की आजची रात्र आणि दिवस समसमान आहे. आता रात्र आणि दिवस समसमान कसा, नेमकं या मागचं काय गणित आहे, हा दिवस कधी येतो, कोणत्या ऋतूमध्ये येतो ते आपण जाणून घेऊय. 

शुभम कुलकर्णी

|

Mar 21, 2022 | 7:21 AM

दरवर्षी 21 मार्च (March) आणि सप्टेंबर महिन्याच्या 22 तारखेला दिवस आणि रात्र प्रत्येकी 12 तासांची म्हणजे सारखी असते. या विशेष दिवसाला खगोल अभ्यासक ‘विषुवदिन’ असं म्हणतात. सर्वसामान्यपणे 23 सप्टेंबर, 21 मार्चला आपल्याकडे देखील दिवस-रात्र (Day Night) समान (same)असते. दिवस रात्र छोटे मोठे हे पृथ्वीच्या कलण्यामुळे होतात. पृथ्वीचा अक्ष हा 23.5 अंशाने कललेला आहे. जो गोलार्ध सूर्याकडे कलतो. त्या गोलार्धात दिवस 12 तासापेक्षा मोठा आणि रात्र 12 तासांपेक्षा लहान असते. जेव्हा कोणताही गोलार्ध सूर्याकडे कललेला नसतो तेव्हा पृथ्वीवर दिवस आणि रात्री हा सारख्या तासांची असते. सारखी असते म्हणजे 12-12 तासांचा दिवस आणि रात्र असतो. अक्षवृत्तीय स्थानानुसार हा फरक कमी-अधिक काही आठवड्यांचाही असू शकतो. अंशावर 23 सप्टेंबरला दिवस-रात्र समान असते. त्यामुळे 21 मार्च आणि 22 सप्टेंबरला हौशी लोक याचा अनुभव घेतात. पण, त्यासाठी आपल्याला दिवस आणि रात्र कशी समसमान असते याविषयी जाणून घ्यायला हवं.

सौर मंडल म्हणजे काय?

विषुववृत्त समजून घेण्यासाठी तुम्हाला आधी सौर मंडळ म्हणजे काय, ते जाणून घेनं आवश्यक आहे. पृथ्वी त्याच्या अक्षांवर फिरत असते. त्यामुळे ती 23.5 डिग्रीवर झुकलेली आहे. पृथ्वीला एक गोल पूर्ण करण्यासाठी 24 तासांचा कालावधी लागतो. सूर्यप्रकाशाच्या भोवती गर्दी असते म्हणून वर्षभरात हा ग्रह हळूहळू त्याच्या अक्षावर झुकतो. अर्ध्या वर्षासाठी, उत्तरी गोलार्ध-ग्रह ज्याचा विषुववृत्तवर आहे. त्याचा भाग दक्षिणी गोलार्धापेक्षा जास्त सूर्यप्रकाश प्राप्त करतो. दुसऱ्या अर्ध्या भागासाठी, दक्षिणी गोलार्ध अधिक सूर्यप्रकाश प्राप्त करतो. पण प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या दोन दिवसांत, दोन्ही गोलार्धांना एक समान सूर्यप्रकाश प्राप्त होतो. या दोन दिवसाला समतुई म्हणतात, लॅटिन शब्द म्हणजे “समान रातों”

समान दिवस-रात्र कुठे, कधी?

उत्तर गोलार्ध
1. 15 अक्षांश : ३० सप्टेंबरला (भारत)
2. 20 अक्षांश : 28 सप्टेंबर
3. 30 अक्षांश : 30 सप्टेंबरला
दक्षिण गोलार्ध
1. 15 अक्षांश : 14 सप्टेंबर
2. 20 अक्षांश : 16 सप्टेंबर
3. 30 अक्षांश : 18 सप्टेंबर

वातावरणातील बदल महत्वाचे

ज्या दिवशी दिवस आणि रात्र समसमान असते. त्यादिवशी वातावरणातील बदल महत्वाचे असतात. वातावरणातील अपप्रवृत्तीमुळे हवेतील दाब आणि आर्द्रता यासारख्या गोष्टींवर देखील अनेक बदल अवलंबून असतात. समान दिवस हा फक्त वर्षातून दोनदा येतो. त्यामुळे एकदा तरी ही महत्वपूर्ण माहिती जाणून घ्यायला हवी.
इतर बातम्या
उन्हाळ्यात आजारांपासून दूर राहण्याचे उत्तम उपाय, काही मोजक्या गोष्टी पाळा
Russia Ukraine War : रशिया यूक्रेन युद्ध मिटण्याची चिन्ह! पुतिनसोबत चर्चेला तयार, झेलेन्स्की यांचं मोठं वक्तव्य
तुम्हालाही गुडघे आणि सांधेदुखीचा त्रास होतोय? नैसर्गिक पद्धतीने मिळवा आराम

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें