AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात आजारांपासून दूर राहण्याचे उत्तम उपाय, काही मोजक्या गोष्टी पाळा

आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे(Health Tips). आहारात अशा पदार्थांचा समावेश करा जे आपल्याला उष्णतेपासून आराम देण्याचे काम करतात. उन्हाळ्यात उष्माघात, अन्न नीट न पचणे, डिहायड्रेशन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

उन्हाळ्यात आजारांपासून दूर राहण्याचे उत्तम उपाय, काही मोजक्या गोष्टी पाळा
उन्हाळ्यात विशेष काळजी घ्याImage Credit source: tv9
| Updated on: Mar 20, 2022 | 11:01 PM
Share

मुंबई : सध्या कडाक्याच्या उन्हाने (Heat) आपण हैराण झालो आहोत. राज्यातल्या अनेक जिल्ह्याचा पारा चाळीशीपार गेलाय. हा पारा आणखी चढण्याची शक्याता आहे. तसा अलर्टही हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात (Summer) तुम्हाला स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कडक उन्हाळ्यात आपण निरोगी जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे. आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे(Health Tips). आहारात अशा पदार्थांचा समावेश करा जे आपल्याला उष्णतेपासून आराम देण्याचे काम करतात. उन्हाळ्यात उष्माघात, अन्न नीट न पचणे, डिहायड्रेशन अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा परिस्थितीत, आपण शरीर हायड्रेटेड ठेवणे आणि आरोग्यदायी सवयी अंगिकारणे महत्वाचे आहे. हलके आणि लहान जेवण नियमितपणे खा. जास्त कार्बोहायड्रेट आणि फॅट्स असलेले जड जेवण शरीरात उष्णता निर्माण करते. तुमच्या आहारात ताजी फळे आणि भाज्यांचा भरपूर प्रमाणात पाण्याचा समावेश करा. यामध्ये संत्री, टरबूज आणि टोमॅटो यांसारख्या पदार्थांचा समावेश होतो.

कडक उन्हापासून स्वतःचे रक्षण करा

प्रखर सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्यामुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आणि सनबर्न टाळण्यासाठी, प्रत्येक वेळी घराबाहेर पडताना सनस्क्रीन लावा. जास्त सूर्यप्रकाशामुळे सूज येणे, जळजळ होणे किंवा त्वचेच्या इतर कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू शकते.

भरपूर पाणी प्या

उष्णतेमुळे आणि घामामुळे तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवते. स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या. आइस्ड टी, हर्बल टी, साधे पाणी, नारळ पाणी, लिंबू आणि काकडीचे तुकडे असलेले पाणी इत्यादी पेये प्या.

आराम करा

उन्हाळ्याचे दिवस लांब आणि थकवणारे असतात. थकवा टाळण्यासाठी तुम्हाला पुरेशी विश्रांती आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, रात्री सुमारे 7 ते 9 तासांची झोप घेतली पाहिजे. रात्रीच्या जेवणात हलके अन्नही खावे जेणेकरुन पचनास मदत होते आणि झोप येण्यास त्रास होत नाही.

व्यायाम करा

हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात सकाळी उठणे कमी अवघड असते. अशा स्थितीत सकाळी लवकर उठून योगासने आणि व्यायाम करा. हे तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवण्याचे काम करते. तसेच तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते.

खाद्यपदार्थांमधील विविधता हीच भारताची ओळख, स्ट्रीट फूड आवडणाऱ्यांनी देशाच्या कानाकोपऱ्यातीन हे पदार्थ खाल्लेच पाहिजेत!

प्रसूतीनंतरही रहा ‘फिट अँड फाइन’… असा ठेवा आहार, पोटाचे विकारही होतील दूर

उन्हाळ्यात कोणते कपडे घालावेत? Kriti Sanonची स्टाईल कॉपी करा, दिसा स्टायलिश आणि राहा कंफर्टेबल!

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.