Water resources works in Nashik | नाशिकमध्ये जलसंपदांच्या कामांना मुहूर्त; कोणती कामे होणार?

Water resources works in Nashik | नाशिकमध्ये जलसंपदांच्या कामांना मुहूर्त; कोणती कामे होणार?
नाशिक जिल्ह्यातील जलसंपदेची कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.

बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जलसंपदा विभागांतर्गत प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून समन्वयाने व नियोजनपूर्वक काम करणे आवश्यक आहे. तसेच ज्या भागात भूसंपादनाचा विषय येत असेल, त्या ठिकाणी एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून दर निश्चित करण्यात यावा.

मनोज कुलकर्णी

|

Mar 21, 2022 | 7:07 AM

नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) जलसंपदांच्या (Water Resources) कामांना मुहूर्त लागला आहे. जिल्ह्यातील दरसवाडी-डोंगरगाव पोहच कालवा भूसंपादन, नाशिक पाटबंधारे विभागाकडील नाले दुरुस्ती, पूररेषा नियंत्रण, ओझरखेड कालवा चारी दुरूस्ती, विस्तारीकरण व पूल बांधणी, पालखेड डावा कालव्यावर एस्केप गेट बसविणे इत्यादी कामे शेतकऱ्यांना प्राधान्य देवून वेळेत पूर्ण करावीत. ज्या कामांसाठी शासकीय पातळीवर मान्यतेची आवश्यक आहे, (Chhagan Bhujbal) त्या कामांबाबत कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव सादर केल्यास शासन स्तरावर सर्वोतपरीने मदत करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत बैठक झाली. या बैठकीत भुजबळ बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी गंगाथरन डी., जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता डॉ. संजय बेलसरे, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, अहमदनगरचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, चांदवडचे प्रांताधिकारी सी. एस. देशमुख, पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, नाशिक पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता सागर शिंदे, नाशिक लघु पाटबंधारे विभागाचे सचिन पाटील, नांदूर मध्यमेश्वर प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संगिता जगताप आदी उपस्थित होते.

भूसंपादनात अन्याय नको…

बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जलसंपदा विभागांतर्गत प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून समन्वयाने व नियोजनपूर्वक काम करणे आवश्यक आहे. तसेच ज्या भागात भूसंपादनाचा विषय येत असेल, त्या ठिकाणी एकाही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेवून दर निश्चित करण्यात यावा. ज्या ठिकाणी कामे चालू किंवा प्रलंबित आहेत, अशा ठिकाणी प्रत्यक्ष अधिकारी व कर्मचारी यांनी क्षेत्रिय भेट देवून तेथील प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.

या कामांचा घेतला आढावा…

दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालवा काजीसांगवी ता. चांदवड येथील भूसंपादन, नांदूरमध्यमेश्वर ते संवत्सर, खेडलेझुंगे, कानळद पूररेषा निश्चित करणे, रुई, देवगाव, खेडलेझुंगे, कोळगाव, कानळद, वाकद शिरवाडे या परिसरात नाल्यांच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांची दरवर्षी होणारी नुकसान टाळण्यासाठी करावयाची कार्यवाही, देवगाव, रुई, कोळगाव, कानळद (देवगाव) गोदावरी कालवा 15 नंबर व नाला 7 नंबर मोऱ्यापर्यंत खोदकाम करून चर काढणे (पावसाचे पाणी), गोदावरी डावा तट कालवा साखळी क्रमांक 20500 ते 21300 मीटरमध्ये विशेष दुरुस्ती व अंतर्गत कालव्यास अस्तरीकरण करणे या कामाच्या अंदाजपत्रकास मान्यता मिळणेबाबत कामांचा प्रस्ताव तयार करून तो तात्काळ सादर करण्यात यावा, अशा सूचना पालकमंत्री भुजबळांनी दिल्या.

पालखेड कालवा भूमिगत होणार…

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, गोदावरी डावा कालवा 25 नंबर चारी जऊळकेपासून मुखेड पर्यंत स्वतंत्र करावा, गोदावरी कालवा-चारी क्रमांक 3 मुखेड येथे पाणी मिळत नसल्याने दुरुस्ती करणे, पालखेड डावा कालव्यावर थेट विमोचक बसविणे तसेच ओझरखेड कालव्यातून खडक माळेगाव पाणी पुरवठा योजनेसाठी 49 किलो मीटरमध्ये एस्केप गेट बसविणे या कामांचा प्रस्ताव तयार करून ही कामे लवकर सुरू करण्यात यावी. तसेच रयत शिक्षण संस्था विंचूर येथे पालखेड डावा कालवा भूमिगत करणेबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला असून, हे कामही लवकरच सुरू करण्यात येईल.

कामे जलदगतीने करण्याच्या सूचना…

पुणेगाव दरसवाडी कालवा किलोमीटर 1 ते 25 विस्तारीकरण आणि सदर कालव्यावरील वणी येथील बोगद्याच्या विस्तारीकरणाचे काम, पुणेगाव-दरसवाडी कालवा व दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याचे अपूर्ण काम यांत्रिकी विभागाकडून पूर्ण करणे, ओझरखेड कालवा दोन उन्हाळी आवर्तने देण्याबाबत (खडकमाळेगाव), पालखेड डावा कालवा 111 कि.मीमध्ये कालव्यावर सोनवणे वस्तीकडे जाण्यासाठी पूल बांधणे या कामांचा आढावा घेऊन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचनाही यावेळी संबंधित विभागाला दिल्या.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें