AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिमार्टच्या महसूलात दणदणीत वाढ, कमाईच कमाई, 19206 कोटी थेट..

डिमार्टकडून ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी कायमच मोठ्या ऑफर आणल्या जातात. एकावर एक वस्तूही मोफतमध्ये दिल्या जातात. डिमार्टचे ग्राहक दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. त्यातच आता डिमार्टने धमाकेदार कामगिरी केल्याचे आकड्यांवरून दिसतंय.

डिमार्टच्या महसूलात दणदणीत वाढ, कमाईच कमाई, 19206 कोटी थेट..
DMart
| Updated on: Oct 04, 2026 | 2:11 PM
Share

ग्राहकांचे आवडते ठिकाण खरेदीचे कोणते असेल तर ते नक्कीच डिमार्ट आहे. डिमार्टमध्ये पैशांची मोठी बचत होते, शिवाय एकावर एक गोष्टी मोफतमध्ये मिळतात. आज डिमार्टमध्ये जवळपास वस्तूंवर मोठी सवलत दिली जाते. विशेष म्हणजे एमआरपीपेक्षा कितीतरी पट्ट स्वस्त वस्तू मिळतात. डिमार्टमध्ये खरेदीसाठी गेले की, पैशांची बचत होते म्हणजे होतेच. डिमार्टमध्ये इतके स्वस्त वस्तू मिळण्याचे कारण म्हणजे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते, ज्यामुळे बाहेरील दुकानांपेक्षा जास्त स्वस्तात वस्तू मिळतात. विक्रेते जास्त प्रमाणात डिमार्ट खरेदी करत असल्याने त्यांना मोठी डिस्काऊंट देतात आणि डिमार्ट ग्राहकांना. डिमार्टमध्ये कधीही गेले तरीही तूफान गर्दी असते, त्यातच सुट्टीच्या दिवशी डिमार्टमध्ये गेले की, पाय ठेवायलाही साधी जागा नसते.

डिमार्टमध्ये एका छताखाली आज आपल्याला प्रत्येक गोष्ट मिळते. किराणा, घरात लागणाऱ्या वस्तू, कपडे, भांडी, शालेय साहित्य यासोबतच सणावाऱ्यांनुसारही डिमार्टमध्ये वस्तू ठेवल्या जातात. पावसाळा आला की, छत्रीपासून सर्व मिळते. उन्हाळा असो किंवा हिवाळा प्रत्येक गोष्ट डिमार्टमध्ये आज मिळते. जवळपास लोक डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर भर देतात.

त्यातच आता डिमार्टच्या तीन महिन्यांच्या कमाईची आकडेवारी पुढे आली. डिमार्ट ही किरकोळ विक्री साखळी चालवणाऱ्या ॲव्हेन्यू सुपरमार्ट्सने 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीसाठी कामकाजातून मिळणाऱ्या स्वतंत्र महसुलात तब्बल 18,4  टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. ही एक अत्यंत मोठी वाढ म्हणावी लागणार आहे. हा महसूल 19,206.18 कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

शनिवारी फाइलिंगद्वारे माहिती देताना कंपनीने सांगितले की, वर्षभरापूर्वी याच कालावधीत कामकाजातून मिळणारा महसूल 16,218,79 कोटी होता. तिमाहीच्या अखेरीस दिलेल्या माहितीमध्ये कंपनीने नमूद केले की, 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी कामकाजातून मिळणारा स्वतंत्र महसूल हा 19,206.18 कोटी रुपये इतका होता.

दमानी कुटुंबाद्वारे असलेल्या किरकोळ विक्री साखळीच्या स्टोअर्सची संख्या 30 सप्टेंबरपर्यंत 518 होती. परभणीसह अन्य काही शहरात नव्याने स्टोर सुरू केली आहेत. तिमाही दर तिमाही आधारावर डिमार्टच्या महसुलात 4.7 टक्क्यांची वाढ झाली. जून तिमाहीत कंपनीचा महसूल 18,343.49 कोटी रुपये इतका होता.

राधाकिशन दमानी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुरू केलेली डिमार्ट ही कंपनी महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, एनसीआर, तामिळनाडू, पंजाब आणि राजस्थान यांसारख्या विविध बाजारपेठांमध्ये विक्री करते. डिमार्टमध्ये खरेदी करण्यावर ग्राहकांचा अधिक भर असतो.

Follow Us
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी