AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विदेश दौऱ्यावर जाताय? ही 5 कागदपत्रं असतील सोबत तर होईल प्रवास सुरळीत

विदेश प्रवास म्हणजे नवे अनुभव, नवे लोक आणि नवी संस्कृती यांचा संगम. मात्र हे सगळं सुरळीत पार पाडण्यासाठी योग्य तयारी अत्यावश्यक आहे. या लेखात दिलेली सर्व आवश्यक कागदपत्रं नक्की सोबत ठेवा, तुमचा प्रवास नक्कीच सुखद आणि अडथळ्याविना होईल.

विदेश दौऱ्यावर जाताय? ही 5 कागदपत्रं असतील सोबत तर होईल प्रवास सुरळीत
tourist with luggage
| Updated on: Jul 11, 2025 | 4:05 PM
Share

विदेशात प्रवास करणं हा एक रोमांचक अनुभव असतो. पण यासाठी फक्त पासपोर्ट असून भागत नाही, तर इतर महत्त्वाचे कागदपत्रंही बरोबर असणं गरजेचं असतं. हे डॉक्युमेंट्स तुमच्या ओळखीची खात्री करतात आणि कोणत्याही अनपेक्षित परिस्थितीत तुमचं संरक्षण करतात. विमानतळावर किंवा परदेशात प्रवेश करताना जर एकही आवश्यक कागद सापडला नाही, तर तुमचं संपूर्ण प्लॅन कोलमडू शकतं. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ट्रिपवर जाताना कोणते 5 डॉक्युमेंट्स नेहमी जवळ ठेवावेत, ते जाणून घेऊया.

1. पासपोर्ट

विदेशात जाण्यासाठी वैध पासपोर्ट ही सगळ्यात मूलभूत गरज आहे. तुमचा पासपोर्ट किमान 6 महिने वैध असावा आणि त्यामध्ये 2 ते 4 पानं रिकामी असणं आवश्यक आहे. यामुळे व्हिसा व इमिग्रेशन स्टॅम्प सहजपणे लागतो. तसेच, पासपोर्टची फोटोकॉपी आणि डिजिटल कॉपी (Google Drive किंवा ईमेलमध्ये) सेव करून ठेवा.

2. व्हिसा

बहुतेक देशांमध्ये जाण्यासाठी व्हिसा लागतो. काही देश व्हिसा ऑन अरायव्हल देतात, पण बर्‍याच वेळा तुम्हाला आधीच व्हिसा मिळवावा लागतो. व्हिसाचे नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा. कनेक्टिंग फ्लाइट असल्यास ट्रान्झिट व्हिसा लागतो का, हेही तपासा.

3. आयडी प्रूफ

हॉटेल बुकिंग, करंसी एक्सचेंज किंवा इमरजन्सीच्या वेळी दुसरा ओळखपत्र उपयोगी ठरतो. तुमच्याकडे यापैकी एक असणं आवश्यक आहे:

1. ड्रायव्हिंग लायसन्स

2. आधार कार्ड

3. पॅन कार्ड

4. मतदार ओळखपत्र

4. बुकिंग प्रूफ

विमानतळ किंवा इमिग्रेशनच्या वेळी तुमच्याकडून ट्रिपचा तपशील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे प्रूफ प्रिंट आणि डिजिटल दोन्ही स्वरूपात ठेवा:

1. फ्लाइट तिकीट (रिटर्न तिकीटसह)

2. हॉटेल बुकिंग कन्फर्मेशन

3. ट्रिपचा तपशील / इटिनरेरी

5. ट्रॅव्हल इन्शुरन्स

शेंगेन देशांसह अनेक देशांमध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्स आवश्यक आहे. ही पॉलिसी वैद्यकीय आपत्कालीन स्थिती, फ्लाइट रद्द होणं, सामान हरवणं यासारख्या प्रसंगांमध्ये आर्थिक मदत करते. इन्शुरन्स पॉलिसीची अटी आणि कव्हरेज नीट वाचा, आणि कंपनीचा इमर्जन्सी नंबर जवळ ठेवा.

अतिरिक्त टीप्स:

* सर्व डॉक्युमेंट्सची फोटोकॉपी/स्कॅन करून Google Drive किंवा ईमेलमध्ये सेव करा.

* काही देशांमध्ये कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते.

* आपल्या देशाच्या दूतावासाचा पत्ता आणि संपर्क क्रमांक जवळ ठेवा.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.