AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हॅप्पी कपल’ व्हायचंय? मग आजपासून या 5 सोप्या सवयी अंगीकारा, प्रत्येकजण म्हणेल “क्या जोड़ी है!”

नातं सुंदर असावं असं प्रत्येक जोडप्याला वाटतं. पण नातं मजबूत ठेवण्यासाठी केवळ प्रेम पुरेसं नसतं, तर काही खास सवयी देखील आवश्यक असतात. या 5 सवयी जर तुम्ही आजपासूनच स्वीकारल्या, तर तुमचं नातं आणखी घट्ट होईल आणि इतरांनाही तुमचं कौतुक वाटेल.

‘हॅप्पी कपल’ व्हायचंय? मग आजपासून या 5 सोप्या सवयी अंगीकारा, प्रत्येकजण म्हणेल “क्या जोड़ी है!”
| Edited By: | Updated on: Jul 18, 2025 | 10:09 PM
Share

नातं टिकवणं हे जितकं अवघड असतं, तितकंच त्यात रोजच्या छोट्या सवयींचं योगदानही महत्त्वाचं असतं. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत ज्या कपलमध्ये एकमेकांबद्दल समजूतदारपणा, प्रेम आणि आदर टिकून असतो, त्यांचं नातं इतरांसाठी प्रेरणादायी ठरतं. मग अशा नात्यांमध्ये गोडवा कसा टिकवायचा, हे प्रत्येक नवदांपत्याने समजून घ्यायला हवं.

आपल्यापैकी अनेकांनी असे कपल्स पाहिले असतील, जे एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहतात, एकत्र असताना सगळं काही विसरतात, आणि त्यांचं नातं इतकं सुंदर असतं की आजूबाजूचे लोक सहज म्हणतात “क्या जोड़ी है!” पण हे नातं नशिबावर नाही, तर काही खास सवयींवर उभं असतं. जर तुम्हालाही असं ‘हॅप्पी कपल’ व्हायचं असेल, तर आजपासूनच या 5 सोप्या सवयी आपल्या नात्यात आणा.

1. एकमेकांना वेळ द्या

आजची धावपळ आणि डिजिटल व्यत्यय यामुळे जोडप्यांना एकमेकांसोबत पुरेसा वेळ मिळत नाही. पण क्वालिटी टाइम हा नात्याचा प्राण आहे. आठवड्यातून एकदा तरी एकत्र बसून चहा पिणं, फिल्म पाहणं किंवा गप्पा मारणं या छोट्या गोष्टी मोठं नातं तयार करतात.

2. मनापासून कौतुक करा

बहुतांश लोक तक्रारी करायला वेळ काढतात, पण कौतुक करायला विसरतात. पार्टनरचा नवा ड्रेस, एखादं छोटंसं काम, स्वयंपाकात केलेलं काही वेगळं – यासाठी मनापासून “वा!” म्हणा. हे शब्द फक्त चेहऱ्यावर हास्यच आणत नाहीत, तर मनालाही जोडतात.

3. भावना मोकळेपणाने शेअर करा

नात्यात पारदर्शकता हवीच. कोणतीही गोष्ट लपवून ठेवणं हे कालांतराने संशयाचं कारण बनतं. त्यामुळे, आनंद, राग, भीती, स्वप्न – सगळं काही एकमेकांसमोर उघडपणे मांडता यायला हवं. संवाद म्हणजे नात्याचं ऑक्सिजन आहे.

4. परस्परांचा आदर करा

प्रेमात “मी मोठा, तू लहान” असं काही नसतं. पार्टनरच्या मतांचा, त्यांच्या स्पेसचा, त्यांचं व्यक्तिमत्त्वाचाही आदर करायला हवा. कुठल्याही क्षणी त्यांचं अपमान करणं, त्यांना लहान वाटणं हे नातं पोखरू शकतं. आदर असला, की विश्वासही असतो.

5. एकत्र मस्ती करा

जीवनात कितीही टेन्शन असो, पार्टनरसोबत मोकळेपणाने हसणं नात्याला नवसंजीवनी देतं. कॉमेडी शो पाहा, एकत्र गेम्स खेळा, जुन्या आठवणींमध्ये रमून जा कारण मस्ती म्हणजे रिलेशनशिपचा ‘रिफ्रेश बटण’.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.