AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फळांवर स्टिकर्स का लावले जातात? खरेदी करण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या अंकांचा अर्थ जाणून घ्या

जेव्हा तुम्ही फळे खरेदी करण्यासाठी बाजारात जाता तेव्हा तुम्हाला बऱ्याचदा काही फळांवर स्टिकर्स दिसतात . तुम्हाला माहिती आहे का फळांवर हे स्टिकर्स का लावले जातात? खरं तर, फळांवरील स्टिकर्सवर लिहिलेले आकडे त्यांच्या गुणवत्तेबद्दल सांगतात. चला तर मग आजच्या या लेखात त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

फळांवर स्टिकर्स का लावले जातात? खरेदी करण्यापूर्वी त्यावर लिहिलेल्या अंकांचा अर्थ जाणून घ्या
fruits stickers
| Edited By: | Updated on: Jun 28, 2025 | 10:33 PM
Share

आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी आपण आपल्या आहारात फळांचा समावेश करत असतो. यासाठी आपण बाजारातून फळे खरेदी करत असतो. त्यात आपण फळे खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवतो. फळं कुठून खराब आहे का पाहतो, कच्च तर नाहीये ना हे देखील पाहतो. फळे खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेऊन सर्वजण फळं खरेदी करत असतो. परंतु तुम्ही अनेकदा पाहिले असेलच की फळांवर काही क्रमांकित स्टिकर्स चिकटवले जातात. सहसा हे स्टिकर्स सर्व प्रकारच्या फळांना लावले जातात, पण तुम्हाला हे स्टिकर्स का लावले जातात हे माहित आहे का? तसेच या स्टिकर्सवर लिहिलेल्या अंकांचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? जर नसेल, तर आजच्या या लेखात आपण फळांवर स्टिकर्स का लावले जातात आणि त्यात लिहिलेल्या अंकांचा अर्थ काय आहे? ते जाणून घेऊयात…

फळांवर स्टिकर्स का लावले जातात?

फळांवर स्टिकर्स (फळांचा बारकोड क्रमांक) लावण्यामागे एक विशेष उद्देश असतो. खरं तर, हे स्टिकर्स फळं कुठे वाढवले ​​आहे, ते वाढवण्यासाठी कोणती पद्धत अवलंबली आहे हे समजण्यासाठी लावले जातात. तसेच त्या फळांची गुणवत्ता काय आहे आणि त्याची किंमत काय आहे हे देखील सांगते. हे स्टिकर्स PLU कोड म्हणजे (Price look-up code) आहेत, जे फळांची गुणवत्ता सांगतात . त्यावर एक विशेष क्रमांक लिहिलेला असतो, ज्याचे वेगवेगळे अर्थ असतात.

स्टिकरवरील असलेल्या नंबरचा अर्थ काय आहे?

हे झाले स्टिकर्सबद्दल, आता प्रश्न असा पडतो की या स्टिकर्सवर लिहिलेल्या नंबरचा अर्थ काय आहे. वर नमूद केल्याप्रमाणे, स्टिकर्सवर लिहिलेल्या नंबरचे वेगवेगळे अर्थ आहेत. चला जाणून घेऊया या वेगवेगळ्या नंबरच्या स्टिकर्सचा अर्थ-

4 अंकी लिहिलेल्या संख्येचा अर्थ

जर तुम्ही फळे खरेदी करत असाल आणि त्यावर 4 अंकी संख्या लिहिलेली असेल तर ते फळ खरेदी करू नका. कारण 4 अंकी संख्या विशेषतः जर 4231 किंवा 4056, तर याचा अर्थ असा होतो की ही फळे वाढवण्यासाठी कीटकनाशकांचा आणि कॅमिकलचा वापर केलेला आहे.

5 अंकी संख्येचा अर्थ काय?

काही फळे अशी आहेत त्यांच्यावर 5 अंकी संख्या असलेले स्टिकर्स चिटकवलेले असतात. तसेच यावरील संख्या 8 ने सुरू होतात. जर तुम्हाला फळांवर 85431 किंवा 82512 सारखे अंक लिहिलेले दिसले तर समजून घ्या की ही फळं अनुवांशिकरित्या सुधारित आहेत. याचा अर्थ असा की ही फळे नैसर्गिकरित्या पिकलेली नाहीत, तर प्रयोगशाळेत त्यावर प्रक्रिया करून तयार केलेले आहेत.

असे स्टिकर्स असलेली फळे फायदेशीर असतात

आता प्रश्न असा उद्भवतो की असे कोणतेही स्टिकर आहे का जे सांगते की फळ पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवले गेले आहे आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम आहे. खरं तर असे स्टिकर आहे. 9 नंबरने सुरू होणारे 5 अंकी क्रमांक असलेले स्टिकर्स, जसे की 93435 किंवा 95365, याचा अर्थ असा की ही फळे रसायने आणि कीटकनाशकांशिवाय सेंद्रिय पद्धतीने पिकवली गेली आहेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा