औषधांच्या पॅकेटवर लाल रेषा का असते? जाणून घ्या त्यामागचं महत्वाचं कारण
अनेकदा आजारी अशी काही लोकं आहेत. जे डॉक्टरांकडे जाण्याऐवजी थेट मेडिकल स्टोअरमध्ये जातात आणि स्वत: औषधे विकत घेतात. डॉक्टरांच्या सल्ला न घेता गोळ्या घेतल्या जातात. मात्र डॉक्टरांच्या सल्ला न घेता औषध घेतल्याने त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होऊ शकतो. पण तुम्ही कधी मेडिकलमधून औषधांचे पॅकेटवर घेता तेव्हा पॅकेट्च्या मागे लाल रेष असते. तर ही लाल रेषेचा नेमका अर्थ काय आहे त्याचा विचार केला आहे का?

आपल्यापैकी अनेक जण असे असतात जे आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे न जाता थेट मेडिकलमध्ये जाऊन डॉक्टरांच्या सल्ला न घेता लोकांना माहित असलेल्या औषधांचे पाकीट विकत घेतात. आता तर प्रत्येक लोकांच्या घरात औषधांचा एक वेगळा बॉक्स असतो. त्यात वेगवेगळ्या समस्यांसाठी औषधं ठेवली जातात, जेणेकरून आजारी पडल्यास उपचार करता यावे. तुम्हीही अनेकदा मेडिकल मधून औषध घेतली असतील, पण तुम्ही कधी गोळ्यांच्या पॅकेट मागील लाल रेष बघितली आहे का? जरी तुम्ही ती लाल रेष बघितली असली तरी त्या मागचे नेमकं कारण काय आहे? चला तर या मागचे नेमक कारण काय आहे ते जाणून घेऊयात.
तुम्ही जेव्हा मेडिकलमधून गोळ्यांचे पॅकेट खरेदी करता तेव्हा पॅकेटच्या मागील बाजूस लाल रेष असते, त्या रेषेचा असं अर्थ आहे कि तुम्ही डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खरेदी करता येत नाही. दरम्यान केमिस्टना ही औषध विकण्याची परवानगी केवळ तेव्हाच असते जेव्हा तुम्ही डॉक्टरांनी चिठ्ठी दिलेली असते.
अँटीबायोटिक्स औषधांचा चुकीचा वापर टाळण्यासाठी औषधांवर लाल रेष दिलेली असते. यात गोळ्यांच्या पॅकेटवर असलेल्या लाल रेष देण्याचा उद्देश म्हणजे मलेरिया आणि टीबी सारख्या आजाराचे संक्रमणसह अनेक .गंभीर आजारांसाठी डॉक्टरांच्या परवानगी शिवाय किंवा थेट केमिस्टकडून अँटीबायोटिक्सच्या खरेदी- विक्रीला रोखण्यासाठी असते.




औषधांच्या पॅकेटवर Rx चा अर्थ?
काही औषधांच्या पॅकेटवर Rx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा आहे की, या औषधांची खरेदी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारचं औषध विकत घेतल तर त्याचे तुमच्या शरीरावर मोठे परिणाम होतील.
औषधांच्या पॅकेटवर असलेल्या NRx चा अर्थ?
काही औषधांचं पॅकेटवर NRx असं लिहिलेलं असतं. याचा अर्थ असा होतो की, हे नशेचं औषध आहे आणि केवळ तेच विकू शकतात ज्यांच्याकडे याचं लायसन्स आहे.