GK : जिलबीला इंग्रजीत काय म्हणतात ? डोकेबाज असाल तर Google न वापरता द्या उत्तर..
What Is Jalebi’s English Name : जिलबी, हा भारतातील एक लोकप्रिय गोड पदार्थ आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असलेल्या या पदार्थाचा अनोखा इतिहास मध्य पूर्वेपर्यंत जातो. भारतात ती विविध प्रकारे खाल्ली जाते आणि तिची चव अनेकांना आवडते. हिवाळ्यात गरम दुधासोबत ती विशेष लोकप्रिय आहे.

आपल्यापैकी बहुतांश लोकांना गोड खाणं, मिठाई आवडते. भारतात मिठाईचे विविध प्रकारही आहेत. त्यातले काही तर अनेक जण सकाळी नाश्त्यालाही खातात. तो पद्राथ म्हणजे जिलबी (Jalebi) .. अनेक सणांना किंवा सेलिब्रेशनसाठी हा पदार्थ हमखास आणला जातो. बाहेरून कुरकुरीत, क्रिस्पी आणि आतून गोडसर पाकाची, केशरीधम्मक जिलबीचं नाव काढल्यावरही अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. जिलबी हा गोड पदार्थ असला तरी गोडाच्या इतर पदार्थांपेक्षा, मिठाईपेक्षा थोडा वेगळाच आहे. पण इतकी खास आणि लोकप्रिय असूनही जर कोणी याचं इंग्रजी नावं विचारलं, तर बऱ्याच लोकांना ते सांगता येणार नाही. तुम्हाला तरी माहीत आहे का की जिलबीला इंग्रजीत काय म्हणतात ? चला जाणून घेऊया.
Facts About Jalebi
जिलेबी ही गोल, वेटोळ्या आकाराची गोड मिठाई असते. जिलेबी बनवण्यासाठी एक पीठ तयार केले जाते, नंतर ते गरम तेलात किंवा तुपात सोडून तळलं जातं. एकदा तळल्यानंतर ती बाहेर काढून साखरेच्या पाकात बुडवून ठेवतात.बसं झाली तयार तुमची जिलबी. खरंतर जिलबीला इंग्रजीत ‘Sweet Pretzel’ किंवा ‘Coiled Funnel Cake’ असंही म्हणतात कारण ती एखाद्या कॉईलसारखी दिसते. काही लोकं या पदार्थाला नावानेही ‘Indian Syrup-Coated Dessert’ ओळखतात. त्याची चव आणि पोत इतर मिठाईंपेक्षा ती वेगळी करते. ती बाहेरून कुरकुरीत आणि आतून रसाळ असते.
कशी असते चव ?
जिलेबीच्या चवीबद्दल बोलायचे झाले तर, ज्याने गरमागरम जिलेबी खाल्ली आहे तोच त्याची खरी चव सांगू शकतो. जेव्हा तुम्ही ती तोंडात घालता तेव्हा प्रथम त्याचा कुरकुरीतपणा लागतो, नंतर आतून गोड आंबट असा रस तोंडात पसरतो. जिलबी ही नुसती खात नाहीत तर ती मोस्टली रबडी, दूध किंवा मठ्ठ्यासोबतही खाल्ली जाते. ज्यामुळे त्याची चव आणखीनच बहरून येते.
जिलबीला हिंदीत काय म्हणतात ?
तसं पहायला गेलं तर जिलबीला हिंदीतही हेत नाव आहे, फक्त हिंदीत त्याचा उच्चार “जलेबी” असा केला जातो. खरं तर, हा शब्द “जलाबिया” या अरबी शब्दापासून आला आहे. त्याच्या भारतीय उत्पत्तीवर भर देणारे काही तज्ञ त्याचे प्राचीन भारतीय नावं कुंडलिका किंवा जलवल्लिका सं असल्याचंही सांगतात.
भारतात अतिशय लोकप्रिय असलेल्य या पारंपारिक मिष्टान्नाची उत्पत्ती मध्य पूर्वेतून झाली. तिथे ते जलाबिया किंवा झुल्बिया म्हणून ओळखले जात असे. नंतर, ते भारतात आले आणि स्थानिक चवीनुसार विकसित झाले.भारताच्या काही भागात, जलेबी गरम दुधासोबत खाल्ली जाते. हिवाळ्यात ती विशेषतः लोकप्रिय आहे कारण ती शरीराला उबदारपणा देते. जिलेबी केवळ भारतातच नाही तर पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि काही आफ्रिकन देशांमध्येही लोकप्रिय आहे. तिच्या अनोख्या चवीमुळे ती जगातील सर्वात विशिष्ट मिठाईंपैकी ठरते.
