लोक पॉर्न का पाहतात ? त्याची कारणं काय ? नव्या अभ्यासातून मोठे खुलासे

पॉर्न पाहण्याचे कारण काय तसेच त्याचे प्रमाण किती याविषयी संशोधक Bothe आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अभ्यास केला आहे. (people porn use study)

लोक पॉर्न का पाहतात ? त्याची कारणं काय ? नव्या अभ्यासातून मोठे खुलासे
चाइल्ड पोर्नोग्राफी : देशातील 14 राज्यांत सीबीआयचे छापे
Follow us
| Updated on: May 27, 2021 | 9:32 PM

मुंबई : इंटरनेच्या महाजालामुळे तळहाताएवढ्या मोबाईलमध्ये संपूर्ण जग सामावले आहे. मोबाईल तसचे कॉम्प्यूटरच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध होत आहेत. यामध्ये विशेष सांगायचे झाले तर इंटरनेटमुळे लोकांना पॉर्नसुद्धा अगदी सहज उपलब्ध झालेय. सध्या लोकांमध्ये पॉर्न (Porn) पाहण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. याच गोष्टीचा विचार करुन पॉर्न पाहण्याचे कारण काय ? तसेच त्याचे प्रमाण किती ? याविषयी संशोधक Bothe आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक अभ्यास केला आहे. याच अभ्यासातून पॉर्न पाहण्यासंबंधी एक नवी माहिती समोर आली आहे. (why do people use porn new study reveals different causes and its proportion of porn viewing)

Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी लोकांच्या पॉर्न पाहण्याच्या सवयीबाबत एक अभ्यास केला आहे. हा अभ्यास Psychology of Addictive Behaviors या नियकालीकात प्रकाशित करण्यात आलाय. यामध्ये त्यांनी पॉर्न पाहण्याची नेमकी कारणं काय आहेत ? याविषयी सविस्तर सांगितलं आहे.

अभ्यास नेमका कसा केला ?

पॉर्नविषयी संशोधन करण्यासाठी Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी हंगेरी देशातील लोकांचे तीन गट तयार केले. यामध्ये पहिल्या सॅम्पलमध्ये एकूण 772 लोकांची चौकशी करण्यात आली. यामध्ये 51 टक्के महिला होत्या. तसेच दुसऱ्या सॅम्पलमध्ये 792 लोकांकडून माहिती विचारली गेली. यामध्ये एकूण 6 टक्के महिला होत्या. या सॅम्पलमधील लोक पॉर्न आठवड्यातून दोन वेळा पाहत होते. तर तिसऱ्या सॅम्पलमध्ये एकूण 1082 लोकांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये सरासरी लोकांचे वय 24 वर्षे होते.

लैंगिक सुखासाठी 45 टक्के लोक पॉर्न पाहतात

Bothe तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या अभ्यासामध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये विशेष म्हणजे ज्या आठ कारणांचा आधार घेतला आहे, त्या विषयीची आकडेवारी मोठी रंजक आहे. पॉर्न पाहणाऱ्या लोकांमध्ये जवळपास 45.2 टक्के लोक हे लैंगिक सुख मिळावे म्हणून पॉर्न पहतात. तर लैंगिकतेबद्दलची उत्सुकता म्हणून 12.3 टक्के लोकांनी पॉर्न पाहिले आहे. तसेच कल्पनाविलासापोटी जवळपास 9 टक्के लोक पॉर्न पाहणे पसंद करतात.

समाधानकार लैंगिक सुख न मिळणे हेसुद्धा एक कारण

लैंगिकता, संभोग, पॉर्न तसेच इतर गोष्टींविषयीची माहिती करुन घेण्यासाठी (self-exploration) काही लोक पॉर्न पाहणे पसंद करतात. ही आकडेवारी 6.6 टक्के आहे. तसेच समाधानकर लैंगिक सुख न मिळाल्यामुळेही लोक पॉर्नकडे वळत असल्याचे समोर आले आहे. त्याचे प्रमाण 5.9 टक्के आहे. आलेला कंटाळा, थकवा दूर व्हावा म्हणून अभ्यास केलेल्या लोकांपैकी चार टक्के लोकांना पॉर्न पाहणे आवडत असल्याचे समोर आले आहे. भावनिक दडपण आल्यामुळे 2.2 टक्के लोक पॉर्न पाहतात. तसेच तणाव कमी व्हावा म्हणूनसुद्धा 2.1 टक्के लोक पॉर्नकडे वळतात. या सर्व कारणांनंतर पॉर्न पाहण्याची इतरही काही कारणे आहेत. ज्याचे प्रमाण 7.3 टक्के आहे.

दरम्यान, संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार लैंगिक सुख, लैंगिकतेविषयी असलेली जिज्ञासा आणि काल्पनिक जगामध्ये रमण्यासाठी लोकांना पॉर्न पाहणे जास्त प्रमाणात आवडते असे या अभ्यासातून समोर आले आहे.

इतर बातम्या :

Photo: पाकिस्तानची ‘मिया’वर वक्रदृष्टी; टिकटॉक अकाऊंट बंद होताच पॉर्न स्टार मिया खलिफा भडकली!

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.