‘या’ 5 कारणांमुळे पब्लिक टॉयलेटच्या दरवाज्यांना खाली जागा असते!
मॉल असो वा ऑफिस, सार्वजनिक टॉयलेटच्या दरवाज्याखाली जागा असण्याकडे तुमचं लक्ष नक्कीच गेलं असेल. पण ही केवळ डिझाइन नाही. यामागे अनेक महत्त्वाचे आणि व्यावहारिक कारणं आहेत, जे सुरक्षा आणि स्वच्छतेशी जोडलेले आहेत. चला, ते जाणून घेऊया.

तुमच्या आयुष्यात अशा अनेक लहान-लहान गोष्टी असतील ज्यांच्याकडे तुमचं लक्ष जातं, पण त्यामागचं कारण तुम्हाला माहीत नसतं. असाच एक प्रश्न म्हणजे पब्लिक टॉयलेटचे दरवाजे. तुम्ही पाहिलं असेल की, मॉल, थिएटर किंवा ऑफिसच्या टॉयलेटचे दरवाजे जमिनीपर्यंत पूर्ण बंद नसतात, तर त्यांच्या खाली एक मोठी जागा (गॅप) असते.
तुम्ही कधी विचार केला आहे का की, हा गॅप का असतो? हे केवळ डिझाइन आहे की यामागे काही ठोस कारणे आहेत? चला, यामागची ५ कारणे जाणून घेऊया, जे ऐकून तुम्हीही म्हणाल, ‘वाह, याचा तर विचारच केला नव्हता!
टॉयलेटच्या दरवाज्याखाली गॅप असण्याची ५ कारणे
स्वच्छतेमध्ये सोपेपणा : मॉल किंवा थिएटरसारख्या सार्वजनिक ठिकाणी टॉयलेटचा वापर सतत होतो. त्यामुळे, स्वच्छतेची कामे लवकर आणि प्रभावीपणे होणे आवश्यक आहे. दरवाज्याखाली जागा असल्यामुळे सफाई कर्मचाऱ्याला दरवाजा न उघडताच झाडू-पोछा घालता येतो. तसेच, पाणी किंवा घाण बाहेर काढणे सोपे जाते, ज्यामुळे स्वच्छता जलद आणि चांगल्या प्रकारे होते.
आपत्कालीन परिस्थितीत मदत : कधीकधी लोक टॉयलेटमध्ये बेशुद्ध पडू शकतात किंवा त्यांची तब्येत बिघडू शकते. अशा परिस्थितीत दरवाज्याखाली असलेल्या जागेमुळे बाहेरून आत काय घडत आहे, हे कळू शकतं. गरजू व्यक्तीला लगेच मदत पोहोचवता येते. तसेच, जर दरवाजा आतून लॉक झाला किंवा अडकला, तर त्या जागेतून बाहेर पडता येतं.
गैरवापर रोखण्यासाठी : काही लोक पब्लिक टॉयलेटचा गैरवापर करतात, जसे की धूम्रपान करणे किंवा इतर चुकीच्या गोष्टी करणे. दरवाज्याखालील जागेमुळे सुरक्षा कर्मचारी आतमध्ये काय सुरू आहे, यावर नजर ठेवू शकतात. यामुळे कोणाच्याही गोपनीयतेचा (privacy) भंग न करता लक्ष ठेवणे सोपे जाते.
कमी खर्च आणि देखभालीमध्ये सोपेपणा : जमिनीपर्यंतचे पूर्ण दरवाजे बनवणे खूप खर्चिक असते. तसेच, ओल्या जमिनीमुळे लाकडी किंवा इतर दरवाजांना लवकर नुकसान होऊ शकते. पण, असे छोटे दरवाजे स्वस्त असतात आणि त्यांची देखभालही कमी करावी लागते. यामुळे दरवाजा खराब होत नाही.
हवा खेळती राहण्यासाठी (Ventilation) : पब्लिक टॉयलेटमध्ये अनेकदा हवा खेळती राहण्यासाठी (ventilation) योग्य व्यवस्था नसते. दरवाज्याखाली जागा असल्यामुळे हवा खेळती राहते. त्यामुळे आतमध्ये वास येत नाही आणि घुसमट होत नाही. या जागेमुळे टॉयलेटच्या आतपर्यंत प्रकाशही पोहोचतो, ज्यामुळे आतमध्ये अंधार राहत नाही.
या कारणांमुळे पब्लिक टॉयलेटच्या दरवाज्याखाली जागा ठेवली जाते, जे फक्त एक डिझाइन नसून अनेक व्यावहारिक आणि सुरक्षिततेच्या गरजा पूर्ण करते.
