महिला ट्रेनमधून तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात का, काय सांगतो कायदा? जाणून घ्या तुमचे हक्क
ट्रेनमधून रोज असंख्य महिला प्रवास करतात. पण त्याआधी तिकिट फार महत्त्वाचं असतं. पण महिला तिकिटाशिवाय देखील प्रवास करु शकतात. पण त्यांना काही नियम माहिती असायला हवेत... तर कायदा काय सांगतो जाणून घ्या.

आजच्या काळात असंख्य महिला ट्रेनने प्रवास करतात. मुंबईतील महिलांसाठी तर, लोकल लाईफ लाईन आहे. ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी तिकिट काढणं गरजेचं आहे. पण महिला तिकिटाशिवाय प्रवास करू शकतात… पण त्यासाठी तुम्हाला काही अधिकार माहिती असायला हवेत. तुम्हाला तुमचे अधिकार माहिती असतील तर, तुम्हाला कोणीत ट्रेनमधून उतरवू शकणार नाही. तर ते अधिकार कोणते आहेत त्याबद्दल जाणून घ्या. जर तुमच्याकडे ट्रेनमध्ये प्रवास करताना तिकीट नसेल, तर टीटीई महिलेला खाली उतरवतो, पण रेल्वेच्या नियमानुसार, टीटीई महिलेला ट्रेनमधून खाली उतरवू शकत नाही.
महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठी, रेल्वेने 1989 मध्ये एक कायदा मंजूर केला होता, त्यानुसार कोणत्याही महिलेला ट्रेनमधून उतरण्या आधई टीटीईला काही नियम आणि शर्ती लक्षात ठेवाव्या लागतात. तिकिट नसल्यास महिला ट्रेनमधून उतरण्याऐवजी टीटीईकडून संरक्षण मागू शकतात.
भारतीय रेल्वे कायदा 1989 काय म्हणतो? हा कायदा ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व महिलांना अधिकार देतो. तुमच्या माहितीसाठी, भारतीय रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 139 मध्ये महिलांच्या हक्कांबद्दल सांगितलं आहे. भारतीय रेल्वे कायदा, 1989 च्या कलम 139 नुसार, जर एखादी महिला किंवा मूल रात्रीच्या वेळी तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये एकटे प्रवास करत असेल, तर या कायद्यांतर्गत टीटीई त्यांना काढून टाकू शकत नाही.
जर एखाद्या टीटीईने मध्यरात्री एखाद्या महिलेला ट्रेनमधून खाली उतरवलं तर ती महिला संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांकडे टीटीईविरुद्ध तक्रार दाखल करू शकते. जर एखादी महिला तिकिटाशिवाय प्रवास करत असेल तर टीटीई तिला कोणत्याही स्टेशनवर उतरवू शकत नाही. तिला फक्त जिल्हा मुख्यालयाच्या स्टेशनवर सोडता येतं.
घाई किंवा इतर कारणांमुळे महिला तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करतात हे अनेकदा दिसून येतं. हे चुकीचे असं तरी, टीटीई महिला किंवा मुलांना त्रास देऊ शकत नाहीत. जर एखादी महिला किंवा मूल तिकिटाशिवाय प्रवास करत असेल, तर टीटीई दंडासह रेल्वे तिकीट देऊ शकतो, परंतु मध्यरात्री त्यांना उतरवू शकत नाही.
पण, टीटीई त्यांना उतरवण्याचा आग्रह धरू शकतो. कन्फर्म तिकिटशिवाय प्रवास करणाऱ्या महिला देखील प्रवास करताना दिसतात. जर एखाद्या महिलेचं तिकीट प्रलंबित असेल आणि ती ट्रेनमध्ये चढली तर टीटीई तिला उतरवू शकत नाही.
(टीप: जर तुमच्याकडे विशिष्ट केस असेल तर कायदेशीर वकिलांचा सल्ला घेणं उचित आहे. येथे दिलेली माहिती केवळ न्यायालयाच्या निर्णयांवर आणि लेखांवर आधारित आहे.)
