AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आत्महत्येचा निर्णय घेणारे जगातील 5 अरबपती आणि त्यामागील कारणं

जगात असे 5 उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती. त्यानंतरही त्यांनी आत्महत्या करत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने पैशाने प्रश्न सुटतात असं मत असणाऱ्यांना मोठा संदेश दिला आहे. तसेच इतरांना आत्महत्येबाबत विचार करण्यास भाग पाडले आहे.

आत्महत्येचा निर्णय घेणारे जगातील 5 अरबपती आणि त्यामागील कारणं
| Updated on: Jul 30, 2019 | 9:28 PM
Share

लंडन : अनेक लोकांना आपल्याकडे पैसा आल्यानंतर आपले सर्व प्रश्न सुटतील असं वाटतं. मात्र, प्रत्येक प्रश्नावर पैसा हेच उत्तर नसल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. मोठा व्यवसाय, मोठे व्यवहार त्यांच्यासोबत मोठा ताणतणाव देखील घेऊन येतात. कॅफे कॉफी डे (Cafe Coffee Day – CCD) संस्थापक व्ही. जे. सिद्धार्थ (V G Siddharth) अचानक बेपत्ता झाले असून यामागे कर्जबाजारीपणा आणि व्यवसायातील नुकसान हेच कारण आहे. त्यांनी आपल्या चिट्ठीत या कारणांचा स्पष्ट उल्लेख केला आहे.

सिद्धार्थ हे एकमेव उद्योगपती नाही ज्यांनी या ताणतणावातून टोकाचा निर्णय घेतला. जगात असे 5 उद्योगपती आहेत ज्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नव्हती. त्यानंतरही त्यांनी आत्महत्या करत जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाने पैशाने प्रश्न सुटतात असं मत असणाऱ्यांना मोठा संदेश दिला आहे. तसेच इतरांना आत्महत्येबाबत विचार करण्यास भाग पाडले आहे.

पॉल कॅसल (Paul Castle)

पॉल कॅस लंडनचे प्रसिद्ध ‘प्रॉपर्टी टायकून’ होते. प्रायव्हेट जेट, फरारी आणि बेंटले कार, स्विझर्लंड, फ्रान्स, ब्रिटनमध्ये संपत्ती या सर्व गोष्टी त्यांची श्रीमंती सांगण्यासाठी पुरेशा आहेत. 54 वर्षांच्या पॉल यांनी 2010 मध्ये लंडनच्या अंडरग्राऊंड ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. पॉल यांना पोलो खेळण्याचीही आवड होती. त्यांचे फोटो अगदी ब्रिटनचे प्रिंस चार्ल्स यांच्यासोबतही आहेत. त्यात दोघे पोलो खेळत असताना चर्चा करताना पाहायला मिळतात.

पॉल यांच्या शेवटच्या काळात त्यांना आपल्या व्यवसायात बरंच नुकसान झालं. या  काळात त्यांच्या अनेक प्रॉपर्टी डील अयशस्वी ठरल्या होत्या. त्यांनी गॅस आणि ऑईल सर्व्हे कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली होती. मात्र ही सर्व गुंतवणूक बुडाली. पॉल यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही बरेच प्रश्न तयार झाले होते. त्यांचा तीनवेळा घटस्फोट झाला होता. त्यानंतर ते चौथं लग्न करणार होते. या व्यतिरिक्त ह्रदयाशी संबंधित आजार आणि ट्युमर यांनी देखील त्यांचं आरोग्य बिघडलं होतं. अखेर याला कंटाळून पॉल यांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देत ट्रेनसमोर उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

रेजेन हुएई (ReiJane Huai)

फाल्कनस्टर या डाटा स्टोअरेज कंपनीचे प्रमुख रेजेन हुएई यांनी सप्टेंबर 2011 मध्ये छातीवर गोळ्या झाडत आपले आयुष्य संपवले. हा निर्णय घेण्याआधी त्यांनी एका प्रकरणात त्यांच्यविरोधात गुन्हा दाखल झाल्याने कंपनी सोडली होती. कंपनीतून अशाप्रकारे बाहेर व्हावे लागल्याने त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी 17 कोटी रुपयांच्या घराच्या लॉनमध्ये बसलेले असताना आत्महत्या केली. त्यांचा जन्म तायवानमध्ये झाला होता, तर त्यांचे शिक्षण अमेरिकेत झाले.

जोनाथन रॅथ (Jonathan Wraith)

ब्रिटेनचे अरबपती जोनाथन रॅथ यांनी 35 व्या वर्षी डिसेंबर 2009 मध्ये स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. मात्र, त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला हे सांगणारी कोणतीही सुसाईड नोट लिहिली नाही. याच्या दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या वडिलांचा व्यवसाय 3 अरब 16 कोटी रुपयांना विकला होता. त्यानंतर ते शुटिंगचे काम करत होते. त्यांच्या जवळच्या कुणाही व्यक्तीला ते आत्महत्येचा विचार करत असल्याची शंकाही आली नाही. प्रत्येकाच्या नजरेत ते एक श्रीमंत व्यक्ती होते आणि आपला व्यवसाय विकून शुटिंगचा छंद पूर्ण करत असल्याचे वाटत होते. मात्र, त्यांना वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांनी असा टोकाचा निर्णय घेतल्याचे नंतर सांगितले गेले.

एली एम. ब्लॅक (Eli M Black)

ब्लॅक यांचा जन्म पोलंडमध्ये झाला मात्र त्यांनी अमेरिकेत एक यशस्वी उद्योजक म्हणून ओळख तयार केली. त्यांची युनायटेड ब्राँड्स ही कंपनी फळांचं उत्पादन आणि निर्यातीचं काम करायची. त्यांनी फेब्रवारी 1975 मध्ये 53 व्या वर्षी न्युयॉर्कमधील उंच इमारतीवरुन उडी घेऊन जीवन संपवलं. आत्महत्या करण्याआधी त्यांनी आपल्या सुटकेसने खिडकीची काच फोडली होती. ब्लॅक यांनी दुधाच्या बॉटलची कॅप तयार करण्यापासून कामची सुरुवात केली होती. त्यानंतर ते हळुहळु अमेरिकेचे मोठे व्यापारी म्हणून उदयास आले.

1974 मध्ये फिफी वादळाने होंडुरासमधील त्यांच्या कंपनीच्या केळी बागा उद्ध्वस्त झाल्या. यावर्षी त्यांच्या कंपनीला पहिल्या तिमाहित पाऊणेतीन अरब रुपयांचा तोटा झाला. ब्लॅक यांच्या मृत्यूनंतर काही आठवड्यातच एक गौप्यस्फोट झाला. त्यानुसार त्यांची कंपनी होंडुरासने तत्कालीन राष्ट्रपतींना केळीच्या निर्यातीवरील कर कमी करण्यासाठी लाच दिली होती.

हूबर्ट बुमीस्टर (Huibert Boumeester)

हूबर्ट बुमीस्टर हे 49 व्या वर्षी ब्रिटनमधून बेपत्ता झाले होते. ते आपल्या परवानाधारक बंदूकीसह घराबाहेर पडले होते. त्यानंतर आठवडाभरातच त्यांचा मृतदेह ब्रिटेनमधील बर्कशायरमध्ये सापडला. त्यांच्या मृतदेहावर गोळ्यांचे निशाण पाहायला मिळाले होते. ही घटना जून 2009 मध्ये घडली. बुमीस्टर एबीएन एमरो या कंपनीच्या संचालक मंडळाचे सदस्य होते. बुमीस्टर यांचे वेतन 3 कोटी 70 लाख रुपये होते. या कंपनीला रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडने टेकओव्हर केले होते. मृत्यूपूर्वी 3 महिनेआधी त्यांची नोकरी गेली होती. त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केल्याचं सांगितलं गेलं.

Follow Us
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.