AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक जिल्ह्यात 5 नगरपंचायतींची निवडणूक रंगणार; उद्यापासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू

नाशिक जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात निफाड, देवळा, पेठ, सुरगाणा आणि कळवणचा समावेश आहे.

नाशिक जिल्ह्यात 5 नगरपंचायतींची निवडणूक रंगणार; उद्यापासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Dec 01, 2021 | 3:46 PM
Share

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील पाच नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यात निफाड, देवळा, पेठ, सुरगाणा आणि कळवणचा समावेश आहे. या ठिकाणी उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून, ती 7 डिसेंबर पर्यंत चालणार आहे. पाच नगरपंचायतींच्या प्रत्येक 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर बुधवारपासूनच 24 नोव्हेंबर रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या नगरपंचायतीसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

उद्यापासून अर्ज भरणे सुरू

पाच नगरपंचायतींसाठी उद्या 2 डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. ती 7 डिसेंबरपर्यंत चालेल. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी अर्जा छाननी. 13 डिसेंबरपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असून, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. विशेष म्हणजे रखडलेल्या दिंडोरी नगरपंचायत निवडणुकीचीही अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. येथेही 21 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.

तरुण इच्छुक

नगरपंचायतीच्या निवडणुकीत भवितव्य आजमावण्यासाठी अनेक तरुण इच्छुक आहेत. विशेषतः सर्वच पक्षांकडून नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात किमान महिनाभर तरी राजकीय धुळवड रंगणार आहे. त्यानंतर लगेचच महिनाभरात फेब्रुवारीमध्ये नाशिक महापालिकेची निवडणूक रंगणार आहे. त्यामुळे आतापासूनच जिल्ह्यात राजकीय रंग भरायला सुरुवात झाली आहे.

फेब्रुवारीत महापालिका निवडणूक

येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या नाशिक महापालिकेच्या निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. महापालिकेच्या 133 प्रभागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, त्यासाठी तयार केलेला कच्चा प्रभागरचना आराखडा महापालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे. आता निवडणूक आयोग या आराखड्याची छाननी करेल. त्यात मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले की नाही, हे पाहून त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवण्यात येतील. येत्या 15 डिसेंबरनंतर प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

कोरोनाचे सावट

नगरपंचायत निवडणूक असो की, महापालिका निवडणुका. या दोन्ही निवडणुकांवर कोरोनाचे सावट मात्र कायम आहे. आता ओमिक्रॉन विषाणू आलाय. महाराष्ट्रात अजून या विषाणूचे रुग्ण सापडले नाहीत. मात्र, निवडणुका पाहता थोडा संयम पाळणे आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा या निवडणुका नक्कीच महागात पडतील यात शंका नाही. हे टाळ्यासाठी निवडणुकीच्या प्रचारात सहभागी राहणाऱ्या प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. इतरांंनाही मास्क वापरण्याचे आवाहन करावे. सुरक्षित अंतर पाळावे आणि गावोगावी लसीकरणावर भर देण्याची गरज आहे.

इतर बातम्याः

गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीचा नाशिककरांनी उचलला विडा; केंद्राकडून 1800 कोटी अन् राज्याकडून 400 कोटी मिळवण्याचे प्रयत्न

मोक्कार पावसाची नाशिकमध्ये हजेरी, द्राक्ष बागायतदारांच्या काळजाचा ठोका चुकला, साहित्य संमेलनावरही सावट!

Nashik | महापालिका निवडणुकीचा कच्चा प्रभागरचना आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठवला; 15 डिसेंबरनंतर कार्यक्रम जाहीर होणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.