AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | महापालिका निवडणुकीचा कच्चा प्रभागरचना आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठवला; 15 डिसेंबरनंतर कार्यक्रम जाहीर होणार

सध्या जगभरात फक्त ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची चर्चा आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला तर प्रभाग रचना अंतिम करून महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

Nashik | महापालिका निवडणुकीचा कच्चा प्रभागरचना आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठवला; 15 डिसेंबरनंतर कार्यक्रम जाहीर होणार
नाशिक महापालिका.
| Edited By: | Updated on: Jun 17, 2022 | 9:17 PM
Share

नाशिकः येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या नाशिक (Nashik) महापालिकेच्या (Municipal Corporation) निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे. महापालिकेच्या 133 प्रभागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असून, त्यासाठी तयार केलेला कच्चा प्रभागरचना आराखडा महापालिका आयुक्तांनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) पाठवला आहे. आता निवडणूक आयोग या आराखड्याची छाननी करेल. त्यात मार्गदर्शक सूचनांचे पालन झाले की नाही, हे पाहून त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या सुचवण्यात येतील. येत्या 15 डिसेंबरनंतर प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

काम पुन्हा करावे लागले

नाशिकमध्ये सुरुवातीला म्हणजे 26 ऑगस्ट रोजी निवडणूक आयोगाने एक सदस्यीय प्रभागरचनेसाठी कच्चा आराखड्याचे काम करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन सदस्यीय प्रभागरचना झाली. त्यानुसार या कामात पुन्हा बदल झाला. आता नगरसेवकांची संख्याही 122 वरून 133 वर नेण्यात आली. त्यामुळे या कामात पुन्हा बदल करावा लागला. पूर्वीच्या नियोजनानुसार साधरणतः 36 हजार लोकसंख्येचा एक प्रभाग होता. मात्र, नगरसेवकांची संख्या वाढल्यानंतर आता एका प्रभागाची लोकसंख्या 33 हजारांच्या घरात असेल. त्यामुळे कच्च्या प्रभारचनेचे काम पुन्हा करावे लागले.

इच्छुकांना धास्ती

नाशिक महापालिका निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करणे सुरू आहे. त्यात नगरसेवकांचे तिकीट कुणाला मिळणार, हे ही संबंधित पक्षांनी जाहीर केलेल नाही. मात्र, त्यापूर्वीच अनेकांनी आपापल्या वॉर्डात आपल्याच तिकीट मिळेल अस गृहीत धरून प्रचार सुरू केला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. आतापासूनच मतांची जुळवाजुळव सुरू आहे. मात्र, आता निवडणूक आयुक्त कच्च्या आराखड्याची पडताळणी करतील. 15 डिसेंबरनंतर प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होईल आणि आरक्षण सोडत निघेल. त्यानंतर प्रभागरचना जाहीर होईल. त्यावरच्या हरकती मागवल्या जातील. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम चालेल अशी शक्यता आहे. या प्रक्रियेनंतर निवणडणुकीची घोषणा होईल.

ओमिक्रॉनचे सावट

राज्यात येणाऱ्या काळामध्ये नाशिक, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, अमरावती, अकोला, नागपूर, नवी मुंबई, औरंगाबाद, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर, नांदेड-वाघाळा महापालिकेची निवडणूक आहे. मात्र, सध्या जगभरात फक्त ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूची चर्चा आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला तर प्रभाग रचना अंतिम करून या निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात.

इतर बातम्याः

साहित्य संमेलनावर ओमिक्रॉनचे सावट, लस घेतली तरच प्रवेश; दक्षिण आफ्रिकेत गेलेले खेळाडू कोरोना निगेटीव्ह

नाशिककरांना 2 तासांत गाठता येणार सुरत, ग्रीनफील्ड महामार्गाने जिल्ह्याचे रूपडे बदलणार!

साहित्य संमेलनात झणझणीत बेत; चक्क खान्देशी भरीत अन् कळण्याची भाकरी, सोबतीला अजून बरंच काही…!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.