साहित्य संमेलनावर ओमिक्रॉनचे सावट, लस घेतली तरच प्रवेश; दक्षिण आफ्रिकेत गेलेले खेळाडू कोरोना निगेटीव्ह

दक्षिण आफ्रिकेतल्या आर्यनमॅन स्पर्धेतून 2 खेडाळू चार दिवसांपूर्वी नाशिकमध्ये परतले होते. आता या खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे चिंतेत पडलेल्या महापालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

साहित्य संमेलनावर ओमिक्रॉनचे सावट, लस घेतली तरच प्रवेश; दक्षिण आफ्रिकेत गेलेले खेळाडू कोरोना निगेटीव्ह
नाशिकमधील कुसुमाग्रजनगरीमध्ये उद्या साहित्य संमेलन सुरू होत आहे.

नाशिकः नाशिक येथील भुजबळ नॉलेट सिटीमधील कुसुमाग्रजनगरी साहित्य संमेलनासाठी (Sahitya Sammelan) सज्ज झाली आहे. संमेलन अवघ्या दोन दिवसांवर आले असताना जगभरात धास्ती निर्माण करणाऱ्या कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) विषाणूचे साहित्य संमेलनावरही सावट पसरले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असणाऱ्यांनाच संमेलनात प्रवेश देण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच आज संमेलनाच्या आयोजन आणि निर्बंधाबाबत पुन्हा एकदा काथ्याकूट होणार आहे.

रसिक संभ्रमात

नाशिकच्या साहित्य संमलेनाचे वेध राज्यभरातील रसिकांनी गेल्या कित्येक दिवसांपासून लागले होते. त्यांनी संमेलनाला येण्याची तयारी केली होती. मात्र, कोरोनाच्या ओमिक्रॉनने ते सुद्धा संभ्रमात आहेत. साहित्य संमेलनाच्या मुख्य सभा मंडळपाची क्षमात 14 हजार आहे. मात्र, आयोजकांनी ती आता सुरक्षित अंतर पालनासह 7 हजारांवर आणण्याची तयारी सुरू केली आहे. सोबतच संमेलनात लस घेतलेल्या व्यक्तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. किमान लसीचा पहिला डोस घेतलेला असावा. अन्यथा संमेलन स्थळीच डोस दिला जाणार आहे.

जिल्हा प्रशासनाची बैठक

साहित संमेलन आणि आढळलेला नवा ओमिक्रॉन विषाणू या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आज सकाळी 11 वाजता तातडीचे बैठक बोलावली आहे. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय, पोलीस, आरोग्य, सुरक्षा, महापालिका अधिकारी यांच्यासोबत संमेलन नियोजन समितीचे सदस्यही उपस्थित राहणार आहेत. नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर संमेलनस्थळी कडक निर्बंध घालण्याचे संकेत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय इतर महत्त्वाचे निर्णयही होऊ शकतात.

खेळाडू कोरोना निगेटीव्ह

दक्षिण आफ्रिकेतल्या आर्यनमॅन स्पर्धेतून 2 खेडाळू चार दिवसांपूर्वी नाशिकमध्ये परतले आहेत. ही माहिती समजताच येथील आरोग्य विभाग दक्ष झाला आहे. नाशिक आरोग्य प्रशासनाने या खेळाडूंचे स्वॅब चाचणीसाठी पुढे पाठवले होते. तसेच सध्या त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. आता या खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे चिंतेत पडलेल्या महापालिका प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे.

व्यापारी नाराज

कोरोनाच्या नव्या नियमावलीमुळे व्यापारी वर्गात नाराजी आहे. दुकानात आलेल्या ग्राहक विनामास्क दिसल्यास दुकानदाराला 10 हजारांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा व्यापाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे. गेल्या दोन लाटेमध्ये लागलेले लॉकडाऊन. त्यामुळे आधीच व्यापाऱ्यांचा धंदा बसला आहे. हे पाहता हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी व्यापारी संघटनेने केली आहे.

इतर बातम्याः

साहित्य संमेलनात झणझणीत बेत; चक्क खान्देशी भरीत अन् कळण्याची भाकरी, सोबतीला अजून बरंच काही…!

नाशिककरांना 2 तासांत गाठता येणार सुरत, ग्रीनफील्ड महामार्गाने जिल्ह्याचे रूपडे बदलणार!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI