गुड न्यूज : कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात 51 रुग्ण कोरोनामुक्त

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला (Kalyan-Dombivali corona case recover) आहे.

गुड न्यूज : कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवसात 51 रुग्ण कोरोनामुक्त

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला (Kalyan-Dombivali corona case recover) आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने येथील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. पण अशामध्येच कल्याण-डोंबिवलीकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीत आज (15 मे) एका दिवसात तब्बल 51 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. या सर्वांना कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले (Kalyan-Dombivali corona case recover) आहे.

राज्यासह काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अशामध्ये कल्याण-डोंबिवलीकरांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत एकूण 391 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर यापैकी 181 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

कल्याण-डोंबिवली कोरोनाचा नवा हॉटस्पॉट

कल्याण-डोंबिवली हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट बनला आहे. सध्या केडीएमसीत तब्बल 121 रुग्ण हे शासकीय सेवेतील, अत्यावश्यक सेवेतील आणि खाजगी कर्मचारी आहेत. यांच्या संपर्कात आल्याने केडीएमसीत अनेकांना कोरोना झाला असल्याची माहिती आहे.

मार्च महिन्याच्या सुरुवातीला डोंबिवलीत झालेल्या हळदी आणि लग्न सभारंभ येथील नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरला होता. या सभारंभात अनेक जण सहभागी झाले होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे रुग्णांची संख्या कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसं काही झालं नाही.

कल्याण-डोंबिवलीतील 50 टक्के रुग्ण हे कल्याण-डोंबिवली बाहेर ये-जा करणारे आहेत. कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे 10 हॉटस्पॉट आहेत. जवळपास 2o कंटेन्मेंट झोन आहेत. संपूर्ण कल्याण-डोंबिवली रेडझोन म्हणून घोषित करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या : 

Nagpur Corona : नागपुरात एकाच दिवशी 28 जण कोरोनामुक्त, जिल्ह्यात एकूण 140 रुग्णांची कोरोनावर मात

भारत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चीनलाही मागे टाकण्याची भीती

Jalgaon Corona | जळगावात दिवसभरात 22 नवे कोरोना रुग्ण, भुसावळ, जळगाव, पाचोरा हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI