Jalgaon Corona | जळगावात दिवसभरात 22 नवे कोरोना रुग्ण, भुसावळ, जळगाव, पाचोरा हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर

जळगाव जिल्ह्यात आज नवे 22 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जळगावातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 232 वर पोहोचला आहे.

Jalgaon Corona | जळगावात दिवसभरात 22 नवे कोरोना रुग्ण, भुसावळ, जळगाव, पाचोरा हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर

जळगाव : शहरासह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा (Jalgaon Corona Virus Update) दिवसागणिक वाढत चालला आहे. जळगाव जिल्ह्यात आज नवे 22 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जळगावातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 232 वर पोहोचला आहे. आज आलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तींच्या नमुना तपासणी अहवालापैकी 56 व्यक्तीचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. तर 22 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 28 रुग्णांचा कोरोनामुळे बळी (Jalgaon Corona Virus Update) गेला आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये भुसावळ येथील एक, जळगाव चार, चोपडा येथील सात, अडावद येथील एक, भडगाव शहरातील चार आणि निंभोरा येथील एक, फैजपूर एक, यावल एक आणि अमळनेर येथील दोन अशा एकूण 22 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आढळलेल्या 232 कोरोना बाधित रुग्णांपैकी 158 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर 11 रुग्ण अत्यावस्थ असून 35 रुग्ण बरे झाले आहेत. तर 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोव्हिड-19 च्या सर्व्हेसाठी जिल्ह्यात 18 मेपासून केंद्रीय पथक येणार आहे. ते 22 मेपर्यंत सर्वे करणार आहे. आरोग्य सेवा संचालनालयाच्या पत्रानुसार जिल्ह्याचा कोविड-19 च्या अनुषंगाने नॅशनल सेरो सर्व्हे (National Sero Servey) केला जाणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर शहर हे कोरोनाचा हॉटस्पॉट असून त्या पाठोपाठ भुसावळ, जळगाव आणि पाचोरा देखील त्याच मार्गावर वाटचाल सुरु आहे. प्रशासनाने काही प्रमाणात उपाययोजना केल्या (Jalgaon Corona Virus Update) आहेत. परंतु नागरिकांच्या बेफिकिरीमुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे.

जळगावच्या या परिस्थिती बाबत प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. ज्या तालुक्यातील भागामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत, तो भाग प्रतिबंधित करण्यात येत आहे. तसेच, गेल्या पाच दिवसापासून जिल्ह्यातील अमळनेर, भुसावळ, पाचोरा या शहरांमध्ये जनता कर्फ्यु पाळण्यात येत असून आज कर्फ्यु चा 5 दिवस आहे. जिल्ह्यात एकूण 78 कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून पालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे. ही समिती या रुग्णांच्या भोजन आणि औषध यांची काळजी घेतात तसेच येणाऱ्या तक्रारीचे निरसन करतात. तसेच, पोलीस प्रशासनाने होमगार्ड, पोलीस कर्मचारी यांना प्रत्येक प्रतिबंधीत क्षेत्रासमोर उभे राहून जे नागरिक विनाकारण बाहेर फिरत आहे त्यांना मज्जाव करत (Jalgaon Corona Virus Update) आहेत.

संबंधित बातम्या :

प्रसव कळांनी विव्हळणाऱ्या महिलेला बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ, कळा वाढताच बांबू वाहणारे जीव तोडून धावले

Ratnagiri Corona Patient | मुंबईच्या रुग्णाचा दापोलीत थरार, पळून गेलेला कोरोना रुग्ण 13 तासांनी जंगलात सापडला

वर्ध्यात झाडाखालीच रुग्णालय उभारलं, जिल्ह्याबाहेरुन येणाऱ्यांना तपासणी करुनच एण्ट्री

लॉकडाऊनमुळे तंबाखू पुरवून पुरवून खाण्याची वेळ, मित्राने पुडी न दिल्याने मारहाण

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI