AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयफोनसाठी 5 लाख घेऊन अल्पवयीन मुलगा मुंबईत दाखल, नांदेडमध्ये व्यापाऱ्याच्या घरी काय घडलं?

डिलांनी नवीन कपडे आणि आयफोन घेऊन दिला नाही, म्हणून मुलगा घरातून पळला. आपल्या मित्रासोबत हा मुलगा 17 फेब्रुवारी रोजीच घरातून निघाला आणि थेट मुंबईत (Ran Away to Mumbai) दाखल झाला.

आयफोनसाठी 5 लाख घेऊन अल्पवयीन मुलगा मुंबईत दाखल, नांदेडमध्ये व्यापाऱ्याच्या घरी काय घडलं?
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Feb 21, 2022 | 3:46 PM
Share

नांदेडः मोबाइलच्या वेडामुळे हल्ली मुलांना (Smart phone craze) चांगलं काय, वाईट काय याचं भान राहिलेलं नाही. महागडा मोबाइल मिळावा, या हट्टाला पेटलेल्या नांदेडमधल्या एका अल्पवयीन मुलाचेही असेच एक धक्कादायक कृत्य समोर आले आहे. वडिलांनी नवीन कपडे आणि आयफोन घेऊन दिला नाही, म्हणून मुलगा घरातून पळला. आपल्या मित्रासोबत हा मुलगा 17 फेब्रुवारी रोजीच घरातून निघाला आणि थेट मुंबईत (Ran Away to Mumbai) दाखल झाला. धक्कादायक म्हणजे, मुलाने घरातून निघताना पाच लाख रुपयेदेखील सोबत घेतले होते. या प्रकरणी तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि सुदैवाने आयफोन खरेदी करताना पोलिसांनी (Police investigation) मुलांना ताब्यात घेतले.

काय घडलं त्या दिवशी?

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुना कौठा भागातील व्यापाऱ्याच्या घरी लग्न असल्यामुळे ते आई व पत्नीसह बाहेरगावी गेले होते. त्यापूर्वी त्यांच्या 15 वर्षीय मुलाने नवे कपडे आणि आयफोन घेऊन देण्यासाठी भांडण केले. दुपारी 12 च्या सुमारास मुलाने घराला कुलूप लावून चावी शेजाऱ्याकडे ठेवून दिली. त्यावेळीच त्याने सोबत पैसे घेतले. तसेच शेजारी रहात असलेल्या मित्राला घेऊन दोघेही मुंबईच्या वाटेने निघाले. नांदेडहून पूर्णा येथे गेल्यानंतर तिथून ते पुण्याला गेले. कॅबने मुंबई गाठली. मालाड येथे या मुलाने 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा आयफोन खरेदी केला. तसेच इतर खरेदी करत असताना लोकेशनवरून मुंबई पोलीस त्याच्यापर्यतं पोहोचले. घटनास्थळावरून पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसा घेतला शोध?

ही मुले नांदेडहून बेपत्ता असल्याची माहिती मुंबई पोलिसांना सोशल मीडियातून मिळाली होती. यासबर सेलसह इतर विभागही कामाला लागले. तत्पुर्वी मुंबई पोलिसांनी नांदेड पोलिसांशी संपर्क साधून मुलांची माहिती मिळवली होती. त्यानुसार मालाड परिसरात मुलांनी आयफोन खरेदी केला. तेव्हाच मुलांचे लोकेशन कळले. मुले इतर ठिकाणी खरेदी करत असताना मुंबईचे सायबर पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले. लगेच ही माहिती नांदेड ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर नांदेड पोलिसांनी मुलांना ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.

इतर बातम्या-

Kishori Pednekar | ‘Narayan Rane यांच्या बंगल्यावर केंद्र सरकारनंही आक्षेप घेतलेत’

ज्या भाजपच्या आमदाराकडून आदित्य ठाकरेंवर टीका, त्यांच्याच हस्ते शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला हारतुरे; कल्याणमध्ये चाललंय काय?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.