AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टाटाची नोकरी नाकारली आणि अभ्यास केला, यूपीएससीत राज्यात दुसरा क्रमांक

जालना : यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएसच्या परीक्षेतील महाराष्ट्रातील मुलांनी घवघवीत यश मिळवलंय. 89 पैकी 12 जण हे महाराष्ट्रातले आहेत. जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक गावचा अभिजित जीनचंद्र वायकोस हा देखील देशात 27 वा, तर राज्यात दुसरा आलाय. सध्या यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीची तयारी करत असतानाच त्याच्यासाठी ही खुशखबर आली आहे. 11 […]

टाटाची नोकरी नाकारली आणि अभ्यास केला, यूपीएससीत राज्यात दुसरा क्रमांक
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

जालना : यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएसच्या परीक्षेतील महाराष्ट्रातील मुलांनी घवघवीत यश मिळवलंय. 89 पैकी 12 जण हे महाराष्ट्रातले आहेत. जालना जिल्ह्यातील वरुड बुद्रुक गावचा अभिजित जीनचंद्र वायकोस हा देखील देशात 27 वा, तर राज्यात दुसरा आलाय. सध्या यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेच्या मुलाखतीची तयारी करत असतानाच त्याच्यासाठी ही खुशखबर आली आहे. 11 फेब्रुवारीला अभिजितची मुलाखत आहे.

वरुड बुद्रुक येथील जीनचंद्र आणि नयना यांचा मुलगा अभिजित 2015 मध्ये पुण्यातील पीआयसीटीतून अभियंत्याची पदवी घेऊन उत्तीर्ण झाला. यानंतर त्याला टाटा कंपनीची ऑफरही होती. पण त्याने नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आणि अभ्यासाची सुरुवात केली. अभ्यासासाठी तो दिल्लीला गेला आणि जीव ओतून तयारीला लागला.

वाचाबापाने शिक्षणासाठी शेत विकलं, पोराने यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं

अभिजितला कुटुंबीयांचा संपूर्ण पाठिंबा होता. त्यामुळेच नोकरीची ऑफर नाकारल्यानंतरही त्याच्या आई-वडिलांनी त्याला दिल्लीला जाण्यासाठी पाठिंबा दिला. तिसऱ्या प्रयत्नात अभिजितने आयएफएसमध्ये देशात 27 वा क्रमांक मिळवला. शिवाय तो सध्या यूपीएससीच्या आयएएस/आयपीएस परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत पोहोचलाय.

अभिजित सध्या दिल्लीला तयारी करत असल्यामुळे त्याच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही. त्याचे काका प्रकाश वायकोस यांनी अभिजितच्या यशाबद्दल आम्हाला सांगितलं. ते म्हणाले, अभिजितल्या त्याचे आई आणि वडिलांनी कायम पाठिंबा दिला. घरी आठ एकर कोरडवाहू शेती आहे. मुलांचं शिक्षण हीच जीनचंद्र आणि नयना यांची संपत्ती आहे.

वाचाबाप बँड वाजवत होता, मुलगा यूपीएससी पास झाल्याची बातमी आली

अभिजित अभ्यासात लहानपणापासूनच हुशार आहे. चौथीपर्यंतचं शिक्षण त्याने गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत घेतलं. त्यानंतर पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी कुटुंबीयांनी त्याला बुलडाण्याच्या भारत विद्यालयात पाठवलं. अभिजित दहावीला बुलडाणा जिल्ह्यात प्रथम आला होता. जीनचंद्र यांचे तीनही मुलं अभ्यासात हुशार आहेत. अभिजितच्या सर्वात छोट्या भावाने दहावीला 98 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले होते. तर मधला भाऊ बीएएमएसचं शिक्षण घेतोय.

यूपीएससीत गैरइंग्रजी मुलांवर नेहमीच अन्याय होतो, अशी ओरड केली जाते. पण तुम्ही तळमळीने अभ्यास करत असाल तर कुणीही तुम्हाला रोखू शकत नाही हे महाराष्ट्रातील यशस्वी विद्यार्थ्यांनी दाखवून दिलंय. कारण, 89 पैकी तब्बल 12 विद्यार्थी फक्त महाराष्ट्रातले आहेत.

महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवार आणि रँकिंग

यूपीएससीमार्फत एनडीए, सीएसई (Civil services examination), IFS अशा विविध परीक्षा घेतल्या जातात. आयएफएसचा निकाल गुरुवारी जाहीर झालाय. यापैकी आयएफएस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 89 जणांपैकी महाराष्ट्रातले 12 जण आहेत.

शेख जमीर मुनीर (18)

अभिजित जीनचंद्र वायकोस (27)

श्रीकांत खांडेकर (33)

अनिल म्हस्के (49)

जीवन दगडे (56)

चंद्रशेखर परदेशी (59)

अनिकेत वनवे (66)

योगेश कुलाल (68)

विक्रम नाधे (71)

हर्षराज वाठोरे (77)

पीयूष गायकवाड (85)

धनंजय वायभासे (89)

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.