जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!

जिनेव्हा करार नाही, या पाच गोष्टींमुळे अभिनंदन यांची सुटका ऐतिहासिक!

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं भारतीय भूमीत झालंय. पाकिस्तानच्या ताब्यातून एखाद्या सैनिकाची काही तासात सुटका हा भारताचा ऐतिहासिक विजय आहे. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय की जेव्हा 48 तासात सैनिकाची सुटका करण्यात आली. हातात तिरंगा घेऊन भारताच्या या वीरपुत्राचं स्वागत वाघा बॉर्डरवर करण्यात आलं. सूत्रांच्या माहितीनुसार, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका […]

सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचं भारतीय भूमीत झालंय. पाकिस्तानच्या ताब्यातून एखाद्या सैनिकाची काही तासात सुटका हा भारताचा ऐतिहासिक विजय आहे. इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय की जेव्हा 48 तासात सैनिकाची सुटका करण्यात आली. हातात तिरंगा घेऊन भारताच्या या वीरपुत्राचं स्वागत वाघा बॉर्डरवर करण्यात आलं.

सूत्रांच्या माहितीनुसार, विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका बीटिंग रिट्रीट दरम्यान सायंकाळी करावी, अशी पाकिस्तानची इच्छा होती. पण भारताने दुपारीच त्यांना सोडण्यात यावं, अशी स्पष्ट मागणी केली. यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी स्पष्ट केलं, की अभिनंदन यांची सुटका दुपारी अटारी-वाघा बॉर्डरवर केली जाईल.

एखाद्या देशाकडून सैनिकाची एवढ्या कमी वेळात सुटका करण्याची ही पहिलीच वेळ आहे. निवृत्त मेजर जनरल अशोक मेहता यांनी आज तकशी बोलताना सांगितलं, की सैन्य अधिकाऱ्याला 36 ते 48 तासात सोडण्याची इतिहासातली ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी कारगिल युद्धाच्या वेळीत पायलट नचिकेत यांना पाकिस्तानकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्या सुटकेसाठी आठ दिवस लागले होते.

जिनेव्हा कराराचा परिणाम नाही

अभिनंदन यांची सुटका हे जिनेव्हा कराराचं यश असल्याचं सांगितलं जातंय. पण जिनेव्हा संधी लागू कधी होते याचेही काही नियम आहेत. दोन देशांनी युद्धाची घोषणा केलेली असते तेव्हा जिनेव्हा करार लागू होतो. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे याला जिनेव्हा संधी अंतर्गत पाहिलं जाऊ शकत नाही, असं माजी अधिकाऱ्यांचं मत आहे.

पुलवामा हल्ल्यापासून खंबीरपणे भारताच्या सोबत असलेल्या अमेरिकेचीही यामध्ये मोठी भूमिका आहे. विंग कमांडर अभिनंदन यांना सोडण्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने इम्रान खान यांच्या या निर्णयाचं स्वागत केलं. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत घोषणा केली होती, की आम्ही शांततेच्या दृष्टीने पाऊल म्हणून अभिनंदन यांची सुटका करत आहोत.

27 फेब्रुवारी रोजी पाकिस्तानच्या विमानांनी भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी केली होती. या विमानांना हुसकावून लावताना अभिनंदन यांच्या मिग 21 या विमानाचा अपघात झाला आणि ते पॅराशूटच्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. विशेष म्हणजे अभिनंदन यांनी पाकिस्तानचं अत्याधुनिक F-16 हे विमान पाडलं.

अभिनंदन यांना सोडण्यासाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबावही होता. कारण, भारताने पाकिस्तानविरुद्ध नाही, तर दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्याचा बदला म्हणून एका पायलटला अटक करणं हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची गोची करणारं ठरु शकलं असतं. म्हणून भारताच्या परराष्ट्र धोरणाचा यामध्ये विजय झाला.

व्हिडीओ पाहा :


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें