Abhishek Bachchan | वचन हे वचन असते, कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिषेक बच्चनचे ट्वीट

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने कोरोनावर मात केली (Abhishek Bachchan Corona Negative) आहे.

Abhishek Bachchan | वचन हे वचन असते, कोरोनामुक्त झाल्यानंतर अभिषेक बच्चनचे ट्वीट
Namrata Patil

|

Aug 08, 2020 | 3:24 PM

मुंबई : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन याने कोरोनावर मात केली आहे. नुकतंच ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. त्यामुळे बच्चन कुटुंबातील सर्व जण कोरोनामुक्त झाले आहेत. तब्बल 29 दिवसांनंतर अभिषेक बच्चनला डिस्चार्ज देण्यात येणार आहे. (Abhishek Bachchan Corona Negative)

“वचन हे वचन असते. आज दुपारी माझा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. मी कोरोनाला हरवेन हे तुम्हाला आधीच सांगितले होते. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करणाऱ्यांचे धन्यवाद. तसेच नानावटी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सेस यांचाही मी सदैव ऋणी आहे,” असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केले आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

दरम्यान काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्याआधी अमिताभ बच्चन यांची सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांनी कोरोनावर मात केली होती. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे बच्चन कुटुंबातील सर्वजण कोरोनामुक्त झाले आहे.

    लागण — डिस्चार्ज 

💠अमिताभ बच्चन –  11 जुलै – 2 ऑगस्ट (22 दिवस)

💠अभिषेक बच्चन – 11 जुलै – 8 ऑगस्ट (29 दिवस)

💠ऐश्वर्या राय-बच्चन – 12 जुलै – 27 जुलै (16 दिवस)

💠आराध्या बच्चन – 12 जुलै – 27 जुलै (16 दिवस)

हेही वाचा – ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात, अभिषेक बच्चनचे ट्वीट

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 11 जुलै रोजी रात्री उशिरा समोर आली होती. त्यांनी स्वत: ट्विट करुन याबाबत माहिती दिली होती. दोघी पितापुत्रांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे होती. त्यामुळे त्यांना 11 जुलै रोजी रात्री मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच 12 जुलै रोजी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या या दोघींमध्येही सुरुवातीला कोरोनाची लक्षणं नसल्याने त्यांना घरीच आयसोलेट करण्यात आलं होतं. मात्र, 17 जुलै रोजी या दोघींना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. (Abhishek Bachchan Corona Negative)

संबंधित बातम्या : 

Amitabh Bachchan | बिग बींनी कोरोनाला हरवलं, अमिताभ बच्चन यांना डिस्चार्ज

ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात, अभिषेक बच्चनचे ट्वीट

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें