AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बरे झालेल्या कोरोना रुग्णांना अनेक महिन्यांपर्यंत आजाराच्या लक्षणांचा त्रास : ऑक्सफर्ड

ब्रिटेनमध्ये केलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यास अहवालात (UK Study) कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी (Corona Virus Infection) गंभीर बाब समोर आली आहे.

बरे झालेल्या कोरोना रुग्णांना अनेक महिन्यांपर्यंत आजाराच्या लक्षणांचा त्रास : ऑक्सफर्ड
| Updated on: Oct 19, 2020 | 8:02 PM
Share

लंडन : ब्रिटेनमध्ये केलेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका अभ्यास अहवालात (UK Study) कोरोना विषाणूच्या संसर्गाविषयी (Corona Virus Infection) गंभीर बाब समोर आली आहे. या अहवालात सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या रुग्णांपैकी अर्ध्यापेक्षा अधिक रुग्णांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडल्यावरही जवळपास 2-3 महिन्यापर्यंत कोरोनाची लक्षणं दिसत होती. यात दम लागणे, थकवा, चिंता आणि इतर अनेक लक्षणांचा समावेश आहे (According to Oxford study covid patient show symptoms months after contracting virus).

ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या (Oxford University) संशोधकांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या संशोधन अहवालात दीर्घ काळापर्यंत कोरोनाची लक्षणं दिसत असल्याचं समोर आलं आहे. सर्व्हेक्षणात जवळपास 58 रुग्णांना रुग्णालयातून सोडल्यानंतरही मोठा काळ कोरोनाच्या लक्षणांचा त्रास होत होता.

‘कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या अनेक अवयवांवर परिणाम’

संशोधन अभ्यासानुसार, काही कोरोना रुग्णांच्या शरीरातील अनेक अवयवांमध्ये त्रास होत असल्याचं दिसून आलं. सातत्याने सूज असल्याने रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असं असलं तरी या अभ्यास अहवालाची इतर संशोधकांकडून चिकित्सा करणे बाकी आहे. त्याआधीच हा अभ्यास अहवाल MedRxiv वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.

ऑक्सफर्डच्या रेडक्लिफ विभागाचे डॉक्टर बेट्टी रमन म्हणाले, “अभ्यासाच्या निष्कर्षांच्या आधारे आता रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर कोरोनाचा शरीरावरील परिणाम शोधणे आणि रुग्णांची देखभाल करण्यासाठी योग्य मॉडेल विकसित करणे गरजेचे आहे.”

‘संसर्गानंतर अनेक महिन्यांपर्यंत शरीर आणि मेंदूत आजाराची लक्षणं’

मागील आठवड्यात ब्रिटेनच्या नॅशनल इंस्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चच्या (NIHR) अहवालात कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर अनेक महिने शरीर आणि मेंदूच्या कामावर परिणाम होत राहतो सांगण्यात आलंय. याला दीर्घ कोव्हिडही म्हटलं जातंय.

ऑक्सफोर्डच्या अभ्यासानुसार, COVID-19 च्या संसर्गानंतर 2-3 महिन्यांनंतरही 64 टक्के रुग्णांना श्वास घेण्यास त्रास जाणवतो. तसेच 55 टक्के रुग्णांना थकवा जाणवत असल्याचं समोर आलंय.

एमआरआय स्कॅनमध्ये 60 टक्के कोरोना रुग्णांच्या फुफुसावर, 29 टक्के रुग्णांच्या किडनीवर, 26 टक्के रुग्णांच्या ह्रदयावर आणि 10 टक्के रुग्णांच्या यकृतावर परिणाम झालेला दिसला.

हेही वाचा :

Dharavi Pattern | धारावीतील कोरोना पॅटर्नची ‘ऑक्सफर्ड’कडून दखल, तर अहमदनगरच्या सुपुत्राचेही कौतुक

‘अ‍ॅस्ट्राझेनेका’च्या कोरोना लशीला ब्रेक, प्रतिकूल परिणामांमुळे पुण्यात चाचणीला स्थगिती

देशात कोरोना लशीच्या वैद्यकीय चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा सुरु, DGCI कडून परवानगी

According to Oxford study covid patient show symptoms months after contracting virus

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.