धक्कादायक! वर्ध्यात शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

हिंगणघाट शहरात आज (3 फेब्रुवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास एका शिक्षिकेच्या (Attempts to burn teacher in wardha) अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

धक्कादायक! वर्ध्यात शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न


वर्धा : हिंगणघाट शहरात आज (3 फेब्रुवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास एका शिक्षिकेच्या (Attempts to burn teacher in wardha) अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये शिक्षिका 20 ते 30 टक्के भाजली असून तिच्यावर जवळील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ (Attempts to burn teacher in wardha) उडाली आहे.

शिक्षिका (वय 30) दररोज सकाळी आपल्या शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. आजही शिक्षिका शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच आरोपीने शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आरोपी हा शिक्षिकेच्या दारोडा गावातील आहे, अशी माहिती मिळत आहे.

ही घटना एकतर्फी प्रेमातून झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. आरोपीची दुचाकी जप्त केली असून त्याचा शोध सुरु आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, शिक्षिकेची परिस्थिती चिंताजनक असून तिच्यावर हिंगणघाट येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI