खिसा कापणाऱ्यांना फाशी देत नाहीत, खासदार निलंबनावर काँग्रेस नेते अधीर रंजनांचा संताप

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या 7 खासदारांच्या निलंबनावर जोरदार संताप व्यक्त केला.

खिसा कापणाऱ्यांना फाशी देत नाहीत, खासदार निलंबनावर काँग्रेस नेते अधीर रंजनांचा संताप

नवी दिल्ली : काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेत काँग्रेसच्या 7 खासदारांच्या निलंबनावर जोरदार संताप व्यक्त केला. खिसा कापणाऱ्याला फाशीची शिक्षा देत नाहीत, असं म्हणत त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या निलंबनालाच आव्हान दिलं. (Adhir Ranjan Chowdhury on MP suspension). यावेळी त्यांनी काँग्रेसच्या खासदारांचं निलंबन मागे घेण्याची मागणी केली. त्यांच्या या वक्तव्यावर संसदीय कामकाज मंत्री आणि भाजप नेते प्रल्हाद जोशी यांनी आक्षेप घेत प्रश्न उपस्थित केले.

अधीर रंजन चौधरी यांनी आज (6 मार्च) लोकसभेत काँग्रेसच्या 7 खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी केली. तसेच काँग्रेसच्या खासदारांच्या निलंबनाला कोणताही आधार नसल्याचा दावा केला. काँग्रस खासदारांनी नेहमीच सभागृहाचा सन्मान केल्याचंह यावेळी रंजन चौधरी यांनी सांगितलं.

अधीर रंजन चौधरी म्हणाले, “लोकसभा सभागृहात विरोध करताना इतर विरोधी पक्षांचे खासदार देखील उपस्थित होते. मात्र, असं असतानाही केवळ काँग्रेसच्या 7 खासदारांचं निलंबन करण्यात आलं. याचा आधार काय माहिती नाही. खिसा कापणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली जात नाही.”

चौधरी यांच्या या वक्तव्यानंतर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी प्रश्न उपस्थित केले. निलंबित खासदारांची तुलना खिसेकापूंसोबत करणे योग्य नसल्याचं म्हणत जोशी यांनी या मताशी आपण सहमत नाही असं सांगितलं. ते म्हणाले, “यूपीएच्या (UPA) काळात भाजपच्या 45 खासदारांना सुरु असलेल्या अधिवेशनात उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं होतं. भाजप विरोधपक्षात असताना विरोधी पक्षनेते लालकृष्ण आडवाणी भाजपच्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांचा अपमान करु देत नव्हते.”

Adhir Ranjan Chowdhury on Suspension of congress MP

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI