AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनामुक्तीनंतर पुण्याच्या महापौरांचा पुन्हा धडाका, बेड्सचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना

कोरोनामुक्तीनंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा नव्या जोमानं कामाला सुरुवात (Pune Mayor Murlidhar Mohol) केली.

कोरोनामुक्तीनंतर पुण्याच्या महापौरांचा पुन्हा धडाका, बेड्सचा प्रश्न निकाली काढण्याच्या सूचना
| Edited By: | Updated on: Jul 21, 2020 | 10:23 AM
Share

पुणे : कोरोनामुक्तीनंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुन्हा नव्या जोमानं कामाला सुरुवात (Pune Mayor Murlidhar Mohol) केली. शहरातील बेड्सच्या प्रश्नावर महापौरांनी तातडीची बैठक घेतली. उपलब्ध बेड्स आणि नजीकच्या काळातील आवश्यक असणाऱ्या बेड्सच्या संख्येचा आढावा (Pune Mayor Murlidhar Mohol) घेतला.

यावेळी ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड्स तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. लवकरच बेड्स प्रश्न सुटणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

ससूनमध्ये साधारण नवीन 630 बेड्स उपलब्ध केले जाणार आहेत. त्यात आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटर बेड तयार केले जाणार आहेत. तसेच महापालिकेच्या दळवी हॉस्पिटल, बोपोडी हॉस्पिटल आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ज्युपिटर, संचेती हॉस्पिटलमध्ये नवीन 125 आयसीयू बेड्स आणि 100 ऑक्सिजन बेड्स लवकरच उपलब्ध केले जाणार आहेत, अशी माहिती महापौरांनी दिली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

त्याचबरोबर PMRDA च्या माध्यमातून बालेवाडीत 800 बेड्स नव्याने उपलब्ध केले जाणार आहेत. त्यात 200 आयसीयू आणि 600 ऑक्सिजन बेड्सचा समावेश असेल. पुणे महापालिकेच्या माध्यमातून 3 ऑगस्टपर्यंत 600 ऑक्सिजन बेड्स तयार केले जात आहेत. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये 10% बेड्स ऑक्सिजनचे केले जाणार आहेत. येत्या 2 दिवसात 50 ऑक्सिजन बेडस तात्काळ केले जाणार आहेत, असंही महापौर मोहोळ यांनी सांगितले.

गेल्या आठवडाभरापासून शहरात रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बेडच्या संदर्भात तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापौरांनी तातडीने बैठक घेत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्याच्या महापौरांपाठोपाठ कुटुंबीयही कोरोनाच्या विळख्यात, मोहोळ कुटुंबातील आठ जणांना लागण

“फील्डवर छान काम, आता काळजी घ्या” पुण्याचे कोरोनाग्रस्त महापौर मुरलीधर मोहोळ यांना मुख्यमंत्र्यांचा फोन

Pune Lockdown | पुण्यात 23 जुलैनंतर लॉकडाऊन वाढवणार नाही, मात्र गर्दी टाळण्यासाठी निर्बंध : जिल्हाधिकारी

Pune Lockdown | निर्बंध शिथिल होताच 698 पुणेकरांकडून नियमांचं उल्लंघन, 16 दिवसात 14,915 जणांवर कारवाई

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.