AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट

रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे आणि आदित्य चोळके या तिघांना अटक करण्यात आली आहे.

Road Rage नाही, सुपारी घेऊन रेखा जरेंची हत्या, तिघांच्या अटकेने नवा ट्विस्ट
| Updated on: Dec 02, 2020 | 6:15 PM
Share

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणी (Rekha Jare Murder Case) नवा ट्विस्ट समोर आला आहे. अहमदनगर पोलिसांनी तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या असून कोर्टाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासात आणखी कोणाचे नाव समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (Three Accuse gets Police Custody in Ahmednagar’s Rekha Jare Murder Case)

रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी फिरोज शेख, ज्ञानेश्वर शिंदे आणि आदित्य चोळके या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना सात तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. सुरुवातीला, रोड रेज म्हणजेच रस्त्यावर चालकांमधील वादातून ही हत्या झाल्याचा कयास बांधला जात होता. मात्र तिघांनी सुपारी घेऊन जरे यांची हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

नाट्यमय हत्याकांड

रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं.

रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्यामुळे जरे मायलेकाशी दुचाकीस्वारांचा वाद झाला. या वादातूनच रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले होते.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन दिवसांच्या आत आरोपींना अटक केली आहे. सुरुवातीला ‘रोड रेज’मधून झालेल्या वादातून रेखा जरे यांची हत्या झाल्याचं वाटत होतं, परंतु आरोपींनी सुपारी घेतल्याची कबुली दिल्याने हत्येला वेगळा रंग आला.

संबंधित बातम्या :

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

(Three Accuse gets Police Custody in Ahmednagar’s Rekha Jare Murder Case)

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.