मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही, कॉल करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचं उत्तर

अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने पाण्याच्या प्रश्नावर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच कॉल केला (Farmers call to Ajit Pawar).

मी वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नाही, कॉल करणाऱ्या शेतकऱ्याला अजित पवारांचं उत्तर
Follow us
| Updated on: May 31, 2020 | 10:42 PM

अहमदनगर : राज्यभरात मान्सुनच्या आगमनापूर्वी उन्हाचा पारा चांगलाच चढला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल आहेत. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील एका शेतकऱ्याने पाण्याच्या प्रश्नावर थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच कॉल केला (Farmers call to Ajit Pawar). या शेतकऱ्याने अजित पवार यांच्याकडे ऊस जळून जात असल्याची व्यथा सांगत कुकडी प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी केली. यावर अजित पवार यांनी आपण कुठल्याही वरिष्ठ मंत्र्याच्या कामात लुडबुड करत नसल्याचं स्पष्ट करत जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलायला सांगितले.

या शेतकऱ्याचा आणि अजित पवार यांच्या संभाषणाची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या क्लिपमधील शेतकऱ्याचं नाव मारुती भापकर असं आहे. ते अजित पवार यांना म्हणाले, “मी श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा या गावातील रहिवासी आहे. राहुल जगताप यांच्या गावाशेजारीच माझं गाव आहे. कुकडीचं आवर्तन आणखी 15 दिवसांनी सोडणार म्हणत आहेत. मात्र, ऊस आणि इतर बाकीची पिकं जळून चालली आहेत. ”

यावर अजित पवार म्हणाले, “हे खातं माझ्याकडं नाही, जयंत पाटील यांच्याकडं आहे. त्यांनी याची बैठक घेतली होती. ज्यावेळी माझे सहकारी, माझे प्रांताध्यक्ष बैठक घेतात त्यावेळी मी त्यात जास्त लुडबुड करत नाही. जयंत पाटील यांना बोलावं लागेल. राहुल जगताप यांना जयंत पाटील यांच्याशी बोलण्यास सांगा.”

यानंतर संबंधित शेतकऱ्याने अजित पवार यांना तुम्ही हस्तक्षेप करा असं म्हटलं. त्यावर अजित पवार यांनी स्पष्टपणे नकार देत सांगितलं, “जयंत पाटील यांनी 15 दिवसांपूर्वीच कुकडी प्रकल्पाची बैठक घेतली आहे. त्यात त्यांनी याविषयी काही निर्णय घेतले आहेत. जयंत पाटील हे पदाने माझे वरिष्ठ आहेत. हे खातं जर जयंत पाटील यांच्याकडे नसतं, इतर कुणाकडे असतं तर मी सांगितलं असतं.”

हेही वाचा :

Lockdown 5.0 : महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती, मात्र या 9 गोष्टींवरील बंदी कायम

Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु?

Maharashtra Lockdown Guideline | महाराष्ट्रासाठी लॉकडाऊन 5 ची नियमावली, शाळा-कॉलेज, धार्मिक स्थळ बंदच राहणार

CM Uddhav Thackeray | महाराष्ट्रात काय सुरु, काय बंद? आरोग्य, शिक्षण ते आपत्ती सज्जता, मुख्यमंत्र्यांचे सर्व महत्वाचे मुद्दे

Farmers call to Ajit Pawar

Non Stop LIVE Update
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.