पांडुरंग रायकरांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल, दोषींवर कडक कारवाई करणार : अजित पवार

पांडुरंग रायकरांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येईल, दोषींवर कडक कारवाई करणार : अजित पवार

आपल्यातील एक पत्रकाराला स्वत:चा जीव गमवावा लागला. ही अतिशय दु:खद घटना घडली, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Pandurang Raikar death)

Namrata Patil

|

Sep 05, 2020 | 5:25 PM

पुणे : पुण्यात वेळेत सुविधा उपलब्ध न झाल्याने ‘टीव्ही 9 मराठी’चे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा अहवाल सोमवारी येणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. हा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Pandurang Raikar death and Pune Jumbo Hospital)

“आपल्यातील एक पत्रकाराला स्वत:चा जीव गमवावा लागला. ही अतिशय दु:खद घटना घडली. ती घटना घडल्यानंतर मी मीडियासमोर आलो नाही. मात्र, मी ताबडतोब विभागीय आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. याबाबत चौकशी झाली पाहिजे. ससूनच्या टीमला त्याची जबाबदारी दिली आहे. त्याचा अहवाल सोमवारी येईल,” अशी माहिती अजित पवारांनी दिली.

पुण्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी बैठक घेतली. या बैठकीत कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील याबाबत चर्चा झाली. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि कॅबिनेट मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

जम्बो हॉस्पिटलबाहेर स्क्रिन लावणार 

“पुण्याच्या जम्बो हॉस्पिटलबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे जे कोणी ते हॉस्पिटल सांभाळत आहेत, त्यांना जमत नसेल तर तिथे नवीन टीम नियुक्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जम्बो सेंटरमध्ये स्क्रिन लावण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्ण आतमध्ये व्हेंटिलेटरवर आहे की व्यवस्थित आहे, हे नातेवाईकांना दिसावं यासाठी स्क्रिन लावण्यात येणार आहे. तसेच जम्बो सेंटरमध्ये कॅमेरा लावणार आहे,” असेही अजित पवारांनी सांगितले. (Ajit Pawar on Pandurang Raikar death and Pune Jumbo Hospital)

“नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. जवळपास 25 ते 30 टक्के नागरिक मास्क वापरत नाही. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवलंच पाहिजे, मास्क वापरलंच पाहिजे. वेळोवेळी सॅनिटायझर किंवा स्वच्छा हात धुणं, या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पण काही जणांना याची फारसी गरज वाटत नाही, असेही अजित पवार म्हणाले.

“ऑक्सिजनचा हवा तसा पुरवठा नाही. आज सकाळीच याबाबत चीफ सेक्रेटरींशी बोललो. राजेश टोपेंनी काल याच्यावर बैठक घेतली. ऑक्सिजन तयार करणारे कारखाने औद्योगिक कारणासाठी ऑक्सिजन दिलं जातं. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन आधी दिलं पाहिजे. याबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना सांगितलं आहे. ऑक्सिजन मिळाला नाही, म्हणून काही विपरीत घडू नये. त्यामुळे आम्ही जावडेकरांना सांगितलं आहे,” असेही अजित पवारांनी सांगितले.

“रुग्णवाहिकेबद्दल माहिती मिळावी, याची सुविधा केली आहे. सोमवारी अधिवेशनात सार्वजनक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस विभाग यासाठी काय गरजेचं आहे. कोरोना संकटात लढत असणाऱ्या सगळ्या विभागांची माहिती आम्ही घेतली आहे. त्याबाबत पुरवणी मागण्यांमध्ये या सगळ्या विभागांसी संबंधित मागण्या कशा आणता (Ajit Pawar on Pandurang Raikar death and Pune Jumbo Hospital) येतील, याबाबत प्रयत्न करु. अधिवेशन सोमवारी असल्याने त्याबाबत जास्त बारकाईन बोलणं सूचित दिसणार नाही,” असे अजित पवार म्हणाले. (Ajit Pawar on Pandurang Raikar death and Pune Jumbo Hospital)

संबंधित बातम्या :

दादाला भूक लागली होती, त्याला डबाही पोहोचला नाही, पांडुरंग रायकरांच्या बहिणीचा प्रशासनावर संताप

Sharad Pawar | डॉक्टर्स, नर्स, वेळेवर औषध नाही, जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कसे उपचार दिले जातात? शरद पवारांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें