बारामतीत ‘तुफान आलंया’, अजित पवार, सुनंदा पवार, रोहित पवारांकडून श्रमदान

बारामती : बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या ‘मी बारामतीकर’ अभियानातून आज तालुक्यातील 15 गावांमध्ये महाश्रमदान सोहळा आयोजित करण्यात आला. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तब्बल 1800 घनमीटर खोदकाम केलं. त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या जिरायत भागांची पाणी समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे. बारामती तालुक्यातील काऱ्हाटी, भिलारवाडी, जराडवाडी, चौधरवाडी, जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, नारोळी, […]

बारामतीत 'तुफान आलंया', अजित पवार, सुनंदा पवार, रोहित पवारांकडून श्रमदान
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

बारामती : बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या पुढाकारातून राबवण्यात आलेल्या ‘मी बारामतीकर’ अभियानातून आज तालुक्यातील 15 गावांमध्ये महाश्रमदान सोहळा आयोजित करण्यात आला. त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत तब्बल 1800 घनमीटर खोदकाम केलं. त्यामुळे येत्या काळात बारामतीच्या जिरायत भागांची पाणी समस्या सुटण्यासाठी मदत होणार आहे.

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी, भिलारवाडी, जराडवाडी, चौधरवाडी, जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, नारोळी, सायबाची वाडी, सुपे, दंडवाडी, सिध्देश्वर निंबोडी, मोढवे, मुर्टी या गावामंध्ये आज महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले. जिरायती गावाच्या दुष्काळमुक्तीला गावापासून ते शहरापर्यंत साऱ्यांचाच हातभार लागावा व गावकऱ्यांना पाठबळ मिळावे या हेतूने झालेल्या या महाश्रमदानात तालुक्यातीलहजारो श्रमदात्यांनी सहभाग घेतला. आज तीन तासांत झालेल्या महाश्रमदानात १८०० घनमीटर खोदकाम करण्यात आले, ज्यातून पहिल्या पावसात एकावेळी तालुक्यात एवढे पाणी साठणार आहे.

आजच्या महाश्रमदानासाठी गेल्या वीस दिवसांपासून नियोजन सुरू होते. या नियोजनात अगदी प्रत्येक गावांत अधिकाधिक श्रमदाते नियोजनपूर्वक जातील व कोणत्याही गावात किमान दीड हजारांपेक्षा संख्या कमी राहणार नाही याची काळजी घेतली जात होती. एकाच दिवशी एकाच वेळी 15 गावांत हजारोंनी टिकाव, खोरी हातात घेऊन खोदलेले सलग समतल चर येणाऱ्या पावसाळ्यात पहिल्याच पावसात त्या गावाला आश्वासक दिलासा देतील या दृष्टीने केलेले हे नियोजन प्रथमदर्शनी यशस्वी ठरले.

आजच्या या महाश्रमदानात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, महाश्रमदानाच्या आयोजक सुनंदा पवार यांनी स्वतःही यामध्ये सहभाग घेतला. अजित पवार यांनी जराडवाडी येथे भेट देऊन श्रमदान केले व सहभागी श्रमदात्यांचे कौतुक केले. राजेंद्र पवार यांनी सायंबाचीवाडी येथे श्रमदान केले. रोहित पवार यांनी 15 गावांना भेटी देत युवकांबरोबर श्रमदान करीत स्वयंसेवकांचे कौतुक केले.

बारामतीच्या जिरायत भागातील २४ गावांना वर्षानुवर्षे पाण्याचा प्रश्न भेडसावतो.. या ठिकाणी योजना राबवल्या असल्या तरी त्याला मागील पाच वर्षात सरकारचं सहकार्य लाभत नाही.. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या पावसाळयात आजच्या श्रमदानाचं फळ मिळेल असं सांगत रोहित पवार यांनी शेतकऱ्यांच्या पाण्याबाबत सरकारन सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी असं म्हटलं.

एकूणच चार वर्षाच्या चिमुकल्यापासून ते सत्तर वर्षाच्या आजोबांबरोबरच माजी उपमुख्यमंत्र्यांपासून वेगवेगळ्या भागातील हजारो नागरिकांचे हात आज या श्रमदानाच्या निमित्तान राबले. बारामतीच्या 15 गावांमधील माळरान हजारोंच्या गर्दीनं फुलली. ती केवळ ‘मी बारामतीकर’ अभियानातून झालेले महाश्रमदानाच्या निमित्तानं. या अभियानाची फलनिष्पती आता पावसाळ्यातच पाहायला मिळून बारामतीच्या जिरायत भागाच्या जनतेला दिलासा मिळेल हीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होऊ लागली आहे.

Non Stop LIVE Update
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.