#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी

प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनू मलिक (Anu malik left indian idol show) यांची सोनी टीव्हीवरील संगीत शो इंडियन आयडॉलमधून पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे.

#Me Too : इंडियन आयडॉल शोमधून अनू मलिक यांची पुन्हा हकालपट्टी

मुंबई : प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अनू मलिक (Anu malik left indian idol show) यांची सोनी टीव्हीवरील संगीत शो इंडियन आयडॉलमधून पुन्हा एकदा हकालपट्टी करण्यात आली आहे. मलिक यांच्यावर #Me Too मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. त्यामुळे इंडियन आयडॉल (Anu malik left indian idol show) शोमधून त्यांना बाहेर काढल्याचे बोललं जात आहे.

#Me Too मोहिमेअंतर्गत मलिक यांच्यावर पार्श्वगायिका सोना मोहापात्रा यांनी लौंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यामुळे मलिक यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पण या टीकेनंतरही मलिका यांना शो चे परिक्षक म्हणजे जज बनवण्यात आले होते. यामुळे अनेकांनी सोनी टीव्हीवर नाराजी व्यक्त केली होती. तसेच सोनी टीव्हीवर मलिक यांची हकालपट्टी करण्यासाठी दबाव वाढत होता. त्यामुळे मलिक स्वत:हून शोमधून बाहेर पडणं पसंत केल्याचे बोललं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनू मलिक इंडियन आयडॉल या शोमधून बाहेर पडले आहेत. त्यांच्या जागी आता नवीन परिक्षक येणार असल्याची बोललं जात आहे. मात्र अधिकृत याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

अनू मलिक यांच्यावर लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर सोनी टीव्हीलाही राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस पाठवली होती. तसेच ही नोटीस महिला आयोगाने आपल्या अधिकृत ट्विटरवरही पोस्ट केली होती. लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर पुन्हा मलिक यांना इंडियन आयडल शोमध्ये घेण्यात आले होते. यावरुन पुन्हा मलिक यांना शो मधून काढून टाकावे, असा दबाव येऊ लागला. त्यामुळे सोनी टीव्हीने मलिक यांची शोमधून पुन्हा हकालपट्टी केली.


सोनी टीव्हीने पुन्हा एकदा अनू मलिक यांना इंडियन आयडॉल शोमध्ये घेतल्याने सोना मोहापात्राने पत्र लिहून ते ट्विटरवर पोस्ट केले. तसेच हे पत्र केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना टॅग केले आहे.

या पत्रामध्ये सोना यांनी अनू मलिक यांना पुन्हा शोमध्ये घेतल्यामुळे त्यांनी सोनी टीव्हीवर टीका केली. तसेच सोनी टीव्हीवर कारवाई करण्याची मागणीही पत्रात केली आहे. पण या पत्रानंतर मलिक यांनी शो सोडल्याचे बोललं जात आहे.

दरम्यान, यापूर्वीही मलिक यांना #Me Too मोहिमेअंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप लागल्यामुळे इंडियन आयडॉल शो सोडावा लागला होता. पण मलिक यांनी हे आरोप फेटाळून लावले होते. काही दिवसांपूर्वी अनू मलिक यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट लिहीत हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. हे सर्व मला बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं. पार्श्वगायिका श्वेता पंडित या 17 वर्षाच्या असताना अनू मलिक यांनी गैरवर्तवणूक केल्याचे आरोप केले होते. तर गायिका नेहा भसीन हिने सुद्धा 21 वर्षाची असताना गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI