AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर; कपिल सिब्बलांचा पुन्हा एकदा घरचा आहेर

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर असल्याचे वक्तव्य करुन सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर; कपिल सिब्बलांचा पुन्हा एकदा घरचा आहेर
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 22, 2020 | 3:58 PM
Share

नवी दिल्ली : अलिकडच्या काळातील निवडणुकांचे निकाल पाहता देशातील जनता काँग्रेसकडे (Congress) एक सक्षम पर्याय म्हणून पाहत नसल्याचे स्पष्ट आहे. मात्र, काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाने अजूनही बिहारमधील (Bihar Election) पराभवाची दखल घेतलेली दिसत नाही, असे मत व्यक्त करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी पक्षाविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर त्यांच्यावर काँग्रेमधील अनेक नेत्यांनी टीकादेखील केली. परंतु सिब्बल त्यांच्या मतांवर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस कमजोर असल्याचे वक्तव्य करुन सिब्बल यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. (as aopposition party congress is weak, Kapil sibal slam congress once again)

सिब्बल म्हणाले की, काँग्रेस पक्ष एक प्रभावी विरोधी पक्ष राहिला नाही. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसला अध्यक्ष नाही. गेल्या दिड वर्षांपासून पक्ष अध्यक्षाविना काम करतोय. कार्यकर्त्यांची दिशा भरकटतेय, त्यांना माहीत नाही की, नेमकं कुठं जायचं आहे.

सिब्बल म्हणाले की, देशात अनेक ठिकाणी झालेल्या पोटनिवडणुकींमध्येदेखील कांग्रेस पक्ष मागे पडला. उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत तर काँग्रेस पक्ष कुठेच नव्हता. तिथल्या पोटनिवडणुकीत काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना अवघी दोन टक्के मते मिळाली आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये काँग्रेसने भाजपला टक्कर देण्याचा प्रयत्न केला. तरीदेखील या राज्यांमध्ये अनपेक्षित निकाल लागले. गुजरातमधील सर्व जागा आम्ही गमावल्या. पूर्वी ते मतदारसंघ आमच्याकडे होते, परंतु आमचे नेते भाजपमध्ये गेल्यानंतर त्या जागा रिकाम्याच आहेत.

काही दिवसांपूर्वीच कपिल सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 22 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षनेतृत्वाविषयी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेस नेत्यांच्या या ‘लेटर बॉम्ब’वरून बराच गदारोळ माजला होता. यानंतर कपिल सिब्बल यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्त्वाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

बिहारमधील पराभवाचे काँग्रेसच्या पक्षनेतृत्त्वाला फारसे गांभीर्य नसल्याची खंतही कपिल सिब्बल यांनी बोलून दाखविली. या पराभवानंतर पक्षनेतृत्त्वाकडून कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आल्याचे माझ्या कानावर अद्याप आलेले नाही. कदाचित सर्वकाही सुरळीत आहे आणि बिहारचा पराभव ही सामान्य बाब आहे, असे पक्षनेतृत्त्वाला वाटत असावे, अशी टिप्पणी सिब्बल यांनी केली होती.

मुळात आपली घसरण होत आहे, ही बाब काँग्रेसने सर्वप्रथम स्वीकारायला पाहिजे. आपले कुठे चुकतेय, हे काँग्रेसला पक्के ठाऊक आहे. मात्र, त्याबाबत कोणीही जाहीर वाच्यता करायला तयार नाही. हे असेच सुरु राहिले तर भविष्यात काँग्रेसचा आलेख आणखी खाली घसरत राहील, अशी भीती कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या

मल्लिकार्जुन खर्गे यांचाही कपिल सिब्बल यांच्यावर निशाणा, काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप

कपिल सिब्बल यांच्यामुळे देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या, अशोक गेहलोतांची ट्विटची सरबत्ती

बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये घमासान, अधीर रंजन चौधरींचं कपिल सिब्बल यांना जोरदार प्रत्युत्तर

(as aopposition party congress is weak, Kapil sibal slam congress once again)

Follow Us
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?