AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद केला अन् वाजपेयींना अटक झाली; पाच दिवस देशातील सर्वात सुरक्षित तुरुंगात ठेवले!

केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कायद्याविरोधात देशातील शेतकरी दिल्लीत आपला आवाज बुलंद करत आहेत. तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. (Atal Bihari Vajpayee was in naini jail during Lucknow protest for farmer issues)

शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद केला अन् वाजपेयींना अटक झाली; पाच दिवस देशातील सर्वात सुरक्षित तुरुंगात ठेवले!
| Updated on: Dec 08, 2020 | 12:28 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कायद्याविरोधात देशातील शेतकरी दिल्लीत आपला आवाज बुलंद करत आहेत. तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. त्यासाठी आज भारत बंदही पुकारला आहे. पण भाजपने अजूनही शेतकऱ्यांची दखल घेतलेली नाही. उलट हे कायदे कसे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, हेच पटवून देण्याचा भाजपचा अट्टाहास सुरू आहे. विशेष म्हणजे याच शेतकऱ्यांसाठी भाजपने विरोधी पक्षात असताना रान माजवलं होतं. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना तर शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांना पाच दिवस नैनी तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. (Atal Bihari Vajpayee was in naini jail during Lucknow protest for farmer issues)

1974मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार होत्या. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली होती. उत्तर प्रदेशात काँग्रेसची सत्ता होती आणि हेमवंती नंदन बहुगुणा या मुख्यमंत्री होत्या. त्यावेळी अटलबिहारी वाजपेयी जनसंघाचे नेते होते. (तेव्हा भाजपची स्थापना झालेली नव्हती) त्यावेळी ते देशातील विविध समस्यांना वाचा फोडत आंदोलन करून काँग्रेसला जेरीस आणत होते.

गव्हाच्या सरकारी खरेदी विरोधात धरणे

1973 मध्ये शेतकऱ्यांनी गव्हाचे चांगले पीक घेतले होते. त्यामुळे यूपीतील काँग्रेस सरकारकडून शेतकऱ्यांना सरकारी भावातच गहू विकण्यास जबरदस्ती केली जात होती. सर्व शेतकऱ्यांना सरकारी भावातच गहू विकणे अनिवार्य असल्याचा आदेशच दिले होते. गव्हाचे उत्पादन चांगलं झाल्याने खुल्या बाजारात चांगला भाव मिळत होता. परंतु, सरकारी आदेशामुळे शेतकरी हैरान झाले होते. त्यामुळे जनसंघाने सरकारच्या आदेशाविरोधात संपूर्ण देशभर गव्हाच्या लेव्हीचं जोरदार आंदोलन केलं होतं. या आंदोलनचां नेतृत्व केलं होतं वाजपेयींनी. हजारो कार्यकर्त्यांसह वाजपेयी रस्त्यावर उतरले होते. कांग्रेस सरकार विरोधात त्यांनी मोठं आंदोलन सुरू केलं होतं. लखनऊच्या रस्त्यावर वाजपेयी उतरले होते. त्यांना हजारो शेतकऱ्यांनी साथ देत सरकार विरोधी घोषणाबाजी केली. त्यामुळे केंद्र सरकार हादरून गेलं होतं, असं ज्येष्ठ पत्रकार विक्रम राव यांनी सांगितलं. (Atal Bihari Vajpayee was in naini jail during Lucknow protest for farmer issues)

लखनऊमध्ये वाजपेयींचं आंदोलन

सरकार गरीब, शेतकरी आणि मजुराना त्यांचं धान्य विकण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. सरकार धान्य भांडारासाठी देशभरातून गहू खरेदी करत होती. सरकारी भावात ही धान्य खरेदी केली जात होती आणि हा दर अत्यंत कमी होता, असं विक्रम राव सांगतात. शेतात एक क्विंटल गव्हाचं उत्पादन जरी झालं असेल तरी शेतकऱ्यांनी अर्धा गहू सरकारी भावात विकला पाहिजे, असा आदेशच सरकारने काढला होता. सरकारच्या या आदेशावर शेतकरी नाराज होते आणि त्यामुळेच त्यांनी त्याला विरोध केला होता. त्यामुळेच शेतकरी जनसंघाच्या पाठिशी उभे राहिले होते.

नैनी तुरुंगात वाजपेयींना ठेवले

वाजपेयींनी शेतकरी आंदोलनाला हवा दिल्याने त्यांना लखनऊमध्ये अटक करण्यात आली होती. पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवत वाजपेयींना अटक केली. त्यावेळी जमाव एवढा प्रचंड होता की वाजपेयींना स्थानिक तुरुंगात ठेवणं शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांना देशातील सर्वात सुरक्षित तुरुंग समजल्या जाणाऱ्या नैनी तुरुंगात ठेवण्यात आल्याचं विक्रम राव यांनी स्पष्ट केलं. वाजपेयींनाच नव्हे तर त्यांच्यासोबत आंदोलन करणाऱ्या पाचशे आंदोलकांना नैनी तुरुंगातील बॅरेक नंबर पाचमध्ये ठेवण्यात आले होते. या तुरुंगात त्यांना पाच दिवस ठेवण्यात आले होते. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. त्यानंतरही आणीबाणी वाजपेयींना तुरुंगात जावं लागलं होतं. त्यानंतर वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक गोष्टी केल्या. शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डची सुविधा त्यांनी दिली. गव्हाचा हमी भाव 19.6 टक्के वाढवून त्यांनी इतिहास रचला. तसेच साखर कारखान्यांना परमिट राजपासून मुक्त केलं. तसेच राष्ट्रीय कृषी विमा योजनाही वाजपेयींनीच आणली. (Atal Bihari Vajpayee was in naini jail during Lucknow protest for farmer issues)

संबंधित बातम्या:

भारत_बंद – महाराष्ट्रातील Live Updates | मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर शुकशुकाट

‘भारत बंद’ला राज्यभरात प्रतिसाद, बुलडाण्यात रेल्वे अडवली, सर्व APMC मार्केट आणि आडत बंद

मोठी बातमी: मुंबईत दुपारनंतर दुधाच्या गाड्या येणार नाहीत; दूध खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

(Atal Bihari Vajpayee was in naini jail during Lucknow protest for farmer issues)

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.