औरंगाबादेत एकाचवेळी तब्बल 27 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, बाधितांचा आकडा 83 वर

कोरोना विषाणूच्या संसर्गाचा औरंगाबादमधील विळखा घट्ट आज (27 एप्रिल) होताना दिसत आहे (Aurangabad Corona Patient Updates).

औरंगाबादेत एकाचवेळी तब्बल 27 कोरोना पॉझिटिव्ह सापडले, बाधितांचा आकडा 83 वर

औरंगाबाद : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा औरंगाबादमधील विळखा घट्ट आज (27 एप्रिल) होताना दिसत आहे (Aurangabad Corona Patient Updates). औरंगाबाद शहरात एकाचवेळी 27 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. दरम्यान आज दिवसभरात नव्याने 30 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासह औरंगाबादमधील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 83 वर पोहचली आहे.

औरंगाबाद शहरात आढळलेल्या 30 कोरोना बाधित रुग्णांना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतः आरोग्य अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली.

दरम्यान, याआधी 25 एप्रिल रोजी औरंगाबादमध्ये 24 तासात सर्वाधिक 7 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. यात एकाच कुटुंबातील 3 महिलांचा समावेश होता. या तिन्ही महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. औरंगाबादमध्ये आतापर्यंत 83 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर औरंगाबादमधील वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहे.

औरंगबाद शहरात आतापर्यंत 16 कोरोना रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात जिल्हा रुग्णालयातील 14 तर खासगी रुग्णालयातील 2 अशा 16 रुग्णांचा समावेश आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मराठवाड्यातील 8 पैकी 3 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहे. औरंगाबाद वगळता इतर 4 जिल्ह्यांमध्येही कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. त्यामुळे मराठवाड्यातील किमान 7 जिल्हे लवकरचं कोरोनावर मात करण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

निराधार, ज्येष्ठ, दिव्यांगांना 3 महिन्यांचं आगाऊ अनुदान, अजित पवारांच्या निर्देशानंतर 1 हजार 273 कोटी वितरीत

मुंबईत कोरोनामुळे आणखी एका पोलीस हवालदाराचा मृत्यू, 3 दिवसात 3 पोलिसांच्या मृत्यूने खळबळ

3 मेनंतर लॉकडाऊन काढणार का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…

देशभरात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 22.17 टक्क्यांवर, 85 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसात एकही नवा रुग्ण नाही

Aurangabad Corona Patient Updates

Published On - 9:11 pm, Mon, 27 April 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI