बाळासाहेब विखे तत्त्वाने वागले, सत्तेसाठी तडजोड केली नाही : राधाकृष्ण विखे-पाटील

दिवंगत नेते बाळासाहेब विखे  पाटील, नेहमी तत्त्वाने वागले. त्यांनी सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही. तसेच परिणामांचा विचार न करता, तत्त्वाशी एकनिष्ठ राहिले, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. (Balasaheb Vikhe acted on principle, did not compromise for power says Radhakrishna Vikhe-Patil)

बाळासाहेब विखे तत्त्वाने वागले, सत्तेसाठी तडजोड केली नाही : राधाकृष्ण विखे-पाटील
Follow us
| Updated on: Oct 13, 2020 | 1:38 PM

अहमदनगर : दिवंगत नेते बाळासाहेब विखे (पाटील), नेहमी तत्त्वाने वागले. त्यांनी सत्तेसाठी कधीच तडजोड केली नाही. तसेच परिणामांचा विचार न करता, तत्त्वाशी एकनिष्ठ राहिले, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे (पाटील) यांनी व्यक्त केले. ते दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटलांच्या ‘देह वेचावा कारणी’या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. (Balasaheb Vikhe acted on principle, did not compromise for power says Radhakrishna Vikhe-Patil)

दिवंगत नेते बाळासाहेब विखे (पाटील) लिखित ‘देह वेचावा कारणी’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा मंगळवरी (13 ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.

ते म्हणाले की,‘बाळासाहेब विखे पाटालंनी सत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. अपल्या तत्वावार ते कायम ठाम राहिले. बाळासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित घटकाच्या कल्याणासाठी समर्पित केलं. शेतकरी, कष्टकरी वर्गासाठी त्यांनी  शेवटपर्यंत संघर्ष केला.’ तसेच सहकाराचं रोपटं बाळासाहेबांनीच लावलं असून, त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केल्याचं सांगितलं.

दुष्काळमुक्तीचं सप्न युती सरकारने पुढे नेलं

राधाकृष्ण विखे पाटलांनी बाळासाहेब विखे पाटलांच्या राजकीय तसेच सामाजिक प्रवासावर प्रकाश टाकला. त्यावेळी ते म्हणाले की, “महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं  बाळासाहेब विखेंचं स्वप्न होतं. यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचं हेच स्वप्न पुढे घेऊन जाण्याचं काम युती सकारमधील तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून फडणवीसांनी राज्याला दुष्काळमुक्त करण्याचं काम केलं.”

मोदींच्या हस्ते आत्मचरित्राचे प्रकाशन हा बाळासाहेब विखेंचा गौरव

पुढे राधाकृष्ण विखे म्हणाले की, “बाळासाहेब विखे पाटील यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणे, ही आनंदाची गोष्ट आहे. देशाच्या खंबीर नेतृत्वाच्या हस्ते प्रकाशन, हा बाळासाहेब विखे यांचा गौरवच आहे, असे म्हणावे लागेल.” तसेच, “बाळासाहेबांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन एप्रील महिन्यात होणार होते. त्यासाठी मोदी यांनी येण्याचे मान्यही केले होते. पण मार्च महिन्यातील लॉकडाऊनमुळे हा कार्यक्रम लांबला.” असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, बाळासाहेब विखे यांच्या आत्मचरित्रातून अनेक राजकीय गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. शिवसेना प्रवेश ते राजीनामा , पवार–विखे संघर्षाची किनार, राजीव गांधी यांच्या काळात उभारलेला युथ फोरम याबरोबरच पुलोद स्थापनेवेळी शरद पवारांचे स्थान यासंदर्भात बाळासाहेब विखे पाटील यांनी आत्मचरित्रात भाष्य केल्याचे समजते.

 संबंधित बातम्या : 

Balasaheb Vikhe Patil Autobiography : बाळासाहेब विखे पाटील यांचं सर्वच क्षेत्रातील योगदान वाखाणण्यासारखं : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदींकडून आज बाळासाहेब विखेंच्या आत्मचरित्राचे प्रकाशन; राजकीय वर्तुळाला उत्सुकता

आधी विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका, नंतर एकमेकांशेजारी बसून मनसोक्त गप्पा

(Balasaheb Vikhe acted on principle, did not compromise for power says Radhakrishna Vikhe-Patil)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.