कोरोना लढ्यासाठी बीडचा प्लॅन “बी” तयार, 1365 रुग्णांवर उपचार करणारं भव्य कोरोना सेंटर सज्ज

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीड जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून प्लॅन "बी" तयार केला आहे (Beed Corona plan for prevent infection).

कोरोना लढ्यासाठी बीडचा प्लॅन "बी" तयार, 1365 रुग्णांवर उपचार करणारं भव्य कोरोना सेंटर सज्ज

बीड : राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा विळखा घट्ट होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बीड जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून प्लॅन “बी” तयार केला आहे (Beed Corona plan for prevent infection). यानुसार कोरोनाचे रुग्ण वाढल्यास त्यांच्यावर सहज उपचार होईल. यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आरोग्य विभागाने 1 हजार 365 बेडचे कोरोना सेंटर तयार केले आहे. यात स्वतंत्र बंदिस्त कक्ष, प्रत्येक कक्षात ऑक्सिजन पाईप, व्हेंटिलेटर, स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब सुरु करण्यात आली आहे. केवळ महिनाभराच्या काळात हे कोरोना सेंटर उभं करण्यात आलं आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा 87 वर पोहचला आहे. यापैकी आतापर्यंत 64 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 2 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जिल्ह्यातील विविध रुग्णालयात 21 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. बीडच्या मसरत नगरमध्ये रुग्ण आढळल्यामुळे मसरत नगर परिसर सील करण्यात आली आहे. परळीतील रेशन दुकानदाराला कोरोनाची लागण झाल्यानंतरही परळी शहरातील 3 कॉलनी सील करण्यात आल्या आहेत.

बीडमध्ये 4 कोरोनाबाधित रुग्णांसह 49 जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाईनचे आदेश झुगारुन बाधित रुग्ण शहरात फिरल्याचा आरोप आहे. कोरोनाबाधित असतानाही रुग्णांनी लग्नाला हजेरी लावली. यासाठी हैद्राबाद-बीड असा प्रवास केला. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेले सर्व नागरिक मसरत नगरचे रहिवासी आहेत.

दरम्यान, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंड यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बीडमधील आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळेच कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या संपर्कात आल्याने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, अधिकारी, नेते, कार्यकर्ते आणि पत्रकार होम क्वारंटाईन झाले आहेत.

धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

धनंजय मुंडेंच्या संपर्कात आल्याने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकच नाही, तर अधिकारी, नेते, कार्यकर्ते आणि पत्रकारही होम क्वारंटाईनमध्ये आहेत. दिलासादायक बाब म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा कोरोना अहवाल आज निगेटिव्ह आला. तर, धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या आणखी 64 जणांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

बीडचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक होम क्वारंटाईनमध्ये

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या समवेत जे पोलीस सुरक्षेसाठी होते त्यांच्या संपर्कात आल्याने बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी स्वत: होम क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या स्टाफमधले पाचजण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्ह्यातील अनेक अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या कोरोना तपासण्या झाल्या आहेत. शिवाय, धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या काही मंत्र्यांनीही स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे (Dhananjay Munde Family Members Report).

धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण

12 जून रोजी धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. धनंजय मुंडे यांच्या स्वीय सहायकासदेखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. परळीतील जगतकर गल्लीतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यावेळी तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात धनंजय मुंडे देखील आले होते. मात्र, मुंडे यांचा समावेश हायरिस्क गटात न करता लो रिस्क गटात करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेण्यात आले नव्हते. तर हायरिस्क गटातील लोकांचे स्वॅब निगेटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी (8 जून) मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उद्घाटन देखील केले होते. धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु या प्रयोगशाळेच्या उद्घाटनाला अनेकजण उपस्थित होते. सध्या धनंजय मुंडेंवर मुंबईत उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

धनंजय मुंडे यांना कोरोना, ठाकरे सरकारमधील काही मंत्रीही सेल्फ क्वारंटाईन

Dhananjay Munde COVID | आरोग्य मंत्र्यांचा धनंजय मुंडेंना फोन, प्रकृतीबाबत राजेश टोपे म्हणतात…

Pankaja calls Dhananjay | अपने तो अपने होते है | पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना फोन, तब्येतीची विचारपूस

Dhananjay Munde | धनंजय मुंडेंच्या कुटुंबियांचा अहवाल निगेटिव्ह, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख होम क्वारंटाईन

Beed Corona plan for prevent infection

Published On - 12:43 pm, Sun, 14 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI