27 सप्टेंबरला भारत बंद ! शेतकरी संघटनांचा एल्गार, हरियाणातील बाजार समित्याही राहणार बंद

शेतकरी संघटनांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे. या बंदला हरियाणा प्रदेश व्यापार मंडळानेही पाठिंबा दिला असून बंदच्या दरम्यान, हरियाणातील बाजार समित्यादेखील बंद राहणार असल्याचे हरियाणा प्रदेश मंडळाचे प्रांतीय अध्यक्ष बजरंग गर्ग यांनी सांगितले आहे.

27 सप्टेंबरला भारत बंद ! शेतकरी संघटनांचा एल्गार, हरियाणातील बाजार समित्याही राहणार बंद
Rakesh Tikait, Farmers protest
Follow us
| Updated on: Sep 25, 2021 | 6:11 PM

मुंबई : कृषी कायद्याला (agricultural law)  विरोध करीत दिल्ली- हरियाणाच्या सीमेवर गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. त्याच अनुशंगाने शेतकरी संघटनांनी 27 सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिलेली आहे. या बंदला हरियाणा प्रदेश व्यापार मंडळानेही पाठिंबा दिला असून बंदच्या दरम्यान, हरियाणातील बाजार समित्यादेखील बंद राहणार असल्याचे हरियाणा प्रदेश मंडळाचे प्रांतीय अध्यक्ष बजरंग गर्ग यांनी सांगितले आहे. या अन्यायी कृषी कायद्यामुळे खाजगी बाजार समित्या उदयास येणार असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे या बंदला पूर्ण पाठिंबा असल्याचे ते म्हणाले.

हरियाणा प्रदेश व्यापार मंडळाने 27 सप्टेंबर रोजी शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदच्या (Bharat Band) समर्थनार्थ बाजार समित्यांचाही संप (mandi sampath) जाहीर केला आहे. दुपारी चार वाजेपर्यंत बाजार समित्यांमध्ये देखील कामकाज होणार नाही. शेतकरी आणि अधिकाऱ्यांशी बोलताना संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष बजरंग गर्ग म्हणाले की, व्यापार मंडळ शेतकऱ्यांच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी राहणार आहे.

शेतकरी (Farmer) आणि व्यापारी यांचे न तुटणारे संबंध आहेत. केवळ व्यवहारिकच नाही तर व्यापारी आणि शेतकरी यांचे कौटुंबिक संबंध आहेत. शेतकरी आणि व्यापारी शतकानुशतके व्यवहार करत आहेत. परंतु राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी हे सरकार दोघांमधील बंधुत्व बिघडवण्यात गुंतले आहे. गर्ग म्हणाले की, सरकार व्यापाऱ्यांद्वारे शेतीमाल खरेदी करण्याऐवजी थेट सरकारी संस्थांकडून पिके खरेदी करण्यात गुंतले आहे. जेणेकरून आडत्यांचा व्यापार हा नुकसानीत होणार आहे.

शिवाय केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांनुसार देश आणि राज्यातील मोठ्या कंपन्यांना खासगी बाजार समित्यात उभा करण्याचा अधिकार राहणार आहे. त्यामुळे राज्यांमध्ये खासगी समित्यामुळे उभारल्या तर सरकारी बाजार समित्या ह्या बंद होतील.

साठेबाजी करून कंपन्या प्रचंड नफा कमावतील

हरियाणा कॉन्फेडचे माजी अध्यक्ष गर्ग म्हणाले की, देशात तीन कृषी कायदे लागू झाल्यास अन्नधान्यावरील साठा मर्यादा रद्द केली जाईल. अन्नधान्यावरील साठा मर्यादा रद्द झाली तर मोठ्या कंपन्या भाजीपाला आणि फळांसारख्या धान्याची साठेबाजी करून मोठा नफा कमावतील. मोठ्या कंपन्या भाज्या आणि फळे यांसारखी शेतकऱ्यांची पिके अवाजवी किंमतीत खरेदी करतील. यामुळे शेतकरी आणि आडते हे दोन्ही संपुष्टात येतील.

व्यापार मंडळ आधीच संपावर गेले आहे

शेतकरी, व्यापारी आणि देशाच्या हितासाठी तीन कृषी कायद्यांची समस्या सोडविण्याचे आवाहन व्यापारी नेते बजरंग गर्ग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करता यावी, यासाठी शेतकऱ्यांशी संवाद साधून हे प्रकरण तातडीने सोडवले पाहिजे, असे ते म्हणाले. हरियाणा प्रदेश व्यापार मंडळाने यापूर्वीच शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ बाजार समित्यामध्ये संप पुकारला आहे. कारण कृषी सुधारणांमुळे व्यापाऱ्यांची कमाई कमी होईल हे स्पष्ट आहे. (Bharat Bandh on September 27, farmers’ unions announced, market committees in Haryana to remain closed)

संबंधित बातम्या :

पुन्हा घटले सोयाबीनचे दर, शेतकऱ्यांची धाकधुक कायम

ई-श्रमिक कार्ड शेतकऱ्यांसाठी की श्रमिकांसाठीच ? जाणून घ्या काय आहेत फायदे

अवकाशातून पडला दगड, मग पंचनामा अन् बारा भानगडी

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.