AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेजसने ना ‘बिग बॉस’ पाहिले, ना मालिका, ‘चि व चि. सौ. का.’ शर्मिष्ठा राऊतची लव्ह स्टोरी कशी बहरली?

माझं स्थळ गेल्यावर त्याने माझा 'चि व चि. सौ. का.' हा पिक्चर पाहिला, नंतर काही मालिका वेबवर पाहिल्या." असं शर्मिष्ठाने सांगितलं. (Bigg Boss Marathi Fame Actress Sharmishtha Raut Love Story)

तेजसने ना 'बिग बॉस' पाहिले, ना मालिका, 'चि व चि. सौ. का.' शर्मिष्ठा राऊतची लव्ह स्टोरी कशी बहरली?
| Updated on: Jun 22, 2020 | 6:03 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’ या रिअ‍ॅलिटी शोमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा नुकताच साखरपुडा झाला. आपल्या स्वप्नातील राजकुमार तेजस देसाईशी कशी ओळख झाली, हाच आपला ‘मिस्टर राईट’ याचा कौल अंतर्मनाने कधी दिला, याविषयी शर्मिष्ठाने सांगितलं. (Bigg Boss Marathi Fame Actress Sharmishtha Raut Love Story)

लॉकडाऊनचे काही नियम शिथिल झाल्याने नाशिकमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत शर्मिष्ठाने साखरपुडा केला. इगतपुरीच्या रिसोर्टमध्ये हा समारंभ झाला. ऑक्टोबर महिन्यात ती लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. तेजस हा ‘बोस’ कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर आहे. शर्मिष्ठाने ‘टीव्ही9 मराठी’ सोबत आपली प्रेम कहाणी शेअर केली.

“आमचं अरेंज मॅरेज असलं, तरी हे ‘लव्ह मॅरेज’ आहे असंच मी म्हणेन. माझी बहीण सुप्रियाने आमची ओळख करुन दिली. त्याला पहिल्या भेटीतच मी आवडले होते. त्याने मला लग्नाची मागणी घातली, पण मी थोडा वेळ घेतला. काही महिन्यांनी हो म्हणाले. ‘दिल तो पागल है’ सिनेमासारखं फिल्मी काहीसं झालं. तुम्हाला ते आतून वाटतं… हाच आपला ‘मिस्टर राईट’ आहे, याचा कौल अंतर्मनाने मला दिला.” असं शर्मिष्ठा सांगते.

“तेजस फारसा मराठी मालिका पाहत नव्हता, त्यामुळे मी कोण आहे, हेच त्याला माहित नव्हतं. अर्थात माझीही तीच अट होती. त्याने माणूस म्हणून मला आधी ओळखावं. मग माझी अभिनेत्री म्हणून त्याला जाण व्हावी. माझं स्थळ गेल्यावर त्याने माझा ‘चि व चि. सौ. का.’ हा पिक्चर पाहिला, नंतर काही मालिका वेबवर पाहिल्या.” असं शर्मिष्ठाने सांगितलं.

“त्याला माझ्या फिल्डचा, इथल्या वेळांचा अंदाज आहे. तो फोक डान्सर म्हणून शो करायचा. त्याचे काही मित्रही या क्षेत्रात आहेत. त्यामुळे वेगळं क्षेत्र असून जुळवताना फारशा अडचणी आल्या नाहीत. त्याला सोशल मीडिया, लोकांशी संपर्क साधणे, हे कसे जुळवून घेता येईल, याबाबत मला साशंकता होती. पण त्याने फारच छान जमवून घेतलं आहे” याचा आनंद शर्मिष्ठाने बोलून दाखवला. (Bigg Boss Marathi Fame Actress Sharmishtha Raut Love Story)

हेही वाचा : ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा साखरपुडा

“नटूनथटून मिरवण्याची हौस प्रत्येकाला असते, पण लॉकडाउनमध्ये साखरपुडा झाल्याने कोणत्या हौसेला मला मुरड घालावी लागली नाही.  बंधने असल्याने मोजके नातेवाईक आले, आमच्या क्षेत्रातले सर्वच जवळचे मित्र बोलवू शकलो नाही. पण त्यांनी समजून घेतलं.” असंही शर्मिष्ठाने सांगितलं.

अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत सध्या ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेत ‘संयोगिता’ची भूमिका साकारात आहे. याआधी तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘उंच माझा झोका’ अशा मालिका केल्या आहेत. ‘आज काय स्पेशल’ या कुकरी शोचे सूत्रसंचालनही ती करत होती, मात्र तिला खरी ओळख मिळाली ‘बिग बॉस मराठी’मुळे. पहिल्या पर्वात ‘वाईल्ड कार्ड’ एन्ट्री घेणाऱ्या शर्मिष्ठा राऊतने थेट फायनलपर्यंत मजल मारली होती. (Bigg Boss Marathi Fame Actress Sharmishtha Raut Love Story)

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.