Bihar Election Results 2020: भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं, कार्यालयाबाहेर मोदी जिंदाबादच्या घोषणा

सुरुवातीला महागठबंधनची घोडदौड पाहायला मिळत होती पण आता मात्र भापजनं (BJP) मोठी उडी घेतली आहे.

Bihar Election Results 2020: भाजप बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं, कार्यालयाबाहेर मोदी जिंदाबादच्या घोषणा
बेरोजगारीचे प्रमाण वाढवण्यासाठी विरोधकांकडून मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न सुरू होता. पण या सगळ्यात नुकत्याच समोर आलेली आकडेवारीनुसार ही सरकारच्या बाजूने आहे.
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 11:53 AM

पाटणा : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा निकाल आज (10 नोव्हेंबर) जाहीर होणार आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा निकालाच्या (Bihar Election Results 2020) मतमोजणीला सुरुवात होऊन दोन तास उलटले आहेत. सुरुवातीला महागठबंधनची घोडदौड पाहायला मिळत होती पण आता मात्र भापजनं (BJP) मोठी उडी घेतली आहे. एनडीए’ने राजद-काँग्रेस (RJD-CONGRESS) आणि डाव्या पक्षांच्या महागठबंधनला मागे टाकत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे. (Bihar Election Results 2020 BJP will be the largest party in Bihar Modi Zindabads announcement outside the office)

बिहारमध्ये एनजीएलाला बहुमत मिळत असल्याचं दिसताच भाजप कार्यालयात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची जमवाजमव सुरू झाली असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. इतकंच नाही तर बहुमताच्या दिशेने भाजप पुढे असल्याचं दिसताच पंतप्रधान नरेंद्र मोदी जिंदाबाद अशी घोषणाबाजी सुरू झाली आहे. यावेळी विरोधी पक्षाचा निषेधही करण्यात आला आहे.

बिहार निवडणुकीत जेडीयू नेते आणि मुख्यमंत्री पदाचे उमेदवार तेजस्वी यादव हे राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत तर तेज प्रताप यादव हे हसनपूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर जेडीयूचे राज कुमार राय हेदेखील पुढे आहेत.

सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण 243 जागांपैकी 131 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन अवघ्या 96 जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 जागा जिंकून बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापन करेल, असे चित्र तुर्तास दिसत आहे.

तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. सध्या भाजपचे उमेदवार 71 जागांवर आघाडीवर आहेत. तर भाजपपेक्षा अधिक जागा लढवणाऱ्या संयुक्त जनता दलाचे (जदयू) उमेदवार 52 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे आता बिहारमध्ये भाजप हा मोठा भाऊ होणार, हे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे आता ‘एनडीए’ची सत्ता आल्यास नितीश कुमार यांना मुख्यमंत्रिपद देण्याचे वचन भाजप पाळणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

इतर बातम्या – 

Bihar Election Results 2020: ‘एनडीए’चा चमत्कार; बहुमताच्या दिशेने वाटचाल, भाजप सर्वाधिक जागा जिंकणार?

Bihar Election Result 2020 LIVE | बिहारमध्ये NDA ची मुसंडी, महागठबंधन पिछाडीवर

(Bihar Election Results 2020 BJP will be the largest party in Bihar Modi Zindabads announcement outside the office)

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.