भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, राणा पाटील पसार

तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (MLA Rana jagjitsinh patil attempt murder)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, राणा पाटील पसार

उस्मानाबाद : तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (MLA Rana jagjitsinh patil attempt murder)  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीतील सदस्य घरात ठेवल्याचा आरोपातून हिंमतराव पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी घटनास्थळावरुन 4 जणांना अटक करण्यात आली (MLA Rana jagjitsinh patil attempt murder)  आहे.

राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह 19 जणांवर मारहाण करीत हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. आमदार राणा यांनी त्यांच्या समर्थकांसह माळेवाडीतील बोरगाव गावात जाऊन हिंमतराव पाटील यांच्या घरी गोंधळ घालत मारहाण केली. यानंतर 4 जणांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. आमदार राणा यांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान सध्या राणा पसार आहेत.

कळंब पंचायत समितीचे सदस्य घरात ठेवल्याच्या आरोपातून राणाजगजितसिंह यांनी हिंमतराव पाटील यांच्या घरी जात गोंधळ केला. त्यानतंर त्यांना मारहाण केली. यामुळे त्या ठिकाणी अनेक गावकरी जमा झाले. गावकऱ्यांनी राणा समर्थक यांना पकडायला सुरुवात करताच आमदार राणा हे त्यांची गाडी MH 12 PP 5511 घेऊन निघून गेले. असे तक्रारीत नमूद करण्यात आले (MLA Rana jagjitsinh patil attempt murder)  आहे.

गावकऱ्यांनी घटनास्थळावरुन उस्मानाबाद जिल्हा बँकेचे संचालक सतीश दंडनाईक, राणा यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंदे, दयाशंकर कंकाळ, पोपट चव्हाण यांच्यासह 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

आमदार राणा यांच्यावर कलम 307 , 323, 504 , 452 , 427 143 148 149 सहशस्त्र अधिनियम 1959 च्या कलम 3 व 25 नुसार गुन्हा दाखल केला आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस अंतर्गत येणाऱ्या अकलूज पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सध्या याचा तपास पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर करीत आहे.

अकलूज पोलीस ठाण्यात राणा पाटील, सतीश दंडनाईक, गणेश भातलवंदे, दयाशंकर कंकाळ, धीरज वीर, मनोगत उर्फ पिंचू शिनगारे, अरुण चौधरी, प्रणव विजेंद्र चव्हाण , दत्तात्रय बाळासाहेब साळुंके, मेघराज रावसाहेब देशमुख, पोपट ज्ञानोबा चव्हाण यांच्यासह इतरांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.आमदार राणा यांची गाडी MH 43 BP 5511 ही गाडीही घटनास्थळावरून जप्त केली (MLA Rana jagjitsinh patil attempt murder)  आहे.

Published On - 9:24 am, Mon, 30 December 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI