बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन आई झाली, लवकरच विवाहबंधनात

अनिश बेंद्रे

Updated on: Sep 24, 2019 | 8:19 AM

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सन आई (Amy Jackson Blessed with Boy) झाली आहे. लंडनमध्ये एमीने गोंडस मुलाला जन्म दिला. एक जानेवारीच्या मुहूर्तावर बॉयफ्रेण्ड जॉर्ज पानायियोटो (George Panayiuotou) सोबत एमीचा साखरपुडा झाला होता. येत्या काही दिवसात एमी विवाहबंधनात अडकणार आहे. एमीने आपल्या मुलाचं नाव ‘अँड्रिआज’ असल्याचं इन्स्टाग्रामवरुन (Amy Jackson Blessed with Boy) […]

बॉलिवूड अभिनेत्री एमी जॅक्सन आई झाली, लवकरच विवाहबंधनात

मुंबई : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री एमी जॅक्सन आई (Amy Jackson Blessed with Boy) झाली आहे. लंडनमध्ये एमीने गोंडस मुलाला जन्म दिला. एक जानेवारीच्या मुहूर्तावर बॉयफ्रेण्ड जॉर्ज पानायियोटो (George Panayiuotou) सोबत एमीचा साखरपुडा झाला होता. येत्या काही दिवसात एमी विवाहबंधनात अडकणार आहे.

एमीने आपल्या मुलाचं नाव ‘अँड्रिआज’ असल्याचं इन्स्टाग्रामवरुन (Amy Jackson Blessed with Boy) जाहीर केलं आहे. स्तनपान करतानाचा फोटो एमीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या पोस्टवर बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील कलाकारांसोबतच चाहत्यांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

Our Angel, welcome to the world Andreas ?

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

झाम्बियामध्ये एक जानेवारी 2019 रोजी एमी आणि जॉर्ज यांनी रिंग एक्स्चेंज केल्या होत्या. एमी आणि जॉर्ज ग्रीक पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहे. एमी आणि जॉर्ज 2015 पासून रिलेशनशीपमध्ये आहेत.

एप्रिल महिन्यात एमीने आपण गर्भवती असल्याचं जाहीर केलं होतं. अनपेक्षितरित्या ही गोड बातमी मिळाल्याचं तिने मुलाखतींमध्ये सांगितलं होतं. गरोदर अवस्थेत असतानाचे फोटोही ती नित्यनेमाने इन्स्टावर शेअर करत आली आहे. तिच्या पोस्ट पाहून अनेक जणी हे आपले ‘फिटनेस गोल’ आणि ‘प्रेग्नन्सी गोल’ असल्याचं सांगतात.

एमीचा बॉयफ्रेण्ड जॉर्जचं कुटुंब हे ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक मानलं जातं. लंडनमध्ये हिल्टन, पार्क प्लाझा आणि डबल ट्री यासारख्या आलिशान हॉटेलच्या चेन्स त्यांच्या मालकीच्या आहेत. जॉर्जचे वडील अँड्र्यू पानायियोटो हे प्रॉपर्टी डेव्हलपर असून त्यांची अंदाजे 3600 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

View this post on Instagram

Happy Birthday to my ride or die. Roll on to becoming a Mummy & Daddy! LoveYou ?

A post shared by Amy Jackson (@iamamyjackson) on

जॉर्ज हा अँड्र्यू यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. जॉर्जला एक सख्खा भाऊ आणी तीन सावत्र बहिणी आहेत. जॉर्ज 2014 मध्ये प्रसिद्ध मॉडेल डॅनिअल लॉएडला डेट करत होता.

दोघा पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी जॉर्ज आणि त्याच्या भावावर गुन्हा दाखल आहे. यासाठी त्याला सहा महिन्यांची तुरुंगवारी झाली होती.

यापूर्वी, एमी जॅक्सन आणि अभिनेता प्रतीक बब्बर रिलेशनशीपमध्ये होते. मात्र अल्पावधीतच दोघांचं ब्रेकअप झालं. एमीने ‘एक दिवाना था’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात प्रतीक तिचा सहकलाकार होता. त्यानंतर तिने सिंग इज ब्लिंग, फ्रिकी अली आणि अक्षय-रजनीकांतच्या 2.0 या हिंदी सिनेमात भूमिका केली.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI